शेळीपालन आणि मेंढी पालन हे व्यवसाय कमी खर्चात आणि कमी जागेत करता येण्यासारखी व्यवसाय आहेत. यापैकी आपण शेळीपालन या व्यवसायाचा विचार केला तरशेळीपालनासाठी बंदिस्त आणि अर्धबंदिस्त असे दोन प्रकारे शेळी पालन केले जाते.
परंतु त्यातूनही आपण मेंढी पालन याचा विचार केला तर अजूनही मेंढ्या या चारण्यासाठी मोकळ्या जागेत अर्थात कुरणामध्ये सोडल्या जातात. मेंढपाळ कायमच मेंढ्यांना घेऊन भटकंती करीत असतात. या सगळ्या गोष्टींमुळे मेंढीपालन व्यवसाय अजूनही हव्या तेवढ्या प्रमाणात प्रगती करु शकला नाही. त्यामुळे आता या प्रश्नावर शासन स्तरावरून काही पावले उचलली जाण्याचे संकेत वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. यामध्ये मेंढ्यांचा चरायचा प्रश्न मार्गी लावून मेंढपाळांना पशुधन विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. आज पर्यंत मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी या समाजाच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
मेंढी पालन साठी पशुधन विमा योजना
सध्या मेंढी पालन साठी पशुधन विमा योजना सुरू आहे.
परंतु वास्तविकता अशी आहे की या योजनेची माहितीअजूनही मेंढपाळांना नाही. त्यामुळे या योजनेपासून बरेचसे मेंढपाळ अजूनही लांबच आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेची माहिती मिळावी यासाठी विभागीय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजनकरण्यात येणार असून लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवली जाणार आहे.आपल्याला माहित आहेच कि मेंढपाळ मेंढ्यांच्या उदरनिर्वाहासाठी कायमच भटकंती करीत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात आणि पर्यायाने व्यवसायात स्थैर्य येत नाही. यासाठी व्यवसायामध्ये स्थैर्य यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरण यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून राज्यात 73 तालुक्यात फिरते पशु चिकित्सालय आहेत.लवकर या पशुचिकित्सालय आत मध्ये वाढ करण्यात येणार असून ती 80 तालुक्यात सुरू करण्यात येणार आहे. फिरते पशुचिकित्सालय याकरिता 1962 हा टोल फ्री क्रमांक आहे.
दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीत सूचना
शासनाकडून बंदीस्त किंवा अर्ध बंदिस्त मेंढीपालन व्यवसाय प्रोत्साहन देणे,कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करणाऱ्या मेंढपाळांना शेडच्या बांधकामासाठी व मोकळ्या जागेत पिण्याच्या पाणी,चारा, बियाणे तसेच बहुवार्षिक गवत प्रजातींचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत योजना प्रस्तावित कराव्यात अशा सुचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
Published on: 23 April 2022, 12:22 IST