1. पशुसंवर्धन

मोड आलेले धान्य एक जिवनसंजीवनी

KJ Staff
KJ Staff


दुध उत्पादकांचा दुध उत्पादन खर्च कमी करून दुधव्यवसाय अधिक सोईस्कर करण्यासाठी कायम प्रयत्न केले जातात. यामुळेच अल्पावधीतच मुक्तसंचार गोठा मुरघास संतूलित पशुआहार चारा नियोजन इ. योजना दुध उत्पादकांस फायदेशिर ठरल्यामुळे त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक बांधीलकीतून गोविंद डेअरी मोड आलेल्रा धान्यापासून होणारे फायद्याचा प्रसार करण्याचे काम हाती घेतले असून त्याचे सर्व सामान्यासाठीचे फायदे लक्षात आलेने आता या गोष्टीचा प्रसार झपाट्याने होत आहे. मोड आलेल्या धान्याचा आहारात वापर अतीप्राचीन कालापासून मानवाकडून केला जात आहे यामुळे पुर्वी आजाराचे प्रमाण कमी असारचे परंतु आता जंकफुडचा चलती असल्याने रोगप्रतीकार क्षमता कमी झाल्याने या ना त्या आजराला सध्याचा मानवबळी पडत आहे. यासाठी आपण पुन्हा एकदा नैसर्गिक आहाराकडे अभ्यासपूर्वक पहावयास हवे. मोड आलेल्या धन्याचा वापर कसा सुरू झाला.

मोड आलेल्या धान्याचा वापर कसा सुरू झाला. डेअरीचे व्यवस्थापन कायम आपल्या दुध उत्पादकांसाठी काही तरी नविन देण्याचा प्रयत्न करत असतात. यातूनच त्यांच्या वाचनात आलेल्या पुस्तकात मोड आलेल्या धान्याचे महत्व विशद केल्याचे आढळले. या जगामध्ये मानव हा असा प्राणी आहे की जो शिजवलेले अन्न ग्रहन करतो व तो जास्त आजारांना बळी पडतो. तळलेल्या व चमचमीत शिजवलेल्या अन्नातून शरीरात जाणारे अनावश्यक घटक शरीराबाहेर काढण्यासाठी यकृत व किडनीवर जास्त भार पडतो हा भार मोड आलेल्या धान्यामधील अ‍ॅन्टीऑक्सीडेंट कमी करतात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आहाराचे महत्व त्यांना पटल्याने त्यांनी त्याचा आहारात मोड आलेल्या धान्याचा वापर चालू केला यानंतर चार पाच दिवसात त्यांना त्याचे चांगले परिणाम दिसुन आले. त्या नंतर त्यांनी आपल्या काही सहकारी यांना याबाबत माहीती सांगीतल्याने त्यानीही या मोड आलेल्या धान्याचा आहारात वापर चालू केला व त्यांनाही त्यांचे चांगले फायदे जाणवले.

दुध उत्पादनात पशूखाद्याचा खर्च हा दुध उत्पादकासाठी कायम चिंतेचा विषय आहे. दुधाच्या दरापेक्षा पशुखाद्याचा दर जास्त पटीने नेहमी वाढताना दिसतो. त्यामुळे गोविंदच्या व्यवस्थापनास वाटले की आपणास व आपल्या सहकारी यांस मोड आलेल्या धान्याचा एवढा फरक पडत असेल तर मग जनावरासांठी किती फरक पडेल हे पाहण्यासाठी (श्री. धनाजी जाधव, आदर्की, ता. फलटण) यांच्या गोठ्यावर एकूण सहा गाईपैकी दोन गाईंवर हा प्रयोग करण्यात आला व चार गाईंना नियमित आहार देऊन त्यांना कंट्रोल ग्रुप म्हणुन ठेवण्यात आले. तर त्रात पशुखाद्याचा खर्च कमी करून दुध उत्पादन व दुधाच्या गुणवत्तेत तसेच जनावरांच्या आरोग्यावरही फरक दिसून आल्याने बऱ्याच दुध उत्पादकांनी याचा वापर चालू केला. यातून जनावरांसाठीही बरेच फायदे दिसून आले.

 • दुध उत्पादनात वाढ.
 • दुधाच्या गुणवत्तेत सुधारणा.
 • दुधाचा चव गोडपणा जास्त आला.
 • जनावराची रोगप्रतीकार शक्ती वाढली.
 • दुध उत्पादनातील सातत्य जास्त काळ टिकून राहीले.


जनावरासाठीचे फायदे लक्षात आल्याने दुध उत्पादकांनीही मोड आलेल्या कडधान्यांचा वापर स्वत:साठी व घरातील सर्वांसाठी चालु केला त्यात बऱ्याच दुध उत्पादकांची वेगवेगळ्या आजार व व्याधीमधून मुक्तता झाली. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अ‍ॅलर्जी, दमा इ. आजारापासून बऱ्याच लोंकाची मुक्तता झाली आहे तसेच यासाठी कुठलाही जास्तीचा खर्च करावा लागत नाही आपल्या घरातीलच मटकी, मूग यांना मोड आणून त्याचा कच्चाच आहारात वापर करता येतो त्यामुळे फलटण व परीसरात सध्या मोड आलेल्या धान्याचा आहारातील वापराबाबत झपाट्याने प्रसार होत आहे. काय वापरू शकतो.

