शेतकरी शेतीसोबत शेळीपालन हा जोडव्यवसाय म्हणून करत असतात. यातून चांगले उत्पादन घेतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना जास्त दूध उत्पादन (milk production) देणाऱ्या शेळीबाबद माहीत नसते. या शेळीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
शेळीपालन व्यवसाय हा शेळीपासून पैदास होणाऱ्या बोकड विक्रीच्या हेतूनं फायदेशीर ठरतो. त्यामुळे भारतात मुख्यतः मांस विक्रीसाठी च शेळीपालन केले जाते. यासह आपण पाहिले तर शेळीचे दुध पौष्टीक (Goat milk nutritious) मानले जाते, अलीकडे शेळीच्या दुधापासून अनेक मुल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती होत आहे.
तसेच याची मागणीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शहरी भागातील जागरुक ग्राहकांकडून शेळीच्या दुधाला मागणी वाढू लागली आहे. सानेन शेळ्या इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे सानेन शेळीचे (Sanen Goat) मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे.
गॅस सिलिंडर धारकांसाठी महत्वाची बातमी; एलपीजीवर सबसिडी सुरू, मिळतेय 'इतकी' रक्कम
सानेन शेळीची निवड
सानेन शेळीची निवड कासेवर कानावर आणि नाकावर काही काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. कान ताठ असते व मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो. मुख्यतः सानेन शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या शेळ्यांना शिंगे नसतात.
त्यांचे पाय लहान आकाराचे आणि मान लांब आकाराची असते. ही शेळी इतर सर्व शेळ्यांच्या तुलनेत जास्त दुधाचे उत्पादन देते. या शेळीपासून मिळणारे दूध सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे.कान सरळ वरच्या दिशेने असतात. कासेचा आकार खूप मोठा असतो.
Wheat Rate: शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; सणांमध्ये गव्हाचे दर वाढणार
सानेन शेळीचे वजन आणि दूध
एका प्रौढ नर सानेन शेळीचे वजन सुमारे ७०-९० किलो असते आणि प्रौढ मादी शेळीचे वजन हे ६५ ते ७० किलोपर्यंत असते. २६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. तसेच या शेळीचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे.
महत्वाच्या बातम्या
Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा ठरेल? वाचा तुमचे राशीभविष्य
Garlic Farming: लसूण शेतीमधून 6 महिन्यांत तब्बल 10 लाखांपर्यंत मिळणार नफा; फक्त 'या' गोष्टींची काळजी घ्या
Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Published on: 24 August 2022, 09:49 IST