जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी आणि खनिज मिश्रण यांची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा अभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. संकरित पिके जेवढे जास्त उत्पादन देतात तेवढे जास्त अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेतात. तसेच शेतात सारखे तीच ती पिके घेतल्याने जमिनीत अन्नघटकांची कमतरता वेळेवर पूर्ण न केल्याने पिकांची वाढ खुंटते उत्पादनात घट येते तसेच चाऱ्याची प्रत देखील खालावते.
जमिनीत खनिज मिश्रणाच्या अतिरिक्त प्रमाण नसल्याने ते चाऱ्यामध्ये येत नाहीत.कसा निकृष्ट दर्जाचा चारा जनावराने खाल्यास जनावरे कुपोषित होतात.या लेखात आपण जनावरांनामध्ये दिसून येणारी खनिज द्रव्यांचा कमतरतेची लक्षणे जाणून घेऊ.
दुधाळ जनावरांना मधील खनिजांच्या कमतरतेची प्रमुख कारणे
1-जमिनीमध्ये सतत घेण्यात येणारे एकच पीक उत्पादन यामुळे जमिनीतील खनिज मिश्रण हळूहळू नाहीशी होतात. चारा पिकांच्या तसेच माती परीक्षण अहवाल आच आवश्यकतेनुसार जमिनीत अन्नद्रव्यांचे पुरेशा प्रमाणात वापर न करणे.
2-सुधारित पिकांच्या जाती मध्ये अधिक पिक उत्पादन मिळते. पण त्यावेळी भरपूर अन्नद्रव्ये जमिनीतून सोडले जातात व त्या वेळी दुसरे पीक चांगले येत नाही. व येणाऱ्या पिकाच्या चाऱ्याची प्रत खालावते.
सतत जनावरांना ऊस, उसाचे वाडे,कडवळखाऊ घातल्यानेया कार्याच्या माध्यमातून खनिज मिश्रणे जनावरांना उपलब्ध होत नाहीत.
4- जनावरांच्या आजारपणात त्यांची भूक मंदावते याकाळात पहिल्या आर पेक्षा कमी अधिक अन्नग्रहण केले जाते. त्यावेळी गरज असूनही खनिज मिश्रणे शरीरात पोहोचत नाहीत.
5- बरेचदा पशुपालक शेतकरी दूध उत्पादन चांगले मिळायला लागले की जनावरांच्या ग्रहण क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात हिरवा चारा खायला देतात त्यावेळी जनावरांमध्ये खनिज मिश्रणाची कमतरता जाणवते.
6-एक गोची दर दिवसाला साधारण अर्धा मिली रक्त शोषतात.तसेच जंत,कृमी, परजीवी कीटकांचा योग्यवेळी बंदोबस्त केला नाही तर पचन व शोषण झालेल्या खनिज मिश्रणाच्या नास होऊन कमतरता भासते.
खनिज मिश्रणाच्या कमतरतेची लक्षणे
- वासरांची जलद गतीने वाढ होत नाही. शरीरावरील केस उभे राहतात व तेज दिसत नाही. याच्या खडबडीत होते तसेच त्वचेचा आजार वाढतात.
- जनावरे पान्हा चोरते दूध देत नाही तसेच लवकर वाटते जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन डोळ्यातून पाणी गळते.
- गाई म्हशींच्या लहान वासरे त्यांच्यामध्ये अंधत्व येते.
- जनावरांचा भाकड कालावधी वाढतो. एका वर्षात 1 वेळेत मिळत नाही तसेच जनावरांच्या शरीरावर मांस दिसत नाही. गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किंवा कायमचे वांझपणा येते.
- जनावरे माज वेळेवर दाखवत नाहीत. तसेच माजाचा कालावधी कमी जास्त होतो.
- गाई-म्हशींच्या सडांची तोंड लवकर बंद झाल्याने काससुजी तसेच गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर सडातून सतत दूध ठिपकत असते
- दुधातील फॅट कमी होऊन त्याची प्रत खालावते. सडावर चिरा पडून जखमा होतात व त्या लवकर बऱ्या होत नाहीत. तसेच दूध काढताना जनावर लाथ मारते.
- गाय किंवा म्हैस विताना वासरू अडकण्याचा संभव असतो.तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही अडकून राहते.
- नवजात वासरांचे वजन कमी भरते तसेच अपूर्ण दिवसाचे वासरू जन्माला येते.
- जनावरांची पायाची हाडे,खूर, शिंगे, अपघात प्रसंगी किंवा जोरात धडक दिली यात मोडतात.
- जनावरांना खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बरीच जनावरे चप्पल, पिशव्या, गब्बर इत्यादी अखाद्य वस्तू खातात त्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊन जनावर फुगते.
Published on: 12 December 2021, 11:48 IST