शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालनाचे संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असतील तसेच आरोग्य विषयक समस्या, पशुपालना विषयी विविध शासकीय योजना इत्यादी अनेक प्रकारचे जबाबदारीही पशुसंवर्धन विभागा वर असते.
पशुपालन व्यवसाय हा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे या विभागांतर्गत असलेले कर्मचारी मेहनत करून पशुपालनासाठी सहकार्य करीत असतात. राज्यातील पशुसंवर्धन विभागात जवळजवळ रिक्त असलेल्या पदे भरण्यासाठी तब्बल 2500 पदेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार त्याचे वृत्त आहे.
त्यामुळे नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांना साठी ही सर्वोत्तम संधी आहे. आपल्याला माहित आहेच कि कोरोना मुळे दोन वर्षापासूनयाच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या.परंतु आता सगळी परिस्थिती सर्वसामान्य होत असताना राज्य शासनाकडून विविध खात्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
अंतर्गत पशुसंवर्धन विभागात देखील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले ते माहुर झरी पशुवैद्यकीय दवाखान्याचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालन हा व्यवसाय अतिशय महत्त्वाचा घटक असून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी पशुसंवर्धन विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो.
या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील 2500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले की या पुढील काळात पशु व पक्षी पालनतूनच ग्रामीण भागात स्थानिक रोजगाराची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून तसेच पशु वैद्यकीय रुग्णालयामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाले आहेत.सास परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे आरोग्य निकोप राहण्यास मोठी मदत होणार आहे.
सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे देखीलमंत्री सुनील केदार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:रेशन घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, सर्वसामान्य लोकांना मोठा धक्का
Published on: 25 May 2022, 09:18 IST