शेळीच्या प्रजननामध्ये शाळांकडे व्यवस्थित लक्ष ठेवणे फार गरजेचे असते. गर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना होणार असे त्रास किंवा जन्माला येणारी अशक्त पिल्ले त्यामुळे पालकांना नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागते. अशावेळी ऋतुचक्राचे नियमन उपयुक्त ठरते. या लेखात आपण शेळी प्रजननाच्या बाबतीतली शुक्राणूंचीलिंगचाचणी व तिचे फायदे जाणून घेणारआहोत.
शुक्राणूंची लिंगचाचणी
- शेळीपालना मध्ये बऱ्याच वेळा शेळीपालकांना दुधासाठी फक्त मादी शेळ्या हव्या असतात किंवा काही शेळी पालकांना मांसासाठीनर बोकड पाहिजे असतो . त्यासाठी शुक्राणूंची लिंगचाचणी तंत्रज्ञान फायदेशीर ठरते.
- ज्या शेळ्यांना कृत्रिम रेतन केले असते अशा शेळीला मादी करडे होणार कि नर करडे याची त्यांच्या जन्माला येण्या आधी कोणतीही निश्चिती नसते. यावर मात करण्यासाठी वीर्य प्रत्यारोपण करण्याच्या वेळेसहोणाऱ्या करडाचे लिंग कोणते असणार हे ठरवणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
- शुक्राणू लिंगचाचणी तंत्रज्ञान नराच्या शुक्राणू मध्ये असणाऱ्या दोन प्रकारचे लिंग गुणसूत्र एक्सआणि वाय यांना वेगळे करण्यावर आधारित आहे.दोन्ही गुणसूत्रावर असणाऱ्या डी एन ए च्या संख्या मध्ये जवळपास 2.8 ते चार टक्के इतका फरक असतो. एक्स गुणसूत्रावर असणारे डीएनएच्या संख्येच्या आधारावर फ्लोसाईटोमेट्रीयंत्राद्वारे एक्स आणि वाय लिंगगुणसूत्र अनुसार वेगळे करता येतात.
- या तंत्रानुसार फक्त नर करडे तयार होण्याची निश्चिती 80 टक्के आणि मादी करडे तयार होण्याची निश्चिती 94 टक्के इतकी आहे.
शुक्राणू ची लिंग चाचणी चे फायदे
1-फ्लोसाईटोमेट्री यंत्राद्वारे लिंग निश्चित केलेल्या शुक्राणू वेगवेगळ्या स्ट्रा बनवून गोठीत वीर्य केंद्रातसाठवून ठेवल्या जातात. त्यांचा उपयोग कृत्रिम रेतन प्रमाणेच परंतु हव्या त्या लिंग निश्चितकडे मिळवण्यासाठी करता येतो.
2-सध्या हे संशोधन विकसित देशांमध्ये प्रगतहोऊन तेथील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.( संदर्भ- ॲग्रोवन)
Published on: 23 December 2021, 08:31 IST