बदलत्या काळानुसार शेतीच्या क्षेत्रात बदल घडवून आणणे गरजेचे ठरते. केवळ शेती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुपटीने वाढणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांना काही शेती पूरक व्यवसाय देखील करावे लागणार आहेत. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, त्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतीसमवेतच शेतकऱ्यांना काही शेती पूरक व्यवसायांची सांगड घालावी लागणार आहे. शेती पूरक व्यवसायात आपण पशूपालन, मोती पालन मशरूम फार्मिंग, अशा गोष्टींचा समावेश करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुपटीने वाढेल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. आज आपण शेतीसमवेत केले जाणारे काही पूरक व्यवसाय जाणून घेणार आहोत, चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
शेतीसमवेत केले जाणारे काही पूरक व्यवसाय:- शेळीपालन- सध्या शेळीपालन हे खूप लोकप्रिय बनत चालले आहे, तसेच शेळीपालन करून अनेक शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई देखील करत आहेत. शेळीपालनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरू केला जाऊ शकतो आणि यातून चांगले मोठे उत्पन्न कमावले जाऊ शकते. शेळी पालन करण्यासाठी जास्त मोठ्या जागेची आवश्यकता भासत नाही हे कमी जागेत देखील सहज रीत्या सुरु केले जाऊ शकते. शेळी पालन व्यवसायात ताबडतोप इन्कम मिळायला सुरुवात होते. जर आपणासही शेळीपालन करायचे असेल तर आपण सात-आठ शेळ्यांपासून याची सुरुवात करू शकता, आणि नंतर आपला व्यवसाय वाढत गेला की आपण पशुधनाची खरेदी करू शकता आणि आपला व्यवसाय मोठा करू शकता.
वराह पालन- शेतकरी बांधव वराह पालन करून शेतीला एक चांगला जोडधंदा स्थापित करू शकतील आणि यातून चांगली मोठी कमाई करू शकतील. वराह पालनाला खूप मोठा स्कोप आहे, याची मागणी ही लक्षणीय आहे. असे सांगितले जाते की, संपूर्ण जगात एका वर्षात 1 बिल्लियन पेक्षा जास्त डुकरांना खाल्ले जाते. जास्त करून डुकरांचा वापर हा खाण्यासाठी केला जातो, तसेच त्यांची चामडी, फॅट इत्यादी देखील उपयोगात आणले जाते.
भारतात देखील वराहपालन अलीकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे आणि यातून चांगली मोठी कमाई देखील केली जात आहे.
मोती फार्मिंग- सध्या मोतीच्या शेतीला खूप डिमांड येत आहे, याला पर्ल फार्मिंग म्हणून ओळखले जाते. पर्ल फार्मिंग साठी ट्रैनिंग घेण्याची आवश्यकता असते. पर्ल फार्मिंग करून अनेक शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत.
Published on: 26 December 2021, 04:44 IST