Animal Husbandry

भारताच्या अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जवळ जवळ भारताची 65 टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. हरित क्रांतीनंतर शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. परंतु बऱ्याच वर्षापर्यंत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता ही होतीच. परंतु आता टप्प्याटप्प्याने शेतकरी शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेत आहे. त्याबरोबरच आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

Updated on 02 July, 2021 11:45 AM IST

 भारताच्या अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. जवळ जवळ भारताची 65 टक्के लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. हरित क्रांतीनंतर शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. आपला भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. परंतु बऱ्याच वर्षापर्यंत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता ही होतीच. परंतु आता टप्प्याटप्प्याने शेतकरी शेतीमध्ये  उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न घेत आहे. त्याबरोबरच आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

शेती प्रमाणेच पशुपालना मध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात दुग्ध उत्पादन करून स्वतःच्या आर्थिक प्रगती करीत आहे. पशुपालन क्षेत्रामध्ये सुद्धा अत्याधुनिक प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्यापैकीच एक म्हणजे आर एफ आय डी तंत्रज्ञान हे होय. या लेखात आपण या तंत्रज्ञानाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

 काय आहे आरएफआयडी तंत्रज्ञान?

 हे तंत्रज्ञान आता शेती आणि पशुपालन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात झाली आहे तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असे आहे की, यामध्ये स्मार्ट  द्वारे साठवलेला संगणकीय डेटा व्हिडिओ लहरींद्वारे ऑपरेटर पर्यंत पोहोचविला जातो. रेडिओ लहरींचा वापर हा  संबंधित स्वयंचलित रीत्या ओळखण्यासाठी आम्ही संकलित केलेली माहिती थेट कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय नोंद करण्यासाठी केला जातो

 या तंत्रज्ञानाचे प्रकार

या तंत्रज्ञानामध्ये प्रमुख्याने ट्रान्सरिसिवर, ट्रान्सपॉंडर आणि सॉफ्टवेअर हे तीन घटक असतात. आर एफ आय डी सिस्टम मध्ये अँटेना आणि ट्रान्स रिसिवर तसेच ट्रान्सपॉंडर असतो. त्यामध्ये अँटेना ट्रान्सपॉंडर सक्रिय करणारे सिग्नल प्रसारित करण्यासाठी रेडिओ वारंवारता वापरली जाते. ही वारंवारिता सक्रिय झाल्यावर टॅग  पुन्हा डेटा प्रसारित करतो.

या एक एक प्रकारची माहिती घेऊ

  • ट्रान्सपॉंडर: याला वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाईस असे म्हणतात. हे ट्रान्सपॉंडर शरीरात रोपण केले जाते. त्यामध्ये एक सिलिकॉन चीप आणि अन्टेना असतो ज्या द्वारे ते सिग्नल प्राप्त करतात. या चिप मध्ये देशाचा कोड, जनावरांच्या ओळखीसाठी बारा अंक आणि तीन अंक असतात. आर एफ आय डी टॅग  कडे स्वतःचा ऊर्जास्त्रोत नसतो. सक्रिय टॅग मध्ये त्याला अंतर्गत उर्जास्त्रोत असतो. जेव्हा ट्रान्स पाँडर रीडर  च्या कक्षात प्रवेश करतो तेव्हा त्याचा डेटा  रीडर द्वारे  मिळवला जातो.
  • कानातील ट्रान्सपॉंडर टॅग : हा टॅग  एक इंच व्यासाचा आहे. त्यामध्ये जमा झालेली  माहिती ही आय एसओ मानकानुसार काटेकोरपणे साठवले जाते.
  • बोलस ट्रान्सपॉंडर – बोलस ट्रान्सपॉंडर बायोमेडिकल ग्लासच्या कॅप्सूल ने झाकलेली असतात. त्वचेखाली इंजेक्शनद्वारे दिले जातात.. जनावरे रवंथ करतात त्या जनावरांच्या पुढील पोटात तोंडी बॉलिंग गन वापरून दिले जातात.
  • इलेक्ट्रॉनिक कॉलर – या कॉलर गळ्यातील पट्टा प्रमाणे असतात. ही टॅग स्कॅनर द्वारे वाचता येऊ शकेल अशा इलेक्ट्रॉनिक नंबर सह संलग्न असते. ही इलेक्ट्रॉनिक कॉलर वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते कारण जनावर चरताना प्रोटेशन्स वर वाकले गेले तर गुदमरल्यासारखे होऊ शकते.
  • मायक्रो चिप्स – हा एक जनावर ओळखण्याचा एक प्रकार आहे. त्यामध्ये सूक्ष्म  रेडिओ ट्रान्सपॉंडर आणि एक अँटेना वापरलेला असतो. मानेजवळ, खांद्याच्या  बाजूला किंवा कानाच्या खाली यंत्राच्या साह्याने मायक्रोचीप जनावराच्या त्वचेखाली बसवले जाते. ही बरीच वर्षे टिकते. टॅग सह  निवडलेले आर एफ आय डी डिवाइस जनावरांच्या जन्मानंतर लगेचच वापरण्यास सुरूवात करावी.

 

 

 

  • ट्रान्स रिसीवर – ट्रान्स  रिसिवर असे उपकरण टॅग ला इलेक्ट्रॉनिक सिग्नल पाठवते.
  • पोर्टेबल आर एफ आय डी रीडर – हे उपकरण जनावरांचे हालचाल ओळखण्यासाठी वापरले जाते. या माध्यमातून जनावराची ओळख पटविता येते.
  • हर्ड्समन सॉफ्टवेअर – जनावरांचा कळप व्यवस्थापन करण्यासाठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त आहे.

 

तंत्रज्ञानाचे उपयोग

  • टॅग मध्ये 12 क्रमांक झालेला ओळख क्रमांक आहे. टेक्निशन याला विशेष साधना सह  चिकटवतात. याद्वारे पशुपालकास युआयडी, संबंधित मालकाचे नाव, प्रजनन तपशील आणि जनावराची लसीकरणाची स्थिती याची नोंद असलेले  कार्ड दिले जाते. त्याचे सर्व माहिती डाटाबेस मध्ये गोळा केली जाते.
  • याचा उपयोग जनावरांची ओळख, चोरी वर नियंत्रण, जनावरांची होणारी वजन वाडा मिळवण्यासाठी देखील करतात. जनावराची या कर्जाची फसवणूक रोखण्यास देखील मदत होते. संबंधित जनावर अगोदर कर्जासाठी तारण ठेवण्यात आले होते की नाही हे पण कळते.
  • हे टॅग स्वस्त असून त्यांचे सरासरी आयुष्य 30 वर्षापर्यंत असते.
  • राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाने इन्फॉर्मेशन नेटवर्क  फॉर ॲनिमल प्रॉटडक्टिविटी अँड हेल्थ  या प्रकल्पामध्ये भटक्या जनावरांचा धोका रोखणे आणि विमा घोटाळा रोखणे तसेच गो रक्षणासाठी मायक्रोचीपस वापरले जातात.

 

English Summary: RFID technology for animal
Published on: 02 July 2021, 11:45 IST