भारतातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालन करत असताना दुग्धोत्पादनासाठी गाई व म्हशींच्या पालन करतात.
भारतामध्ये वेगळ्या प्रकारच्या गाई व म्हशींच्या जाती आढळून येतात. प्रत्येकाची वैशिष्ट्ये हे वेगळी असतात असं त्यांच्या दूध देण्याची क्षमता देखील वेगळी असते. या लेखात आपण गाईच्या जाती विषयी माहिती घेणार आहोत. या गाईच्या जाती चे नाव आहे सिरि.
गाईची उपयुक्त जात आहे सिरी
या जातीच्या गाई पश्चिम बंगाल, दार्जीलिंग आणि सिक्कीम या पर्वत भागांमध्ये सापडणारी एक लहान आकाराची जात आहे.
या गाईची रचना
या जातीच्या गाई वर काळा व तपकिरी रंगाचे पांढरे डाग असतात.त्वचेचा रंग राखाडी असतो.काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे मिश्रण होल्स्टिन फ्रिजीयन जाती सारखे आहे. कपाळाला प्रगत आणि पांढरे डाग आहेत. या गाईची शिंगे मध्यम आकाराचे आणि बाह्य दर्शनी आहेत. याशिवाय कान मध्यम आकाराचे आहेत आणि ते पृथ्वीशी समांतर आहेत. त्यांच्या पायाचा तळ आणि मध्यभाग हलका रंगाचा आहे.
सिरी गाईचे दूध उत्पादन
या गाईची दररोज तीन ते सहा लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता आहे. दूध उत्पादनाचा कालावधी सुमारे दोनशे दहा ते 274 दिवस आहे. जर एखाद्या शेतकऱ्यास किंवा पशुपालकास सीरी गाय खरेदी करायची असेल तर ते राष्ट्रीय दूग्ध विकास मंडळाच्या https://www.nddb.coop/hiया संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा परिसरातील एखाद्या डेअरी फार्म मध्ये जाऊन संपर्क साधू शकता.
Published on: 03 January 2022, 05:42 IST