Animal Husbandry

कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. ज्या कोंबड्या या आजारातून बऱ्या होतात, त्या अंडी देणे बंद करतात. अंड्यांचे प्रमाण कमी होते.

Updated on 05 April, 2022 10:56 AM IST

कोंबड्यांमध्ये मानमोडी या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. ज्या कोंबड्या या आजारातून बऱ्या होतात, त्या अंडी देणे बंद करतात. अंड्यांचे प्रमाण कमी होते.

या आजाराचा प्रादुर्भाव माणसांनादेखील होतो. आणि कंजक्तायव्हीटिस ( डोळे येणे ) हा आजार होतो. मानमोडी या आजारावर रोगप्रतिबंधक लसीकरण हाच चांगला उपाय आहे.

 कोंबड्यांमधील मानमोडी या आजाराला राणीखेत किंवा न्यू कॅन्सल डिसीज देखील म्हणतात. हा आजार अतिशय संसर्गजन्य असून,सर्व भागात आढळतो. हा आजार प्रथम इंग्लंड मध्ये न्यू कॅन्सल येथे 1927 मध्ये आढळला. उत्तर भारतात उत्तर प्रदेशातील राणीखेत या डोंगराळ भागात 1928 मध्ये आढळून आला.

नक्की वाचा:मोठी बातमी! नॅनो युरिया वापरल्याने प्रति एकर 2000 रुपये उत्पन्न वाढणार: इफको

1) कारणे :

1) हा रोग लॅटोजेनिक, मेसोजेनिक, आणि व्हेलोजेनिक विषाणू पासून होतो. विषाणू कोंबड्यांच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम करतात.

2) पचन संस्था,यकृत, श्वसनेन्द्रीय आणि मज्जासंस्थेवर दिसून येणाऱ्या लक्षणावरून या आजाराचे विषाणू विभागलेले आहेत.

3) लेंटोजेनिक विषाणूमुळे कोंबड्यांना श्वास घेताना त्रास होतो. अंडी उत्पादनात घट येते.

4) मेसोजेनिक विषाणूंमुळे कोंबड्यांना हिरवी हगवण लागते. पंख, पाय लुळे पडतात, मान वाकडी होते.

5) व्हेलोजेनिक विषाणूंमुळे कोंबड्यांना श्वासोच्छवास अत्यंत त्रास होतो. रक्ताची हगवण लागते.

2) प्रसार:

1) या आजाराचा प्रसार हवेच्या माध्यमातून होतो. आजारी कोंबड्यांच्या विष्टीवाटे, श्वासावाटे, या आजाराचे विषाणू वातावरणात मिसळतात. त्यामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे शेडमधील खाद्य भांडी पाण्याची भांडी देखील दूषित होतात.

2) शेड मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, बूट इत्यादी दूषित होऊन रोगाचा प्रसार होतो.

3) आजारी कोंबड्यांच्या विष्टेद्वारे शरीरा बाहेर पडलेले रोग कारक विषाणू वातावरणात सहा महिने राहतात.

4) आजाराने मृत्यू पावलेल्या कोंबड्यांची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे त्यापासून आजाराचा प्रसार होतो.

5) मांजर, कुत्रे, कामगार हे एका फार्मा वरून दुसऱ्या फार्मवर आजाराचा प्रसार करतात.

नक्की वाचा:बातमी कामाची! हवामान खात्याचा उष्णतेच्या लाटेचा इशारा; कृषी विभागाने दिला मोलाचा सल्ला

3) लहान पिलातील लक्षणे:

1) आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास पिले ठसकतात, नाकातून पाणी येते.

2) चोच उघडी ठेवून श्वास घेतात, श्वास घेताना आवाज होतो.

3) कोंबड्या सुस्त राहतात, एका ठिकाणी कोपऱ्यात गर्दी करुन उभे राहतात.

4) पांढरी पाण्यासारखी विस्टा आढळून येते.

5) विषाणूंचा प्रादुर्भाव मज्जासंस्थेवर झाल्यास कोंबड्यांना चालना येत नाही, थरथर कापतात, काही वेळा लंगडतात.

4) मोठ्या कोंबड्यातील लक्षणे :

1) श्वास घेताना त्रास होतो, आवाज येतो.

2) कळपातील कोंबड्या एकाएकी आजारी पडतात.

3) कोंबड्यांना पाण्यासारखी संडास होते.

4) विष्टेचा रंग हिरवट व खडूसारखा असतो.

5) अंडी देण्याचे प्रमाण एकदम कमी होते.

6)अंड्याचे कवच मऊ होते,आकार बदलतो.

7) अंड्यातील पांढरा बलक पाण्यासारखा पातळ होतो.

5) निदान :

1) लहान आणि मोठ्या कोंबड्या तील लक्षणावरून मरणोत्तर तपासणी.

2) प्रोव्हेट्रीक्सलस रक्ताचे ठिपके दिसून येतात.

3) फुफुसामध्ये रक्त जमा झालेले आढळून येते.

4) गिझार्ड रक्त जमा झालेले आढळून येते. त्याप्रमाणे जखमा किंवा फोड झालेले आढळून येतात.

5) डोळ्यांच्या आतील कातडीवर रक्त जमा झालेले दिसून येते.

6) उपचार:

 या आजारावर कोणतेही खात्रीलायक उपचार नाहीत. आजार होऊ नये म्हणून पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली अँटिबायोटिक्स चा वापर करावा.

नक्की वाचा:तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा

7) लसीकरण :

1) लासोटा लस पाच ते सात दिवस वयाच्या पिलांना नाकात एक थेंब टाकून द्यावी.

2) मुलेश्वर किंवा आरटूबी लस वयाच्या साठाव्या आठवड्यात इंजेक्शनद्वारे पंखा मधून द्यावी.

8) लसीकरण :

1) शेडमध्ये स्वच्छता राखावी.

2) आजाराने मेलेल्या कोंबड्या जाळून टाकाव्यात.

3) बाहेरच्या व्यक्तींना फार्मवर प्रवेश देऊ नये.

4) आजाराचे निदान झाल्यावर आजारी कोंबड्या वेगळ्या कराव्यात. त्यांच्या खाद्य पाण्याची व्यवस्था वेगळी करावी.( स्त्रोत- ॲग्रोवन)

English Summary: restrictive remedy is useful in ranikhet disease in poultry
Published on: 05 April 2022, 10:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)