Animal Husbandry

शेतीला जोड धंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरीवर्गाला शेळी पालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळी पालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप महत्त्वाचे आहे.

Updated on 13 November, 2021 2:25 PM IST

शेतीला जोड धंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरीवर्गाला शेळी पालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळी पालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप महत्त्वाचे आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या संशोधनासाठी या जातीची शेळी ठेवण्यात येणार-

 सानेन जातींच्या शेळ्यांचे मुळस्थान स्वित्झर्लंड आहे. आता युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानात ही शेतकरी या शेळ्यामोठ्या प्रमाणात पाळत आहेत. महामंडळामार्फत 20 शेळ्या आणि दोन बोकड खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या संशोधनासाठी या शेळ्या ठेवल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात पाच ते 12 लिटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधनकरून धवलक्रांतीची क्रांतिकारी वाटचाल करण्याचा हेतू ठेवला आहे. सानेन जातीची शेळी दिवसाला पाच ते बारा लिटर दूध देते.

सानेन जातीच्या शेळी चा गाबन काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. त्यामुळे पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. शेळी पासून एका वेतात कधी दोन तर कधी तीन करडे मिळतात तीन वेतात पाच करडे मिळू शकतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाण अधिक आहे.

 सानेन जातींच्या शेळ्यांचे प्रमुख वैशिष्ट्ये

  • या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात.
  • मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकार च्या उत्पादनावर या शेळ्या सहजगत्य तग धरतात
  • निकृष्ट प्रकारचे खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांसआणि कातडी मध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात.
  • शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पाळण्यास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना बळी पडत नाही.
  • शेळ्या दुरवर रानात, डोंगर कपाऱ्यात करण्यास जाऊ शकतात. तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणूक व्यवस्थापन करणे सहज शक्य असते.
  • कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.
English Summary: sanen is benificial species of goat in goat keeping
Published on: 13 November 2021, 02:25 IST