Animal Husbandry

पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. ज्यांना शेळीपालन स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

Updated on 21 August, 2022 3:55 PM IST

पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. ज्यांना शेळीपालन (Goat rearing) स्वतःचा व्यवसाय करायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

जर तुम्हाला शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही सरकारी कर्जाच्या मदतीने शेळीपालन करू शकता. 'शेळी पालन योजना' ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्र शासनाकडून (Maharashtra Govt) अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

जर तुम्हाला शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तर तुम्हाला शेळ्यांवर बँकेकडून कर्ज दिले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन शेळीपालन योजना २०२२ अंतर्गत १० शेळ्यांवर ४,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला स्थगिती, शेतकऱ्यांना तात्पुरती मलमपट्टी?

ही कर्जाची रक्कम कोणतीही सरकारी बँक, खाजगी बँक, स्मॉल फायनान्स बँक किंवा फायनान्स कंपनी (Finance Company) मधून देखील मिळवू शकते. राज्यातील पशुसंवर्धनाला (animal husbandry) चालना देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

सरकार म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतोय, फ्लॉवरची आली साडेनऊ रुपयांची पट्टी, शेती करायची तरी कशी?

शेळीपालन कर्जासाठी अर्ज असा करा

1) सर्वप्रथम तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन शेळीपालन कर्जासाठी अर्ज करा.
2) याठिकाणी तुम्हाला तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे आणि गोट फार्मशी संबंधित माहिती द्यावी लागेल.
3) उदा. अर्जदाराचे आधार कार्ड, रेशनकार्ड, वीज बिलाची छायाप्रत, शेळी फार्मचा प्रकल्प अहवाल, किमान ६ ते ९ महिन्यांसाठी बँक स्टेटमेंट, पासपोर्ट आकाराचा फोटो इ. देणे बंधनकारक आहे.
4) यानंतर तुमच्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तसेच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते.

महत्वाच्या बातम्या 
LIC आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर
'या' योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाखांचा रिटर्न; वाचा सविस्तर
शेतकऱ्यांनो पैसा कमवायचा ना? मग मांस उत्पादनासाठी अव्वल ठरणाऱ्या 'या' शेळीचे पालन करा

English Summary: raise goats have no money plan
Published on: 21 August 2022, 03:14 IST