Animal Husbandry

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ घेता येतो. मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मंत्री बलियान यांच्याकडे उसाप्रमाणे दुधाला हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे.

Updated on 23 July, 2022 3:14 PM IST

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यातून शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ घेता येतो. मात्र आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मंत्री बलियान यांच्याकडे उसाप्रमाणे दुधाला हमीभाव (Guaranteed price of milk) मिळावा अशी मागणी केली आहे.

उसाप्रमाणे दुधाला देखील हमीभाव (Warranty) मिळावा या मागणीसाठी अनेक शेतकरी संघटना आक्रमक होताना मागील काही दिवसांमध्ये दिसून आले. मात्र अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. याच मुद्द्यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची दिल्ली येथे भेट घेवून याविषयी चर्चा केली.

हे ही वाचा 
मोठी बातमी! 5 वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल 40,000 कोटींची केली कमाई

जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय (dairy business) टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं (Central Government) राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री संजीव बलियान (Union Minister Sanjeev Balian) यांच्याकडे केली आहे. दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता सध्या दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा 
आताची मोठी बातमी! 5 वर्षात विमा कंपन्यांनी तब्बल 40,000 कोटींची केली कमाई

याविषयी पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले, दुधाच्या दरासंदर्भातील विषयावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं.

महत्वाच्या बातम्या 
Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा
शेतकऱ्यांचे अच्छे दिन! फ्लॉवरच्या 'या' वाणाच्या लागवडीतून शेतकरी घेतोय लाखोंमध्ये उत्पन्न
मोठी बातमी! पशुपालकांसाठी घरपोच पशुरुग्ण सेवा; 'या' टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

English Summary: Raju Shetty Guaranteed price announced milk sugarcane
Published on: 23 July 2022, 03:09 IST