कमी आहार असतानाही ८ लिटर दूध देणारी राठी गाय

22 May 2020 04:08 PM By: KJ Maharashtra


दुग्धव्यवसाय गायीच्या दुधाला अधिक मागणी असते कारण त्या गायीचे दूध पौष्टीक असते.  गायीमध्ये अनेक जाती आहेत सर्व जातींमध्ये राठी गाय ही फार महत्त्वाची गाय असते. सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून राठी गायीला ओळखले जाते.  या गायी बीकानेरपासून ते पंजाबच्या सीमेपर्यंतच्या परिसरात आढळतात.  राजस्थानमध्ये या गायींना कामधेनु म्हटले जाते.  पशुपालकांसाठी राठी गाय खूप फायदेशीर असते.  या गायीचे बहुतेक गुणधर्म हे साहिवाल गायीशी मिळते जुळते आहेत.  दूध देण्याची क्षमता या गायींची खूप अधिक असते. जर वातारवण गायीसाठी पोषक असले तर पुशपालक या गायींपासून अधिक दुधाचे उत्पन्न मिळवू शकता.  कमी जरी आहार असला तरी या जातीच्या गायी दूध अधिक देत असतात.

दूध देण्याची क्षमता या गायींमध्ये अधिक असते. सरासरी राठी गायी १५६० लिटर दूध देतात. परंतु या गायींची दूध देण्याची क्षमताही १०६२ ते २८१० लिटर असते. जर आपल्याला गायींची पारख करता येत असेल तर आपण अधिकचे दूध उत्पादित करु शकता. तर प्रतिदिनी या गायी ८ - १० लिटर दूध देत असतात. जर आपण चांगला आहार दिला तर २५ ते ३० लिटर पर्यंतही या गायी दूध देत असतात.

राठी गायीच वैशिष्ट्ये - राठी गाय खूप आकर्षित असतात. या गायींचा चेहरा रुंद असतो. गायींचा आकार हा मध्यम स्वरुपाचा असतो. गायींच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. तर या गायींचे शिंग मध्यम आकाराची असतात शिंगेही वळलेली असतात. तर या गायींची शेपटी लांब असते. वय झालेल्या गायींचे वजन हे साधारण २८० ते ३०० किलोग्राम असते. विशेष म्हणजे या गायी कोणत्याही परिसरात राहू शकतात.

animal husbandry rathi cow rathi cow milk milk producation राठी गाय राठी गायींचे दूध उत्पादन पशुसंवर्धन
English Summary: rathi cow gives 8 liter milk per day

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.