Animal Husbandry

पोल्ट्री करणारे किंवा कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन व्यवसाय करता येणार आहे. बटेर पालनाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. या बटेर पालनसाठी पोल्ट्रीसारखे मोठी शेड असण्याची गरज नाही, तुम्ही आपल्या घराच्या छतावर देखील करता येणार व्यवसाय़ आहे.

Updated on 23 July, 2021 1:57 PM IST

पोल्ट्री करणारे किंवा कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन व्यवसाय करता येणार आहे. बटेर पालनाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. या बटेर पालनसाठी पोल्ट्रीसारखे मोठी शेड असण्याची गरज नाही, तुम्ही आपल्या घराच्या छतावर देखील करता येणार व्यवसाय़ आहे. 70 च्या दशकात अमेरिकेतून या जपानी बटेरला भारतात आणलं गेलं आहे.

उत्तर भारतात बटेर पालनाच्या व्यवसायाने जोर पकडला आहे. महारष्ट्रातही काहीशा प्रमाणात बटेर पालन केले जात आहे. दरम्यान आज आम्ही तुम्हाला बटेर पालनाचे फायदे सांगणार आहोत. कोरोना काळात लोकांनी बटेरच्या मांस खूप पसंती दिली होती. कारण बटेर मध्ये प्रथिन्यांचे प्रमाण जास्त असते.

किती होती कमाई

लहान पक्ष्यांची किंमत 6 रुपये असते. त्यानंतर एका आठवड्यानंतर का पिल्याची किंमत 15 रुपये ते 19 रुपये होत असते. एकूण 45 दिवसात एका बटेरच्या पक्ष्याची किंमत 300 ग्राम होते. अशा स्थितीतील पक्षी आपण 45 रुपयांना विकू शकतो.  बटेरपासून मिळणाऱ्या अंड्याची किंमत ही १० रुपये असते. मेट्रो शहरात या अंड्यांना मोठी मागणी असते.बटेर मादी ही वयाच्या ४० ते ५० व्या दिवसाला अंडी देते. वर्षभरात २०० ते ३०० अंड्यांचे उत्पन्न मिळते. बटेर पक्षाचे आर्युमान हे तीन वर्ष असते. दोन पक्षाची किंमत ही साधरण ३०० रुपये असते. एका पक्षाचे वजन हे २०० ते ३०० ग्रॅम असते.  मांससाठी आपण पक्षी विकत असू तर एक पक्षी साधरम ३०० ते  ३५० रुपयांना विकला जातो.

हेही वाचा : घराच्या छतावर उभारला बटेर फार्म; कमी गुंतणुकीवर केली लाखो रुपायांची कमाई

बटेरचे अंडे खाण्याचे फायदे-

  • बटेरचे अंडे हे कोंबड्याच्या अंड्याला योग्य पर्याय आहेत.

  • इम्युनिटी आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर.

  • खनिज आणि जीवनसत्व अधिक असतात. खोकला आणि दमावर फायदेशीर.

  • ताप येऊ नये यासाठी हे अंडे फायदेशीर आहेत.

  • रक्ताच्या लाल पेशी वाढविण्यासाठी चांगले असतात.

  • बटेरचे मांस खाण्याचे फायदे

  • प्रथिने, खनिजे वाढविण्यास फायदेशीर.

  • कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी  फायदेशीर.

  • रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त

  • मुतखडा किडनी संबंधी विकारावर उपयोगी.

 

डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे पक्षी तज्ज्ञ डॉ. प्रमोद कुमार म्हणातात की, बटेर पालनाचे प्रशिक्षण घेऊन शेतकरी आपला व्यवसाय सुरू करू शकतात. वर्ध्यातील प्रविण वांढरे यांची ही बटेर हॅचरी आहे, तेही शेतकऱ्यांना बटेर पालनाचे प्रशिक्षण देत असतात.  डॉ. प्रमोद कुमार यांच्या मते, लहान पक्षी अंडी मध्ये फॉस्फरस आणि लोह असतात, त्यामुळे लोक बटेरला पसंती देत आहेत.  विशेष म्हणजे बटेर पालन आपण वर्षभरात कधीही करू शकतो.

English Summary: Start quail rearing at low cost and earn lakhs of rupees
Published on: 23 July 2021, 12:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)