सध्याच्या काळात स्मार्ट फोनमुळे जग अगदी जवळ येऊन ठेपले आहे, जे आपण विचार कराल ते आपल्या हातात सेकंदाच्या वेळेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर होताना दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेल्याने अनेक तरुण शाश्वत व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायात उतरले आहेत.
नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेळीपालन आधुनिक पद्धतीने करतानाच तो फायदेशीर करण्याचा सर्वजण प्रयत्न करतात यात सर्वात चांगला वापर स्मार्टफोनचा होऊ शकतो. शेळी-मेंढी, गाई व म्हशीचे योग्य नियोजन करण्यासाठी बाजारामध्ये धेनु अँप मोफत उपलब्ध आहे. शेळीपालन व्यवसाय करताना आहार, प्रजनन, आरोग्य व गोठ्यातील अचूक व्यवस्थापन तसेच प्राण्यांच्या नोंदी, शेळ्यांची खरेदी विक्री या अँपद्वारे आपण सहज करू शकता. तरुण वर्ग आधुनिकतेची सांगड घालत शेळीपालन व्यवसायाकडे वळलेला दिसून येत आहे.
हेही वाचा : शेळीपालन ; कृत्रिम रेतनामुळे शेळ्यांपासून होईल अधिक उत्पन्न
शेळीला गरीबाची गाई म्हणतात कारण कमी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय करता येतो. शेळ्यांसाठी जागा कमी लागते,चारा कमी लागतो, लहान प्राणी असल्याने व्यवस्थापन करणे सोईचे असते गरीब, शेतमजूर, कष्टकरी सहज शेळीपालन व्यवसाय करू शकतात. आणि त्यांचा चांगल्याप्रकारे उदरनिर्वाह करू शकतात. त्यामुळे शेळीला गरीबाची गाय म्हणून संबोधले जाते. शेळीपालनात शेळ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अचूक वापर केल्याने शारीरिक कष्ट कमी होऊन व्यवसायात दुप्पट वाढ होईल. तसेच नवीन व्यावसायिकांना खरंच शेळीपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर प्रत्येक शेळीपालनातील बारकावे लक्षात घेऊन खालील बाबींचा योग्य वेळी अवलंब करावा.
-
जाणून घ्या..यशस्वी शेळीपालन व्यवसायातील १०१ सूत्रे…
- शेड संबंधित-
१) शेडसाठी जागा निवडताना उंच माळरानावर हवेशीर ठिकाणी निवडावी.
२) शेड तयार करत असताना शेळी २४ तास गोठ्यात राहणार असल्याने तिचा आराम व व्यायाम होईल असे प्रशस्त शेड उभारावे.
३) गोठ्याची लांबी पूर्व पश्चिम असावी तसेच शेडमध्ये भरपूर प्रकाश व हवा खेळती राहील याची विशेष काळजी घ्यावी.
४) शेडवर सिमेंटचे पत्रे असतील तर त्यावर पंधरा रंग द्यावा जेणेकरून उन्हाची त्रीव्रता कमी होईल.
५) शेळ्यांना खरारा करण्यासाठी लाकडी किंव्हा सिमेंटच्या खांबांना काथ्याने गुंडाळावे.
६) शेळ्यांच्या शेडमध्ये २४ तास शुद्ध,स्वच्छ तसेच थंड पाण्याची सोय असावी.
७) पावसाचे पाणी शेडमध्ये येणार नाही अशी शेडची रचना करावी.
८) शेळ्यांचे शेड नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावे तसेच दर पंधरा दिवसांनी गोठ्यात कीटकनाशकाची फवारणी करावी.
९) शेडमध्ये रात्रीच्या वेळी शेळ्यांना त्रास होणार नाही अश्या स्वरूपाचे विजेचे बल्ब लावावेत.
१०) शेडला लागूनच एक खोली देखील असावी जेणेकरून पशुखाद्य, प्रथोमपचाराची पेटी, इ साहित्य तेथे ठेवता येईल.
११) घरापासून गोट फार्म खुप दुर असल्यास व आवश्यकता भासल्यास सी.सी टी.व्ही चा वापर जरूर करावा जेणेकरून मजुरांवर लक्ष ठेवता येते.
