शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणे हे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्यानुषंगाने सरकार विविध योजनांचा आणि अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करीत आहे. शेती असो किंवा शेतीला पूरक असा पशुपालन व्यवसाय असो सरकार विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करीत आहेत.या लेखात आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गतजनावरांचा गोठा साठी दिले जाणारे अनुदान बद्दल माहिती घेणारआहोत.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी अनुदान
शेतकरी शेती सोबत पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांच्या आरोग्य हे विविध गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांचा निवारा हा फार महत्त्वाचा असतो. जनावरांचा गोठा कसा आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. चांगलागोठ्या अभावी बऱ्याच समस्या पशु पालणा मध्ये उद्भवतात. दुग्ध व्यवसाय हा शेतीचा प्रमुख जोडव्यवसाय आहे आहे. त्यामुळे शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादींना या योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. या क्षेत्रातल्या सगळ्या जुन्या आणि नव्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत सहभागी करण्यात आले आहेत.
77 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार
गाई व म्हशी अशा दोन ते सहा जनावरांसाठी गोठा बांधायचा आहे तर या जनावरांच्या गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये शेतकऱ्यांना जाणार आहे. जर सहा वाजता पेक्षा अधिक म्हणजे बारा जनावरांसाठी दुप्पट तर 18 पेक्षा अधिक जनावरे असतील तर तिप्पट अनुदान हे दिले जाणार आहे.
या योजनेचा अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्जामध्ये तुमच्या कुटुंबाचा प्रकार म्हणजे अनुसूचितजाती,जमाती,भटक्या जमाती,भटक्या विमुक्त जाती,महिला प्रधान कुटुंब, 2008 च्या कृषी कर्ज माफी योजना नुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी यापैकी ज्या प्रकारांमध्ये तुमचे कुटुंब आहे त्याचा उल्लेख करावा लागणार आहे.
- तुम्ही निवडलेल्या प्रकारानुसार संबंधित वर्गाचा पुरावा जोडावे लागणार आहे.
- जर अर्जदाराच्या नावे शेतजमीन असेल तर त्या शेत जमिनीचा सातबारा, 8अ चा उतारा आणि ग्रामपंचायत नमुना जोडायचा आहे.
- त्यानंतर लाभार्थ्यांनी स्वतःचा रहिवाशी दाखला जोडायचा आहे.
- अर्ज केलेल्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील सदस्य संख्या ती पण अठरा वर्षांपुढील सदस्यांची संख्या नमूद करायची आहे.
- नंतर सगळ्यात शेवटी घोषणापत्रा वर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
- अर्जासोबत मनरेगा जॉब कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, मालमत्ता नमुना इत्यादी जोडायचे आहे.
- त्यानंतर ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायचा आहे.
- यानंतर तुमच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक यानुसार पोचपावती दिली जाईल. या तुम्ही लाभासाठी पात्र आहात की नाही हे सांगितले जाणार आहे.
- जर तुम्ही मनरेगाच्या लाभार्थी असाल तरीही लाभ घेता येईल पण जर जॉब कार्ड नसेल तर मात्र लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जॉब कार्ड साठी अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो.
- अर्ज करताना तुम्ही कोणाकडे म्हणजे सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यापैकी कोणाकडे अर्ज करीत आहात त्या नावापुढे बरोबर अशी खूणकरायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव,तालुका,जिल्हाआणि अर्जाच्या उजवीकडे तारीख टाकून तुमचा फोटो चिकटवयाचाआहे.
- त्यानंतर खाली अर्जदाराचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- नंतर तुम्ही ज्या साठी अर्ज करीत आहात त्यावर बरोबर अशी खुण करायचीआहे.( स्त्रोत-tv9 मराठी)
Published on: 01 October 2021, 01:31 IST