दुग्ध व्यवसायात गाईच्या दुधाला अधिक मागणी असते, कारण गाईचे दूध हे पौष्टिक असते. तसे पाहिले तर गाईंचे आणि प्रकारच्या जाती आहे. काही गावठी तर काही संकरित या दोन विभागात गाईंच्या जातींचे वर्गीकरण करता येते.
परंतु या सगळ्या जातींमध्ये राठी गाय हे फार महत्वाची आहे. सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून तिला ओळखले जाते. या गाई मुख्यत्वे राजस्थानच्या बीकानेरपासून ते पंजाबच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात.राजस्थानमध्ये या गाईंना कामधेनू असे म्हटले जाते. पशु पालकांसाठी राठी गाय खूप फायदेशीर असते. या गाईच्या गुणधर्मांचा विचार केला तर साहिवाल गायीची मिळतेजुळते तिचे गुणधर्म आहेत. इतर गाई पेक्षा दूध देण्याची क्षमता या गाईंची जास्त असते. जर वातावरण पोषक असेल तर पशुपालक या गाईंपासून जास्तीचे दुधाचे उत्पन्न मिळू शकतात.
अगदी कमी आहारात या गायी जास्त दूध देतात. या गाईंच्या दूध देण्याच्या क्षमतेवर चा विचार केला तर सरासरी राठी गाई पंधराशे साठ लिटर दूध देतात. परंतु या गाईंची दूध देण्याची क्षमता ही 1062 ते 2810 लिटर असते. जर आपल्याला गाईंची पारक चांगली असेल तर आपण अधिकचे दूध उत्पादित करू शकता. प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. जर आपण समतोल आणि पौष्टिक आहार या गाईंना दिला तर 25 ते 30 लिटर पर्यंत या गाई दूध देतात.
राठी गाईची वैशिष्ट्ये
राठी गाय दिसायला आकर्षक असतात. या गाईंचा चेहरा रुंद असतो तसेच या गाईंचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. गाईंच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. तर शिंगे मध्यम आकाराची असून मागे वळलेली असतात. या गाईची शेपटी लांब असते. वय झालेल्या गाईंचे वजन हे साधारण 280 ते 300 किलोग्राम असते. विशेष म्हणजे या गाई कोणत्याही परिसरात राहू शकतात.
Published on: 25 March 2021, 01:54 IST