Animal Husbandry

शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेती समावेत पशुपालन करत असतात. पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीसाठी एक उत्तम जोडव्यवसाय (Business) आहे, देशात पशुपालक शेतकरी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळीपालन, गाई-म्हैस पालन, वराह पालन इत्यादी प्रकारचे पशुपालन करून चांगली मोठी कमाई करत असतात. आज आम्ही बदक पालन (Duck rearing) याविषयी सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. देशात बदकाच्या अंड्याला आणि मांसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे बदक पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी (For livestock farmers) फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. अनेक व्यक्ती प्रोटीन च्या पूर्ततेसाठी आपल्या आहारात बदकच्या आणि कोंबडीच्या अंड्यांचा समावेश करतात.

Updated on 03 January, 2022 11:45 AM IST

शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेती समावेत पशुपालन करत असतात. पशुपालन (Animal Husbandry) हा शेतीसाठी एक उत्तम जोडव्यवसाय (Business) आहे, देशात पशुपालक शेतकरी कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळीपालन, गाई-म्हैस पालन, वराह पालन इत्यादी प्रकारचे पशुपालन करून चांगली मोठी कमाई करत असतात. आज आम्ही बदक पालन (Duck rearing) याविषयी सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. देशात बदकाच्या अंड्याला आणि मांसाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे बदक पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी (For livestock farmers) फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. अनेक व्यक्ती प्रोटीन च्या पूर्ततेसाठी आपल्या आहारात बदकच्या आणि कोंबडीच्या अंड्यांचा समावेश करतात.

देशात कुकूटपालन (Poultry farming) मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोंबडीचे अंडे सहजरीत्या लोकांना उपलब्ध होऊन जाते, मात्र बदक पालन अद्याप तरी देशात मोठ्या प्रमाणात होत नसल्याने लोकांना बदकाची अंडी सहजरीत्या उपलब्ध होत नाहीत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बदकाच्या अंड्यात कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक प्रोटीन आढळते. त्यामुळे दिवसेंदिवस बदकाच्या अंडयाना मोठी मागणी बघायला मिळत आहे. त्यामुळे बदक पालन करून पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) या मागणीची पूर्तता करून चांगली मोठी कमाई करू शकतात. असे असले तरी जर आपणास व्यवसायिकरीत्या (Professionally) मोठ्या स्तरावर बदक पालन करायचे असेल तर आपणास काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल, तरच आपल्याला या व्यवसायातून चांगली मोठी कमाई होऊ शकते. पण जर आपणास फक्त घरासाठी बदक पालन सुरु करायचे असेल तर आपणास जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. देशातील एकूण कुकूटपालनापैकी जवळपास दहा टक्के पालन बदकांचे होते, परंतु दिवसेंदिवस बदकांच्या मांसात आणि अंड्यात वाढ होत असल्याने, एवढेसे बदक पालन मागणी पूर्ण करण्यास अक्षम आहे. त्यामुळे बदक पालन व्यवसायात मोठा स्कोप असल्याचे जाणकार सांगत आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया बदक पालनाविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी.

बदक पालणातील काही महत्वपूर्ण बाबी (Some important aspects of duck rearing)

  • पशुपालक शेतकरी मित्रांनो जर आपणासही बदक पालन करायचे असेल, तर बदकाच्या सुधारित जातीचे (Improved breed of duck) पालन करणे अनिवार्य आहे. जर आपण बदकाच्या सुधारित जातीचे पालन केले तर आपणास एका बदका पासून वर्षाकाठी सुमारे 300 अंड्यांचे उत्पादन मिळते. बदकाच्या अंड्यात कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक प्रोटीन असल्याचे सांगितले जाते, तसेच यांच्या मांसात कोंबडीच्या मांसापेक्षा अधिक पोषकतत्वे (Nutrients) असल्याने याची मागणी लक्षणीय वधारली आहे. त्यामुळे बदक पालन पशुपालक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
  • पशुपालक शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके बदकाच्या सुधारित जाती आहेत तरी कोणत्या असे असेल तर चिंता करू नका, आपण इंडियन रनर, पांढरा आणि ग्रेनीश, खाकी कॅम्पबेल या बदकाच्या सुधारित जातीचे पालन आपण करू शकता. असे असले तरी खाकी कॅम्पबेल या जातीचे पालन फायदेशीर असल्याचे वैज्ञानिक (Scientist) सांगत असतात. या बदकाचे पालन करून वर्षाकाठी 300 अंड्यांचे उत्पादन सहजरीत्या मिळते.
  • बदक पालनात विशेष काळजी ही बदकाच्या पिल्लांचीच घ्यावी लागते विशेषता तेव्हा, जेव्हा तापमानात मोठ्या प्रमाणात घट घडून येते. थंडीत बदकाच्या पिल्लांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्याची शिफारस केली जाते. बदकाच्या खुराड्यात (In the cage) यासाठी 200 वॉटचा बल्प जमिनीपासून दोन फूट उंचीवर लावण्याची शिफारस केली जाते.
  • जेव्हा बदक अंडी फोडतात तेव्हा अंड्यातून निघणारी नवजात पिल्ले (Newborn Ducks) डायरेक्ट जमिनीवर न ठेवता चटईवर ठेवण्याची शिफारस केली जाते. आणि जवळपास सहा आठवडे तीन दिवसाआड चटई ही उन्हात वाळवावी लागते.
  • बदकांच्या पिलांसाठी आहार (Feeding for ducklings) देताना देखील विशेष काळजी घ्यावी लागते, तुम्ही पिल्लांना तांदळाचे छोटे छोटे दाने पाण्यात भिजवून खायला देऊ शकता.
  • जेव्हा बदकांची पिल्ले पूर्ण महिन्याभराची होतात तेव्हाच त्यांना पाण्यात सोडावे, मात्र शिकारी पक्ष्यापासून तसेच पशुपासून पिल्लांचे रक्षण करणे गरजेचे असते.
  • बदक पालनातून अंड्याचे चांगले उत्पादन (Good egg production) घेण्यासाठी ज्या पाण्यात बदकाचे संगोपन केले जाणार आहे ते पाणीचांगले स्वच्छ असावे.
  • तसेच प्रत्येकी दहा मादी बदकामागे (the female duck) एक नर बदक असणे अनिवार्य आहे.
  • पशुपालक मित्रांना आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सुमारे सहा महिन्यानंतर बदक अंडी घालायला सुरुवात करतात.
English Summary: some important things regarding duck rearing follow this instructions and earn more profit
Published on: 03 January 2022, 11:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)