Animal Husbandry

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशूपालन,शेळीपालन व कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात.यापैकी शेळी पालन हा अगदी कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेत करता येण्यासारखा व्यवसाय असल्यानेबरेच शेतकरी आता शेळी पालन याकडे वळत आहेत.

Updated on 17 February, 2022 2:56 PM IST

भारतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशूपालन,शेळीपालन व कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात.यापैकी शेळी पालन हा अगदी कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी जागेत करता येण्यासारखा व्यवसाय असल्यानेबरेच शेतकरी आता शेळी पालन याकडे वळत आहेत.

शेळी पालनाला सध्या व्यावसायिक स्वरूप येत असूनवेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर देखील शेतकरी करताना दिसत आहेत.शेळ्यांच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत.परंतु त्यापैकी काही जाती या विशेषवैशिष्ट्यांनी आणि गुणधर्माने परिपूर्ण असूनशेळीपालनासाठी त्या महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या लेखामध्ये आपण शेळ्यांच्या  काही जातींची माहिती घेऊ.

 शेळीपालनासाठी उपयुक्त शेळ्यांच्या महत्त्वाच्या जाती….

  • सोजत- शेळ्यांची ही जात राजस्थानातील असून या जातीच्या शेळ्यांचा रंग पांढरा असतो व तसेच डोळ्यावर व कानावर डाग असतात.या जातीच्या शेळीमध्ये गुलाबी कानअसलेल्या शेळीला खूप किंमत मिळते. बकरी ईदला या जातीच्या बोकडांना जास्त किंमत मिळते.या जातीच्या नराचे वजन 50 ते 70 किलो तर मादी 35 ते 45 किलो असते.
  • मालवा-ही शेळ्यांची जात मध्यप्रदेश राज्यातील असून भोपाळ येथे प्रसिद्ध आहे.या जातीच्या शेळ्यांच्या रंग पांढरा असतो तसेच या शेळ्यांना शिंगे असतात. या जातीच्या शेळ्यांच्या नराचे वजन 50 ते 80 किलो व मादी शेळीचे वजन 40 ते 50 किलो असते. मालवा जातीचा बोकड हा कुर्बानीसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे.नर बोकडाचेवजन 100 किलो पेक्षा जास्तीतजास्त असते.
  • पतीरा-शेळ्यांची ही जात गुजरात राज्य मधील असून या जातीच्या शेळ्यांच्या रंग पांढरा असतो.या जातीच्या शेळ्यांच्या तोंडावरील गुलाबी छटा वकान गुलाबी असतात.असे डोळ्यांवर सुरकुत्या असतात.नराचे वजन 50 ते 60 किलो असते व मादी शेळीचे वजन 35 ते 50 किलो असते. पतीरा ही शेळ्यांची जात अतिशय दुर्मिळ असून महागडी व सुंदर म्हणून प्रसिद्ध आहे.
  • अजमेरी( सिरोही)- राजस्थानातील ही जात असून या जातीचा रंग तांबडा किंवा तपकिरी असतो. या जातीच्या शेळ्यांच्या अंगावर गर्द ठिपके असतात.या जातीच्या शेळ्या भारतामध्ये सर्वात जलद वाढतात.या जातीच्या नराचे वजन 45 ते 60 किलो तर मादीचे वजन 30 ते 50 किलो असते.
  • अमृतसरी( बिटल)-या जातीच्या शेळीला ठराविक असा रंग नाही.ही जात प्रामुख्याने पंजाब मध्ये आढळते.या जातीच्या शेळी चा रंग काळा व लालसर असतोव कान लांब असतात.माझी शेळीचे वजन 40 ते 50 किलो असते व नराचे वजन 50 ते 80 किलो असते.ही शेळी पाच ते सात लिटर दूध देते.बंदिस्त शेळीपालनासाठी उपयुक्त जात आहे.
  • हैदराबादी जमनापारी- चंदाने शुभ्र पांढरी व त्वचा गुलाबी असते.या जातीचे कानजवळ जवळ एक फुटापर्यंत असतात. या शाळा अतिशय दुर्मिळ असल्यानेशेळ्यांचे शौकीन लोक जास्तीत जास्त किमतीला खरेदी करतात. हे जमनापरी शेळी ची जात आहे.
  • हंसा जमनापारी- हीदेखील जमनापारी जातीच्या शेळीचीएक जात असून या जातीच्या शेळी चा रंग पांढराशुभ्र वही शेळी अतिशय नाजूक असते.ही शेळी दिसायला अतिशय नजाकतदार व डाग विरहित असल्याने महाग विकली जाते.
English Summary: sojat,maalwa and patira this is very benificial goat species in goat rearing
Published on: 17 February 2022, 02:56 IST