भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडधंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय करतात, यामध्ये प्रामुख्याने पशु पालन केले जाते, यात प्रामुख्याने मधुमक्खी पालन, कुकुट पालन, वराह पालन, मत्स्यपालन, मधुमक्षिका पालन इत्यादींचा समावेश होतो. आज आपण यापैकीच एक म्हणजे मत्स्य पालन विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मत्स्यपालन शेती समवेत केला जाणारा एक जोडधंदा आहे. जर आपणास विनंती पालन करायचे असेल तर आपण अवघ्या पंचवीस हजार रुपयात हा व्यवसाय सुरु करु शकता.
आपण जर या व्यवसायात वार्षिक 25 हजार रूपये गुंतवले तर आपणास दीड लाख रुपये पर्यंत कमाई होऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या शेतकरी शेतात भाजीपाला लागवडी सोबतच मत्स्य पालन करण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. तसेच या व्यवसायासाठी सरकार देखील प्रोत्साहन देत आहे, या व्यवसायासाठी सरकारद्वारे आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाते. नुकताच काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारने मत्स्य पालन व्यवसायाला कृषी चा दर्जा दिला आहे, छत्तीसगड सरकारचा असा मानस आहे की यामुळे मत्स्यपालन व्यवसायाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचा यामुळे नक्कीच फायदा होईल. तसेच छत्तीसगड सरकार त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना इंटरेस्ट मुफ्त लोन देखील पुरवत आहे. तसेच मत्स्य पालन करण्यासाठी छत्तीसगड सरकार कडून शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जात आहे.
केंद्र सरकार देणार मदत- आम्ही आपणास सांगू इच्छितो की मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार सुद्धा अनेक योजना राबवित आहे. तसेच आपण आपल्या राज्यातील मत्स्यपालन कार्यालयातील राज्यस्तरावर चालू असलेल्या योजनां बद्दल माहिती देऊ शकता.
जाणून घ्या कशी होणार मत्स्यपालनातून कमाई- जर आपण आधीपासून मत्स्य पालन करत असाल किंवा मत्स्यपालन सुरू करण्याच्या विचारात असाल तर आपण मत्स्य पालणाच्या आधुनिक टेक्निकचा वापर करून यातून चांगली कमाई करू शकता. जर आपणासही मत्स्यपालन करायचे असेल तर आपण बायॉफ्लोक टेक्निकचा उपयोग करून मत्स्य पालनातून चांगली मोठी कमाई करू शकता. अनेक शेतकरी बांधव या टेक्निकचा उपयोग करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत.
काय आहे बायॉफ्लोक टेक्निक- बायॉफ्लोक टेक्निक मध्ये मोठ्या मोठ्या टाक्या जवळपास 10 ते 15 हजार लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टाक्या बनवल्या जातात. या टाक्यात पाणी टाकण्याची,काढण्याची ऑक्सिजनची इत्यादी गोष्टींची पर्याप्त व्यवस्था केलेली असते. या बायॉफ्लोक टेक्निक मध्ये बायॉफ्लोक नावाचा बॅक्टेरिया माशाची विष्ठा प्रोटीन मध्ये बदलून टाकतो, याला मासे खाऊन टाकतात आणि यामुळे माशांसाठी लागणाऱ्या फीडमध्ये कटोती होते परिणामी खर्चात बचत होते. तसेच या टेक्निकचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणी अस्वच्छ होण्यापासून वाचते. बायॉफ्लोक टेक्निक थोडी महागडी टेक्निक आहे पण पुढे चालून या टेक्निक द्वारे मोठी कमाई होते. असे सांगितले जाते की जर आपण सात टाक्यांपासून हा व्यवसाय सुरू केला तर आपणास जवळपास साडे सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. असे असले तरी आपण आपल्या शेततळ्यात सुद्धा मत्स्य पालन करून मोठी कमाई करू शकता. पण बायॉफ्लोक टेक्निक एक कारगर टेक्निक सिद्ध झाली आहे आणि त्यातून होणारी कमाई खूप जास्त आहे.
Published on: 21 December 2021, 09:01 IST