Animal Husbandry

आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसायासह जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालनात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे म्हणजे शेळी आणि मेंढीपालन.

Updated on 26 June, 2020 2:39 PM IST


आपल्या देशातील बहुसंख्य लोक हे शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसायासह जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालनात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे म्हणजे शेळी आणि मेंढीपालन. आज आम्ही आपणांस मेंढीपालनाविषयी माहिती देणार आहोत. शेळीपालन करणारे काही प्रमाणात आपल्या कळपात मेंढीही पाळत असतात. धनगर समाज तर पूर्णपणे मेंढीपालन करत असतात. त्यांचा उदरनिर्वाह हा मेंढीपालनावरच असतो. जर आपल्याला पशुपालनाची आवड असेल तर आपण मेंढीपालन करावे मेंढीपालनात बक्कळ कमाई आहे. मेंढींच्या काही जाती आहेत, त्यांची कमाई अधिक असते. या मेंढ्या मांस, लोकर आणि दुधाच्या व्यवसायासाठी फार उपयुक्त आहेत.

महाराष्ट्रात डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्या आढळतात. डेक्कनी मेंढी मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. सहा महिन्यानंतर मांसचा उतारा हा ४९.६+१८% तर या मेंढ्यापासून ५८७ ग्रॅम्स लोकर मिळते. माडग्याळ मेंढी या मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे. नर आणि मादींना शिंग येत नाहीत. या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध ही कमी मिळत असते. या व्यतिरिक्त देशात आढळणाऱ्या इतर मेंढ्यांच्या जातीविषयी आपण जाणून घेणार आहोत.

गद्दी - या मेंढ्या मध्यम आकाराच्या असतात, यांचा रंग पांढरा, लाल, हलका काळा असतो. या मेंढ्यांपासून वर्षातून तीनदा आपल्याला लोकर मिळत असते. साधरण एक ते दीड किलो वजनाचे लोकर आपल्याला मिळते. या जातीच्या मेंढ्या या हिमाचल प्रदेशच्या रामनगर, उधमपूर, कुल्लू, जम्मू- काश्मीर, आणि कांगडा खोऱ्यात आणि उत्तराखंडच्या नैनीताल टेहरी गढवाल, चिमोली जिल्ह्यात आढळतात. या मेंढ्यांमधील नरांना शिंग असतात. याशिवाय १० ते १५ टक्के मादी मेंढ्यांना पण शिंग असतात.

 


मुझफ्फरनगरी - या जातीच्या मेंढ्या दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेशाच्या मुझफ्फरनगर, बुलंदशहर, सहारनपूर, मेरठ, बिजनौर येथे आढळतात. या मेंढ्याचा रंग पांढरा असतो. याच्या शरिरावर भुरक्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे ठिपके असतात.
जालौनी - या जातीच्या मेंढ्या उत्तरप्रदेशच्या जालौन, झांसी आणि ललितपूरमध्ये आढळतात. यांचा आकार मध्यम आकारच्या असतात. या जातीच्या मेंढ्यांना नर आणि मादींना शिंग असतात. याचे कान हे आकाराने मोठे आणि लांब असतात. या मेंढ्याच्या लोकरी या मऊ आणि जाड असतात. लोकर छोट्या असतात आणि मोकळे असतात.

पूंछी
या जातीच्या मेंढ्या ह्या मुळ जम्मू प्रांतातील पुंछ आणि राजौरीतील भागात आढळतात. या मेंढ्या गद्दी जाती सारख्या असतात. परंतु यांचा आकार छोटा असतो. तर रंग पांढरा असतो, यांची शेपटी ही लहान असते.

करनाह - या जाती उत्तरी काश्मीरच्या डोंगराळ भागातील करनाह येथे आढळतात. यांचा आकार मोठा असतो. या मेंढ्यातील नराचे डोकं असते तर शिंगही असतात. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो.

मारवाड़ी - या जातीच्या मेंढ्या राजस्थानच्या जोधपूर, नागौर, जालौर, पाली या परिसरात आढळतात. यांचा आकार लहान असतो. चेहरा काळा रंगाचा असतो. परंतु यांच्यापासून मिळणारी लोकरही पांढऱ्या रंगाची असते. लोकर खूप दाट असल्याने वजनदार असते.

English Summary: Sheep rearing is beneficial : know the best breed of sheeps
Published on: 26 June 2020, 02:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)