१२) गोठ्यामध्ये विजेची फिटिंग आवश्य करून करून घ्यावी जेणेकरून शेडला करंट लागणार नाही व त्यामुळे जीवितहानी टळेल.
हेही वाचा : शेळ्यांमध्ये बुरशीजन्य आजार का होतात? वाचा काय आहेत कारणे
-
शेळयां संबंधित-
पुढील बाबींचा उद्धेश लक्षात घेऊन शेळ्यांची निवड करावी.
१३) उस्मानाबादी शेळी मांसासाठी प्रसिद्ध आहे व ती अर्ध बंदिस्त शेळीपानासाठी फायदेशीर.
१४) संगमनेरी व शिरोही शेळी (मांसासाठी व दूधासाठी) अर्ध बंदिस्त शेळीपानासाठी फायदेशीर.
१५) बोअर जातीची शेळी मांसासाठी प्रसिद्ध आहे व ती बंदिस्त शेळीपानासाठी फायदेशीर.
१६) सानेन जातीची शेळी दुधासाठी खूप प्रसिद्ध आहे तिला दुधाची राणी देखील म्हणतात बंदिस्त शेळीपानासाठी फायदेशीर.
१७) शेळ्यांची खरेदी शक्यतो हिवाळ्यामध्ये करावी तसेच शांत स्वभावाच्या मातृप्रेम असणाऱ्या शेळ्या खरेदी कराव्यात.
१८) शेळीची कास शेळीला शोभेल अशी असावी जास्त मोठी व लोंबकळणारी नसावी तसेच तिला कासदाह झालेला नसावा.
१९) कासेला दोन पेक्षा जास्त सड नसावेत व सडांची रचना एकसमान असावी तसेच कास दोन्ही पायाच्या मधोमध असावी.
२०) इजा झालेले किंव्हा बंद असलेले सड अश्या विनाउपयोगी शेळ्या खरेदी करणे टाळावे.
२१) शेळीला डोळ्यांनी दिसते का त्यांना चालता येते का तसेच त्यांची खुरे खराब झालीत का याची स्वतःच्या डोळ्यांनी पाहणी करावी.
२२) शेळी खरेदी करताना सुधारित जातीची अधिक उत्पादनक्षम आपल्या वातावरणात सूट होणारीच शेळी खरेदी करावी.
२३) शेळ्यांची खरेदी उत्तम नियोजन असणाऱ्या माहितीच्या फार्म वरूनच करावी व त्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड घ्यावे.
२४) शेळी खरेदी करताना दुसऱ्या वेताची व गाभण शेळी अधिक फायद्याची ठरते.
२५) दुभती शेळी खरेदी करताना तिची धार काढून पाहावी दुधाची प्रत, प्रमाण तसेच रंग व वास पाहावा.
२६) शेळीची छाती भरदार असावी, बांधा आकाराने मोठी असावा तसेच तिची मान लांब असावी व तिच्या पाठीचा कणा ताठ ,सरळ व लांब असावा.
२७) शेळीचे केस मऊ व चमकदार असावेत.
२८) शेळ्यांच्या नाकातोंडातून तसेच डोळ्यातून घाण टाकणाऱ्या आजारी शेळ्यांची खरेदी करू नये.
-
गव्हाणी संबंधित-
२९) गव्हाणी मध्ये कुट्टी करून चारा देता येतो त्यामुळे चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते.
३०) गव्हाणीमध्ये शेळ्यांच्या संख्येनुसार चारा मोजून देता येतो.
३१) शेळ्यांच्या वयानुसार वेगवेगळ्या गव्हाणी कराव्यात व त्या मध्यभागी ठेवाव्यात.
३२) गव्हाणी मध्ये चारा टाकल्याने शेळ्या त्यांना पाहिजे त्यावेळेस चारा खाऊ शकतात.
३३) गव्हाणीमध्ये चारा टाकल्याने शेळ्या त्यावर लेंड्या टाकत नाहीत किंव्हा लघवी करत नाहीत त्यामुळे चारा स्वच्छ राहतो व त्याचा वास येत नाही.
