शेतकरी शेतीसोबत पशूपालनाचा जोडव्यवसाय (attachment business) करून चांगले उत्पादन घेत असतात. मात्र शेतकऱ्यांना अशा गायींविषयी माहिती असणे गरजेचे आहे, ज्यातून चांगले उत्पन्न मिळेल. आपण या गायीविषयी माहिती जाणून घेऊया.
ग्रामीण भागात बरेच शेतकरी दूध व्यवसाय (Milk business) करून चांगले उत्पन्न घेत आहेत. लाल कंधारी गाय महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात आढळते. मात्र आता त्यांची संख्या इतर राज्यांमध्येही वाढली आहे.
या गायीचे पालन करणे हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानले जात आहे.माहितीनुसार गाईची ही जात कंधारच्या राजांनी चौथ्या शतकात विकसित केली होती याला त्याला लाखलबुंडा असेही म्हंटले जाते.
Soybean Market Price: सोयाबीन बाजारभावात मोठा बदल; जाणून घ्या सोयाबीचे दर
शेतकऱ्यांना जास्त मेहनत करण्याची गरज नाही
शेतकरी मित्रांनो या गाईच्या संगोपनासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. त्याला खायला जास्त चारा लागत नाही. या जातीच्या गायी गडद तपकिरी आणि गडद लाल रंगाच्या (Dark red color) असतात.आणि त्यांचे कान लांब असतात. इ. बाबीनुसार तुम्ही गाईची निवड करू शकता. या जातीची गाय 40 ते 50 हजार रुपयांना विकली जाते.
संगोपन असे करा
या गाईच्या संगोपनासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. तसेच या गाईला खायला जास्त चारा लागत नाही. याशिवाय त्यांच्या राहणीमानाचे व्यवस्थापन (Management) योग्य करणे गरजेचे आहे. व्यवस्थापन जितके चांगले तितके चांगले उत्पादन आणि नफा तुम्ही मिळवू शकता.
Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत
इतके दिवस दूध देऊ शकते
ही जात एका वर्षात 230 ते 275 दिवस दूध देऊ शकते. महत्वाचे म्हणजे कोरडा कालावधीमध्ये 130 ते 190 दिवसांपर्यंत दूध देऊ शकते. तसेच दररोज दीड ते चार लिटर दूध (Four liters of milk) देण्याची क्षमता आहे. गायीचा पहिला बछडा 30 ते 45 महिने असतो, तर सरासरी प्रजनन कालावधी 360 ते 700 दिवस असतो.
महत्वाच्या बातम्या
गॅस सिलिंडर धारकांसाठी महत्वाची बातमी; एलपीजीवर सबसिडी सुरू, मिळतेय 'इतकी' रक्कम
Agriculture Without Soil: मातीविना शेती करता येणार 'या' तंत्राने; शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार
काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल
Published on: 24 August 2022, 11:54 IST