Animal Husbandry

भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात.पशुपालन करत असताना दुग्धोत्पादनासाठी गाय व म्हशीचे पालन करतात.भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाई व म्हशींच्या जाती आढळून येतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये हे वेगवेगळे असतात तसेच त्यांचे दूध देण्याची क्षमता देखील वेगवेगळे असते.

Updated on 13 October, 2021 3:53 PM IST

भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात.पशुपालन करत असताना दुग्धोत्पादनासाठीगाय व म्हशीचे पालन करतात.भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाई व म्हशींच्या जाती आढळून येतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये हे वेगवेगळे असतात तसेच त्यांचे दूध देण्याची क्षमता देखील वेगवेगळे असते.

या लेखात आपण गाईच्या  जातीविषयी माहिती घेणार आहोत.या लेखात आपण गायीच्या सीरिया जाती विषयी माहिती घेणारआहोत.

गाईची सिरी ही जात

 या जातीचे गाय पश्चिम बंगाल, दार्जिलिंग आणि सिक्कीम या पर्वते भागांमध्ये सापडणारी एक लहान आकाराची जात आहे.

या गाईचे रचना

 या जातीच्या प्राण्यांवर काळ्याव तपकिरी रंगाचे पांढरे डाग असतात.त्वचेचा रंग राखाडी असतो.काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण होल्स्टिन फ्रिजन जाती सारखे आहे.कपाळाला प्रगत आणि पांढरे डाग आहेत. या सर्व शिंगे मध्यम आकाराचे आणि बाह्य दर्शनीआहेत.याशिवाय कान मध्यम आकाराचे आहेत आणि ते पृथ्वीशी समांतर आहेत.त्यांच्या पायाचा तळ आणि मध्यभाग हलका रंगाचा आहे.

सिरी गायीचे दूध उत्पादन

 

या गाईची दररोज तीन ते सहा लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता आहे.दूध उत्पादनाचा कालावधी सुमारे दोनशे दहा ते 274 दिवस आहे.

जर एखाद्या शेतकऱ्यास किंवा पशुपालकास सिरी गाय खरेदी करायची असेल तर ते राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या https://www.nddb.coop/hiया संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा परिसरातील एखाद्या डेअरी फार्म मध्ये जाऊन संपर्क साधू शकतात.

English Summary: siri is most benificial species of cow important in milk
Published on: 13 October 2021, 03:53 IST