यामध्ये मटकी, मुग, मेथी, हुलगा, चवळी, मसूर, हरभरा, गहू यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यात येऊ शकतो. यात फलटणमधील लोकांनी मटकी, मुग, मेथी यांचा मोड आणून आहारात वापर केला व त्यांना वरीलप्रमाणे फायदे लक्षात आले आहेत. मोड आलेले कडधान्याचा आहारात वापर करताना त्यांना चांगले मोड येवून द्यावेत तसेच मोडासाठी वापरणारे कापड स्वच्छ असावे. मोड आलेली कडधान्य गडबडीत न खाता व्यवस्थित चावून खावेत. दररोच्या आहारात आपण 50 ते 125 ग्रॅम मोड आलेल्या धान्याचा आहारात वापर करता येतो तसेच यापेक्षा जास्तही आहारात वापर झालेल्या त्यापासून अपाय होत नाही कारण ते नैसर्गिक आहार आहे. मोड आलेली कडधान्य वजन तत्यांच्या मुळच्या वजनापेक्षा अडीचपट जास्त होते व एकदल धान्य ही त्यांच्या मुळच्या वजनापेक्षा दुप्पटीने वाढते. योग्य प्रमाणात वापर करण्यात येऊ शकतो.

मोड आलेल्या धान्याचे महत्व:

मानवाचे शरीर हे आम्लरीयुक्त असून त्राचे कार्र आम्लयुक्त आहे. आपण आहारात जास्तीत जास्त आम्लयुक्त आहार घेत असतो परंतु मोड आलेली कडधान्य ही आम्लारीयुक्त असतात त्यामुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रीया व्यवस्थित चालण्यासाठी शरीरातील जास्त तयार होणाऱ्या आम्लावर नियंत्रण ठेवायचे काम ते करत असतात. मोड आलेल्या धान्य हे इन्झाइम्स अ‍ॅन्टी-ऑक्सीडन्टस, क्षार, जिवनसत्व, प्रथिने इ. यांचे माहेरघर आहे.

 • इन्झाइम्स: 
  मोड आलेल्रा धान्रामध्रे प्रचंड प्रमाणात इन्झाइम्स असतात ही इन्झाइम्स, क्षार, जिवनसत्व, प्रथिने व इतर दुर्मिळ घटकांचे पचनासाठी महत्वाची भुमिका बजावत असतात. मोड आलेल्या धान्यामध्ये फळे व भाजीपाला यापेक्षा 100 पट जास्त प्रमाणात इन्झाइम्सचे प्रमाण असते. जर आपण अन्न 47 डीग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त गरम केल्यास यातील इन्झाइम्स नष्ट होतात यामुळे मोड आलेली धान्य कच्ची खावयची असतात.
 • अ‍ॅन्टीऑक्सीडन्टस:
  या धान्यामध्ये प्रकारची अ‍ॅन्टीऑक्सीडन्टस भरपुर प्रमाणात असलेने शरीरातील चयापचयाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. अ‍ॅन्टीऑक्सीडन्टसमुळे शरीरातील चयापचयाच्या प्रक्रियेत निर्माण होणारी टॉक्सीन्स ही निष्प्रभ होण्यास मदत होते त्यामुळे किडणी व यकृतावरील ताण कमी होतो.
 • क्षार: 
  मोड आलेल्या धान्यात निरमीत क्षारांचे रूपांतर चिलेटेड क्षारांमध्ये होत असलेने त्यांचे शरीरात शोषण चांगले पध्दतीने होते. तसेच काही क्षार हे प्रोटीन बरोबर बांधले जातात त्यामुळेही त्यांची उपलब्धता वाढते. क्षार हे शरीरातील विविध गरजांसाठी आवश्यक असतात.
 • प्राथिने: 
  मोड आलेल्या धान्यात प्रथिनांची उपलब्धता वाढते. या पध्दतीमुळे आवश्यक असणाऱ्या अमीनो आम्लांचे प्रमाण वाढते. हे महत्वाचे घटक शरीरात शोषले जातात.
 • जिवनसत्व: 
  मोड आलेल्या धान्यात जिवनसत्वाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढते. यामध्ये प्रामुख्याने जिवनसत्व अ, ब, क यांचे प्रमाण 200 ते 600 टक्केंनी वाढते. जिवनसत्वांच्या भरपुर उपलब्धतेमुळे वेगवेगळया प्रकारच्या आजारांवर नियंत्रण करता येते. याबाबत विदेशात बराच अभ्यास झालेला आहे. उदा. साध्या मुगापेक्षा मोड आलेल्या मुगामध्ये वाढलेल्या घटकांचे प्रमाण.

अन्नघटक प्रमाण:

 • ऊर्जा- 15 टक्के कमी
 • प्रथिने- 30 टक्के जास्त
 • कॅल्शिअम- 34 टक्के जास्त
 • पोटॅशिअम- 80 टक्के जास्त
 • सोडीअम- 690 टक्के जास्त
 • आयर्न- 40 टक्के जास्त
 • फॉस्फरस- 56 टक्के जास्त
 • जिवनसत्व अ- 285 टक्के जास्त
 • जिवनसत्व ब 1- 208 टक्के जास्त
 • जिवनसत्व ब 2- 515 टक्के जास्त
 • जिवनसत्व ब 3- 256 टक्के जास्त
 • जिवनसत्व क- बरेच जास्त

डॉ. शांताराम गायकवाड
सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विभाग, गोविंद दुध 
फलटण, जि. सातारा
9881668099

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters