Animal Husbandry

भारतात शेतीसमवेत पशुपालन आणि मुख्यता शेळीपालन केले जाते. अलीकडे अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शेतीनंतर शेळीपालन हा उदरनिर्वाहसाठी महत्वाचा व्यवसाय बनला आहे. शेळीपालन दोन महत्वाच्या हेतूसाठी केले जाते एक म्हणजे दुध उत्पादणासाठी आणि दुसरे म्हणजेच मांस उत्पादणासाठी. मांसासाठी नेहमी मेंढीपालन किंवा शेळीपालन केले जाते.

Updated on 15 September, 2021 7:45 PM IST

भारतात शेतीसमवेत पशुपालन आणि मुख्यता शेळीपालन केले जाते. अलीकडे अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी शेतीनंतर शेळीपालन हा उदरनिर्वाहसाठी महत्वाचा व्यवसाय बनला आहे. शेळीपालन दोन महत्वाच्या हेतूसाठी केले जाते एक म्हणजे दुध उत्पादणासाठी आणि दुसरे म्हणजेच मांस उत्पादणासाठी. मांसासाठी नेहमी मेंढीपालन किंवा शेळीपालन केले जाते.

 देशभरात मेंढीपालन आणि शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते, ग्रामीण भागात हे रोजगार आणि उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मेंढी आणि शेळी यांची कमाई त्यांचे वजन किती आहे यावर अवलंबून असते. मेंढ्या आणि बकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे रोग उद्भवतात, ज्यामुळे मेंढी आणि बकरीचे वजन कमी होते. आज आपण ह्या लेखात शेळीचे किंवा मेंढीचे वजन वाढवण्याचे उपाय जाणुन घेणार आहोत.

 शेळीचे कळप बनवताना काळजी घ्या

कळपात असलेल्या मेंढ्या किंवा शेळ्या दाण्यासाठी किंवा चारासाठी परस्पर स्पर्धा करतात त्यामुळे देखील बकऱ्यांचे वजन कमी होऊ शकते. साधारणपणे, प्राण्यांच्या कळपात काही व्यवस्थापनच्या कमतरतेमुळे थोडे दुर्बल आणि विनम्र असलेल्या प्राण्यांमध्ये शरीराचे वजन कमी होते.

मजबूत आणि मोठे पशु दुर्बल असलेल्या पशुच्या अन्न आणि जागेवर आपला अधिकार गाजवतात. यामुळे काही दुर्बल पशुना अन्न भेटत नाही, आणि असुरक्षित पशु अधिक असुरक्षित बनतात. म्हणून वय, जाती, लिंग, शारीरिक स्थिती इत्यादीनुसार पशुचे गट करणे नेहमीच योग्य असते. म्हणुन शेळीपालनात देखील कळप करताना ह्या सर्व्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

 खनिज क्षारांच्या कमतरतेमुळे देखील रोग होऊ शकतात परिणामी वजन कमी होते

कोबाल्ट, कॉपर आणि सेलेनियम हे पशुच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषक घटक आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे किंवा असंतुलनामुळे, जनावरांचे वजन कमी होतात.  कोबाल्टची कमतरता शरीराचे वजन वाढणे थांबवते. कोबाल्ट नैसर्गिकरित्या जास्त पर्जन्यमान, लिंचिंग, उच्च पीएच,जास्त मॅंगनीज, कोरडी माती, रेताड किनारपट्टी माती इत्यादींमध्ये कमी प्रमाणात आढळते.  त्याचप्रमाणे कॉपरच्या अभावामुळे कोकराचा विकास कमी होतो किंवा मृत्यूही होतो, ज्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होते.

सेलेनियम हा मेंढीपालन आणि शेळीपालनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे, मादी प्राण्यांमध्ये गर्भपात आणि प्रजननक्षमतेची समस्या खूपच वाढते, ज्यामुळे जन्माला येणारे कोकरे कमकुवत जन्माला येतात. त्यांचा वाढही रोखली जाते, आणि जरी कोकरे जिवंत राहिले तरी अशा कोकऱ्यांमध्ये अचानक मृत्यूची समस्या अधिक दिसून येते. 

याला श्वेत स्नायू रोग म्हणतात. या समस्यांचे निदान करण्यासाठी, जनावरांना खनिजाची पावडर योग्य प्रमाणात दिले पाहिजे, आणि ताबडतोब पशु वैज्ञानिकाचा व पशुसेवकाचा सल्ला घ्यावा.

English Summary: remedy for growth weight of goat and ship
Published on: 15 September 2021, 07:45 IST