३४) गव्हाणीमध्ये हिरवा-वाळला चारा त्यासोबत पशुखाद्य हि देता येते.
३५) शिल्लक राहिलेला चारा कुट्टी केलेला असल्याने तो लवकर कुजतो.
-
चाऱ्या संबंधित-
३६) शेळीपालनाला सुरवात करण्याअगोदर चारा पिकाची लागवड करावी.
३७) शेळ्यांसाठी सकस व उच्च प्रतीचा हिरवा चारा म्हणून शेवरी, सुबाभूळ, दशरत घास, मेथी घास, मका, कडवळ, मारवेल गवत इ चारा पिकांची लागवड करावी.
३८) चाऱ्याची लागवड करताना सध्या शेळ्यांची संख्या व पुढील वर्षभरात निर्माण होणाऱी संख्या व त्यांना किती चारा लागेल त्या हिशोबाने चाऱ्यांची लागवड करावी.
३९) जमिनीचे माती परीक्षण करून हिरव्या चाऱ्याची लागवड करावी व योग्य वेळेत गरजेनुसार खतांच्या मात्रा द्याव्यात जेणेकरून चारा उत्पादन भरपूर निघेल.
४०) हिरव्या चाऱ्यावर गरज भासल्यास कीटकनाशकाची करावी जेणेकरून रोगविरहित चारा तयार होईल व शेळ्यांमध्ये पोटफुगी होणार नाही.
४१) पाण्याची कमतरता असल्यास पावसाळ्यात वर्षभर पुरेल एवढा मुरघास करून ठेवावा.
४२) वर्षभर हिरवा व वाळला चारा पुरेल यापद्धतीने चाऱ्याचे पूर्व नियोजन करावे.
४३) पूर्ण वाढ झालेल्या शेळीस दररोज ६ ते ७ किलो चारा द्यावा. (४ किलो ओला व २ किलो सुका चारा द्यावा)
४४) शेळ्यांना बेशरम,गाजरगवत,हिवर, उसाची कोवळी पाने,धोतर, एरंड, ज्वारीची कोमटे, बदामाची पाने, कन्हेरी इत्यादि वनस्पती खाण्यात आल्याने विषबाधा होते.
-
आहारा संबंधित-
४५) शेळीपालनातील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन शेळ्यांना वजनाच्या ४ ते ६ टक्के कोरडा चारा द्यावा.
४६) दुभत्या शेळीला ओल्या व सुक्या चाऱ्या दररोज १०० ग्रॅम खुराक प्रतिलिटर दुधमागे द्यावा.
४७) गाभण शेळीला शेवटच्या २ ते ३ महिन्यात २०० ते २५० ग्रॅम पोषण आहार द्यावा.
४८) शेळी व्यायल्यानंतर नवजात पिल्लांना चीक पाजावा.
४९) शेळ्यांना हिरव्या चाऱ्याबरोबर दररोज मोठे मीठ व खनिज मिश्रणे मिसळून द्यावीत.
५०) हिरवा चारा थोडा वेळ उन्हात ठेवून मग द्यावा.
५१) शेळ्यांचे वेळेवर जंत निर्मूलन करून घ्यावे जेणेकरून वजनवाढ चांगली होईल.
५२) अधिक उत्पादनासाठी टी.एम.आर पद्धतीने चारा दिल्यास शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच दूध व मांस उत्पादनातही वाढ होते.
-
रोग व लसीकरणा संबंधित-
५३) शेळ्यांचे प्रमुख आजार घटसर्प, फऱ्या काळपुळी, सांसर्गिक गर्भपात ,आंत्रविषार,पी.पी.आर, धनुर्वात, तोंडखुरी व पायखुरी तसेच सांसर्गिक फुफ्फुसदाह इ.
५४) प्रथमतः आपल्या गोठ्यावर रोग येणार नाही याची अतिशय काळजी घ्यावी.
५५) शेळ्यांच्या आजारपणावरील खर्च टाळून तो व्यवस्थापनावर करावा.
५६) शेळ्यांमधील दूध,रक्त, लेंडी, मूत्र या नमुन्यांच्या चाचण्या केल्याने आरोग्यातील त्रुटी समजून येतात व त्यावर उपाययोजना करणे सोपे होते.
