आपण बहुदा गाय आणि म्हैस किंवा अन्य प्राणी यांना झाड, भिंत इत्यादींना त्यांचे शरीर खरडलेले आपण पाहतो. हा एक प्रकारचा आजार आहे. परंतु बहुतेक पशुपालन त्याकडे फारसे लक्ष देत नाही. हा सामान्यतः गाईंमध्ये त्वचा रोग म्हणून ओळखला जातो. एखाद्या गाईला हा आजार झाल्यास त्यावर वेळेत उपचार होणे फार गरजेचे आहे.अन्यथा फार मोठे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.
गाईंना होणारा त्वचा रोग म्हणजे काय?
या रोगामध्ये प्रामुख्याने गाईचे केस हळूहळू कमी होत आणि खाज ज्या जागेवर तेथे जागा व त्या जागेवरील त्वचा कडकहोते. या आजारामुळे प्रत्येक प्राणी तणावात असतात. परंतु शरीरावर खाज सुटणे आणि माशी उडने, किटक इत्यादी जनावरांना अधिक ताण देऊ शकतात. त्यामुळे गाय शारीरिक दुर्बल होते आणि दुधाचे उत्पादन क्षमताही कमी होते.
त्वचा रोगाची लक्षणे
बॅक्टेरिया च्या आजाराचे लक्षणे
- बाधित क्षेत्र गरम होते.
- त्वचा लाल होते.
- मवाद बाहेर येऊ लागते.
अळी मुळे झालेल्या त्वचा रोगाचे लक्षणे
- खाज सुटण्याच्या ठिकाणी केस गळतात.
- कानात खाज सुटल्यावर प्राणी डोके हलवते.
- कान वाहतो तसेच कानामध्ये तपकिरी काळा मेणत्यात जमा होते.
- बाह्य त्वचेचा रोग जनावरांमध्ये पसर
- हा रोग किड्यामुळे होतो. जो मानवामध्ये देखील पसरतो.
- त्वचा जाड होते आणि खाज सुटते.
बुरशीजन्य त्वचारोग
- या प्राण्यांच्या त्वचेवर, केसांवर आणि नखांना त्रास होतो.
वायरल त्वचा रोगाची लक्षणे
प्राण्याची नाकाची व खुरची त्वचा जाड होते.
लवकर काळजी घेणे महत्त्वाचे
- प्राणी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा.
- उन्हाळ्यात त्यांना दररोज आंघोळ घालावी.
- आसपासची घाण नियमितपणे स्वच्छ करा.
- पावसात प्राण्यांच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
- प्राण्यांना दर तीन महिन्यांच्या फरकाने अंतर्गत परजीवी अँटीपायरटिक दयावे.
- त्वचारोगांमध्ये प्राण्यांना चांगले अन्न, जीवनसत्वे द्यावे.
- यासह यकृत टॉनिक आणि कंडिशनर केसांसाठी वापरावे.
Published on: 22 October 2021, 12:31 IST