देशात मोठ्या प्रमाणात पशु पालन केले जाते, यात प्रामुख्याने म्हैस पालन मोठ्या स्तरावर केले जाते. देशात अनेक पशुप्रेमी आहेत जे की कोट्यावधी रुपयांचे पशुचे संगोपन करतात. नुकत्याच सारंगखेडा घोडेबाजारात आलेल्या घोड्याना कोट्यावधी रुपयांची बोली लागली होती, आणि या अश्वाची चर्चा सर्वत्र बघायला मिळत होती. सांगली मध्ये स्वाभिमानी संघटना द्वारे आयोजित प्रदर्शनात देखील एक 80 लाखाचा गजेंद्र रेडा मोठ्या चर्चेत आला होता. पण आज आम्ही आपणांस ज्या रेड्याविषयीं माहिती सांगणार आहोत त्या रेड्याची किंमत ही तब्बल 11 कोटी रुपये आहे आणि या रेड्याचे नाव रुस्तम असे आहे.
रुस्तमला मिळाला हा पुरस्कार (Rustam received 5lakh rupee and award)
रुस्तम रेड्याच्या मालकाचे नाव दलेल सिंह असे आहे, आणि ते हरियाणातील (Hariyana) जिंद जिल्यातील गतौली गावात राहतात. 18 डिसेंबरला हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या पशू प्रदर्शनात एका चॅम्पियनशिपमध्ये रुस्तमने बाजी मारली होती. त्याला विजयी झाल्याबद्दल कृषक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्याला पाच लाख रुपये पुरस्कार राशि देखील देण्यात आली. रुस्तम हा नऊ वर्षाचा रेडा आहे आणि त्याची लांबी पंधरा फूट आहे तर उंची सहा फूट इतकी आहे.
रुस्तमचा खुराक आहे विशेष (Rustam's diet is special)
रुस्तमच्या मालकानुसार, त्याच्या आहारात 8 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 3.5 किलो गाजर, 300 ग्रॅम देशी तूप, 3 किलो हरभरा, अर्धा किलो मेथी, चाऱ्याचा समावेश आहे. याशिवाय हा रेडा दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 ते 3 किमी चालतो.
रुस्तमच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, रुस्तमने 26 राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत याशिवाय रुश्तमने 6 आंतरराष्ट्रीय विजेतेपदही आपल्या नावावर अर्जित केले आहे. त्याच्या मालकाने असा दावा केला आहे की, रुश्तम आत्तापर्यंत 50 हजार बछड्यांचा बाप देखील झाला आहे.
Published on: 30 December 2021, 02:50 IST