५७) आजारी व रोगयुक्त शेळ्या कळपातून वेगळ्या कराव्यात व त्यावर उपचार करावेत.
५८) शेळ्यांना कोणत्या लसी द्याव्यात व जंतांची औषधें कोणती व त्यांचे प्रमाण किती वापरावे याची माहिती अंगीकृत करणे फार महत्वाचे असते.
५९) आजारी शेळ्यांना मऊ,लुसलुशीत हिरवा तसेच सकस आहार द्यावा.
६०) बोकडांमध्ये वजनवाढ पाहिजे असेल तर बोकडांची नसबंदी करावी.
६१) गोठ्यातील व शेळ्यांच्या अंगावरील गोचिडांचे निर्मूलन त्यांच्या वाढीनुसार करावे.
६२) शेळ्या व मेंढ्यांच्या शरीराचे तापमान जास्त असल्यास इंजेकशन देऊ नये त्याचा परिणाम मेंदूवर होतो.
६३) शेळीपालकाकडे दोन ते तीन पशुवैधकीय डॉक्टरांचे मोबाइल नं असावेत तसेच डॉक्टर उपलब्ध न झाल्यास आपणास उपयोजना माहित असाव्यात.
-
प्रजनना संबंधित-
६४) शेळीची प्रजनन क्षमता १२ वर्ष असते.
६५) चांगल्या वंशावळीच्या तसेच उच्च उत्पादनक्षम शेळ्यांची पैदास करावी.
६६) प्रत्येक पैदाशीच्या वेळी त्याच जातीचा परंतु वेगवेगळा नर वापरावा तसेच पैदाशीचा बोकड बांधून ठेवू नये त्याला फिरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.
६७) शेळी पालनात कृत्रिम रेतन शक्य असण्याने पैदाशीचा बोकड ठेव्याची गरज नसते तसेच कमी दिवसात उच्च वंशावळीच्या शेळ्या तयार करता येते.
६८) शेळ्यांची आनुवंशिकता सुधारण्यासाठी कृत्रिम रेतन फायद्याचे असते.
६९) गोठ्यात २०-२५ शेळ्यांमागे १ बोकड असावा तसेच शेळ्या व बोकड एकत्र ठेवू नये त्याला स्वतंत्र व्यवस्था असावी.
७०) शेळ्यांचा गाभण काळ १४५ ते १५० दिवस असतो.
७१) शेळ्या शक्यतो मार्च- आणि सप्टेंबर महिन्यात माजावर येतात तसेच माजाच्या हंगामामध्ये शेळी दर १९ ते २१ दिवसांनी माजावर येते शेळ्यांचा माज ३२ ते ४० तासापर्यंत असतो.
७२) पैदाशीच्या शेळ्या म्हणून त्यांची विक्री केल्यास अधिक नफा मिळतो.
-
नोंदी संबंधित-
७३) शेळ्यांच्या कानात ओळख नोंदणी क्रमांक असलेला टॅग लावावा जेणेकरून तिची माहिती जतन करण्यास मदत होईल.
७४) शेळी व्यायल्याची तारीख, शेळ्या लागू झाल्याची तारीख, जंत निर्मूलनाची तारीख, लसीकरणाची तारीख वेळ लसीचे नाव, बॅच नं, डॉक्टरचे नाव, शेळ्या ७५) विकल्याची तारीख,मृत्यूची तारीख इत्यादी तारखांच्या नोंदी ठेवाव्यात.
७६) पशुखाद्य शेळ्यांसाठी सुरु केलेली तारीख त्याची किंमत किती किलो द्यायचे व किती दिवसांसाठी व किती शेळ्यांसाठी द्यायचे आहे ह्याचा आराखडा तयार असावा.
७७) चांगल्या वंशावळीचा अधिक उत्पादनक्षम शेळ्या निर्माण कराव्यात त्यासाठी दैनंदिन नोंदी ठेवाव्यात.
७८) दिवसभरात एकदा तरी सर्व शेळ्यांचे बारीक निरीक्षण करावे.
