Animal Husbandry

शेतकऱ्यांचा फायदेशीर जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन हा होय. परंतु मागील वर्षापासून कोरोना पुढे पसरलेल्या अफवा आणि नंतरच्या काळात आलेल्या बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री व्यवसायाला जबर धक्का बसला होता.

Updated on 29 August, 2021 8:46 PM IST

 शेतकऱ्यांचा फायदेशीर जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन हा होय. परंतु मागील वर्षापासून कोरोना पुढे पसरलेल्या अफवा आणि नंतरच्या काळात आलेल्या बर्ड फ्लूच्या बातम्यांमुळे पोल्ट्री व्यवसायाला  जबर धक्का बसला होता.

 परंतू कुकूटपालक अशा धक्क्यातून सावरत आज मितीस नवीन उच्चांक काढताना पाहायला मिळतो.जर मागच्या वर्षी असलेल्या चिकनच्या दराचा विचार केला तर त्यावर 130 रुपये ते दीडशे रुपये इतका खाली आले होते. परंतु या वर्षी ते दोनशे ते दोनशे वीस रुपयांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळते. कोंबडीची किंमत ही सरासरी गेट  फार्म किंमत यावरून ठरत असते. आता फार्म गेट किंमत 95 रुपये प्रतिकिलो वरून वाढून 120 रुपये प्रति किलो झाले आहे. कोंबड्यांच्या फार्म गेट किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे कोंबड्यांच् प्रति किलो भावा मागेवाढ झाली.

 तसेच चिकनच्या वाढत्या किमती मागे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या खाद्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत.त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोंबड्याचा महत्त्वाचा खुराक मानल्या जाणाऱ्या सोया केक आणि मक्‍याच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्याचं पाहायला मिळाला आहे. गेल्या तीन-चार महिन्यात सोया चे  दर प्रतिकिलो 35 रुपयांवरून तब्बल 76 रुपयांवर गेले आहेत तर दुसरीकडे मग त्याची किंमत देखील 14 रुपये प्रति किलो वरून तब्बल वीस रुपये किलो झाली आहे.

 तसेच कोरोना काळापासून नागरिक आपल्या आरोग्याविषयी सजग झाले आहेत. डॉक्टरांकडून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी बऱ्याच वेळा चिकन चा वापर करण्यास सांगितले जाते.चिकन आणि अंडी यामुळे शरीराला असलेल्या आवश्यक घटक मिळतात व शरीराची रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होते असं डॉक्टर सांगतात.त्यामुळे आहारात चिकन आणि अंडी यांचा वापर वाढल्याचे पाहायला मिळतंय.

त्यामुळे एकीकडे वाढती मागणी आणि दुसरीकडे कमी उत्पादन ही बाब देखील चिकनच्या वाटते किमतीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. या चिकन आणि अंड्याच्या वाढलेल्या किमती या जवळजवळबरेच दिवस अशाच करतील असा अंदाज वर्तवला जात आहे कारण तोपर्यंत कुक्कुटपालन व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी होत नाहीत तोपर्यंत चिकन चादर चढाचा राहील असा अंदाजवर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती.ज्यामुळे शेतकऱ्यांना लागणारा खर्च कमी होईल.हे त्यामागचे कारण होते.

English Summary: reason behind growth rate of chicken and eggs
Published on: 29 August 2021, 08:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)