भारताचा विचार केला तरआपल्याकडे जवळजवळ 60 विषारी सापांच्या जाती आढळतात.यामध्ये अत्यंत विषारीनाग, घोणस, मण्यार आणि फुरसे या जातीविषारी आहेत. जनावरांना जर सर्पदंशामुळे विषबाधा झाली तर बाईचे उपचार करून आटोक्यात आणावी नाहीतर जनावरांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. या लेखात आपण सर्पदंश यानंतर जनावरातील दिसून येणारी लक्षणे पाहू.
सर्पदंश यानंतर जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे
अ-नाग दंश:
- साप चावल्यानंतर प्रमुख्याने मेंदू आणि हृदय या अवयवांना प्रामुख्याने इजा होते.नाग दंश झाल्यानंतर बाधित पशूंमध्ये चावल्याच्या जागी सूज येते,तोंडातून लाळ गळते, अर्धांगवायू सदृश्य लक्षणे दिसतात तसेच जनावरांचा तोल जातो अशी लक्षणे दिसून येतात.
- जर वेळेत उपचार केले नाहीत तर श्वसनसंस्थेच्या अर्धांगवायू ने जनावरे मृत्यू पावतात.
ब- मन्यार दंश:
- या जातीच्या सापांमध्ये मज्जासंस्था तसेच रक्ताची निगडित अवयवयांना इजा करणारे विष असते.
- या जातीचा साप चावलेल्या ठिकाणी जनावरांमध्ये मोठी सूज येते, श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो,रक्तस्राव होतो तसेच हृदयाचे ठोके वाढतात,ताप येणे,अशक्तपणा आणि नंतर बसून राहणे अशी लक्षणे दिसतात.
- फुरसे आणि घोणस दंश:
- या जातीच्या सापांमध्ये रक्त गोठवनथांबवणारे,तसेच रक्तातील लाल पेशी नाहीसा करणारे आणि रक्तस्राव करणारे विषारी घटक असतात.
- जर या जातीचा साप जनावरांच्या पायावर चावला तर सुज मोठ्याप्रमाणात वरच्या दिशेने चढत जाते.जनावरांमध्ये वेदना होते, अस्वस्थ वाटते, चालताना लगडतात आणि खाणेपिणे मंदावते इत्यादी लक्षणे दिसतात.
- तोंडाच्या भागात जर दंश केला असेल तर तोंडावर सूज येते. ती जबड्याच्या खाल्ली असेल तर जनावरांना श्वसनाला त्रास होतो.
- साप चावल्यानंतर जनावरांमध्ये रक्त गोठवणाऱ्या पेशींची संख्या कमी होते. त्यामुळे उपचाराला विलंब झाला तर आतीरक्तस्राव होऊन जनावरांमध्ये रक्तक्षय होतो. अति रक्तस्राव झाल्यामुळे जनावरे दगावू शकतात.
साप चावल्यानंतर करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना
- जनावरांना सुरक्षित ठिकाणी निवारा उपलब्ध करावा.
- जनावरांच्या गोठ्यात आणि आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारची अडचण,अडगळ असू नये.
- दाट असलेल्या गवतामध्ये जनावरांना चरायला सोडू नये. जनावरे चरायला सोडल्यानंतर नियमितपणे व्यवस्थित लक्ष ठेवावे.
- जनावरांना सर्पदंश झाल्याचे निदान झाल्यास दंश झालेल्या ठिकाणी रक्तस्राव,सूज येणे अशी लक्षणे अर्ध्या तासात दिसून आल्यास तात्काळ पशुवैद्यकाकडून उपचार करावा.
- सर्पदंश झाला म्हणून किंवा जनावरांच्या शेजारून सापगेलाम्हणूनपशुपालकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. जनावरांच्या पायावर किंवा तोंडावर सूज येण्यास सुरुवात होणे किंवा दंश झालेल्या ठिकाणी चाव्याची खूण दिसणे आणि रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसली तरच तात्काळ पशुवैद्यक डॉक्टरांची मदत घ्यावी.
सर्पदंश यामध्ये प्राथमिक निदानात महत्त्वाची माहिती
पशुपालकांनी जनावराला सर्पानेचावा घेतल्याचे पाहणे किंवाकुरणामध्ये चरताना जनावर एकदम भीतीने ओरडणे,उड्या मारणे किंवा जास्त अस्वस्थ होणे अशी लक्षणे आणि त्यानंतर पायावर, तोंडावर सूज येणे,चावल्याच्या ठिकाणाहून काही प्रमाणात रक्तस्राव होणे ही माहितीसर्पदंशाच्या प्राथमिक निदानात महत्त्वाची ठरते.अशावेळी पशुवैद्यकाकडून तात्काळ उपचार करून घ्यावेत.
Published on: 13 September 2021, 07:13 IST