७९) गोट फार्मला एक चांगले नाव द्यावे व त्याच नावाचे बँकेमध्ये अकॉउंट तयार करावे जेणेकरून सर्व पैश्याचा अंदाज लागतो फायदा तोटा समजतो तसेच व्यवहार चोख राहतात.
८०) व्यवसायाचा जमाखर्च, आवर्ती व अनावर्ती यांच्या चोख नोंदी ठेवाव्यात. त्यानुसार आपल्या भावी योजना आखाव्यात.
- व्यवस्थापना संबंधित-
८१) दैनंदिन व महिनाभराच्या कामकाजाचे पूर्व नियोजन करावे.
८२) गोठ्यातील दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक करावे.
८३)गोठ्यात कामासाठी कुशल मजूर असावा किंव्हा स्वतः लक्ष देऊन काम करावे.
८४) गोठ्यावर शक्यतो कुत्रा पाळूच नये कारण कुत्रा साथीच्या रोगांना आमंत्रण देण्याचे कामे करतो.
८५) गोठ्यात गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोंबड्या पाळाव्यात.
८६) बिनउपयोगी शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात.
८७) गोठ्यात गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोंबड्या पाळाव्यात.
८८) गोठ्यामध्ये शेळ्यांच्या वयोमानानुसार वेगवेगळे कप्पे करावेत व त्याचा वापर करावा.
८९) खरेदी केलेल्या नवीन शेळ्या २१ दिवस निरीक्षणाखाली ठेवाव्यात व त्यांना वेगळे खाद्य पाणी द्यावे.
९०) आजारी शेळ्यांचे खाद्य-पाणी इतर शेळ्यांना खायला देऊ नये कारण रोगांचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते.
९१) गोठ्यातील गोचिडांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोंबड्या पाळाव्यात.
९२) शेळीपालनाचा चांगला अनुभव आल्यानंतर शेडमध्ये नवीन नवनवीन बदल करावेत तोपर्यंत कमी खर्चाचा गोठा बांधवा.
-
विक्रीसंबंधित-
९३) आपल्या गोट फार्मची डिजिटल मार्केटिंग करावी तसेच वेगवेगळे ग्राफिक्स व्हिडिओ बनवावेत.
९४) शेळ्यांची विक्री वजनानुसार करावी त्यासाठी गोठ्यात वजनकाटा असावा जेणेकरून शेळयांची वजने व खाद्याची वजने करता येतील.
९५) शेळ्यांच्या विक्रीचा दर ठरवताना आपणाला किती टक्के फायदा पाहिजे व बाजारातील सध्याची मागणी व किंमत काय आहे या सर्व बाबींचा विचार करावा.
९६) शेळ्यांची विक्री नेहमी थेट ग्राहकाशी करावी जेणेकरून अधिक नफा होईल.
९७) गावामध्ये बोकडांची कटिंग करून मटणाची देखील विक्री करू शकता.
९८) आपल्या मटणाची चांगली पॅकॅजिंग करून स्वच्छ ताजे मटण वेळेत पोहोच केल्याने चांगला भाव मिळू शकतो.
९९) बोकडाचे मटण हॉटेल मेस, शिक्षक कॉलनी, डॉक्टर वकील यांना देखील घरपोच करू शकता.
१००) शेळ्यांची शक्यतो ऑनलाईन पद्धतीने विक्री करावी. उदा.फेसबुक,व्हाट्सअँप,यु ट्यूब इत्यादी माध्यमांद्वारे अधिक नफा मिळू शकतो.
१०१) ऑनलाईन मार्केटिंगमुळे प्रसिद्धी मिळते शेळ्या ने-आण करण्याचा खर्च वाचतो शेळ्या शेडवर ताणतणावाखाली नसल्यामुळे तजेलदार दिसतात त्यामुळे अधिक दर मिळतो.
टीप- शेळीपालन व्यवसायासंबंधित अद्यावत माहिती व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन धेनु ॲप डाऊनलोड करा आणि आपला व्यवसाय दुपटीने वाढवा.
लिंक.
लेखक
नितीन रा. पिसाळ
प्रकल्प व्यवस्थापक, (डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी, पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com.
Published on: 16 March 2021, 05:50 IST