Animal Husbandry

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय सुरू करायची योजना असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही चार ते साडेचार लाखांची गुंतवणूक करुन वर्षाला दहा लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

Updated on 20 November, 2021 1:33 PM IST

 जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय सुरू करायची योजना असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही चार ते साडेचार लाखांची गुंतवणूक करुन वर्षाला दहा लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

 आपण शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुकूटपालन आणि पशुपालन सारखी व्यवसाय करतो. यालाच समांतर असा हा व्यवसाय आहे. तो म्हणजे रॅबिट फार्मिंग म्हणजे ससे पालन हा होय. बाजारामध्ये सशाच्या मांसाला चांगल्या दर मिळतो.तसेच सशाच्या केसा पासून बनलेल्या ऊणाला देखील बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे या लेखात आपण ससे पालन विषयी सविस्तर माहिती घेऊ.

ससे पालन व्यवसाय विषयी माहिती

 हा व्यवसाय  सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त चार लाख रुपयांची गुंतवणूक करायची गरज असते. हा व्यवसाय याचा विचार केला तर तो वेगवेगळ्या भागात विभागलेला असतो. यामध्ये एका भागात सात माद्या ससे आणि तीन नर ससे असतात. त्यासाठी चार लाख ते साडेचार लाख रुपये खर्च होऊ शकतो.

या खर्चामध्ये एक ते दीड लाख रुपयांचा सशांचा पिंजरा, एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत चारा आणि असा इतर दोन लाख रुपयांचा यामध्ये समावेश होतो. यांचा प्रजननाचा काळ याचा विचार केला तर सचिनच्या प्रजातीत नर आणि मादी हे सहा महिन्यानंतर प्रजननासाठी तयार होतात. सशाची मादी एका वेळी सहा ते सात पिल्लांना जन्म देते. तसेच मादीचा गर्भधारणेचा काळातील दिवसाचाअसतो. पिल्लांच्या वाढीचा काळ 25 दिवसाचा असतो. यामध्ये 45 दिवसात एका सशाचे वजन दोन किलो भरते.त्यानंतर त्यांची विक्री करता येते.

ससे पालन व्यवसायाचे आर्थिक गणित

साधारणपणे एक मादी ससा पासून पाचपिल्ले  होतात. ज्यामध्ये 45 दिवसात 350 पिल्ले असतील.एक युनिट भाग पिल्लांना जन्म देण्यासाठी सहा महिन्यात तयार होतात. 45 दिवसांमध्ये पिल्लांची किंमत दोन लाखांपर्यंत होते. त्यांना प्रजनन,मांस आणि लोकर व्यवसायासाठी विकले जाते.मादी ससा वर्षातून कमीत कमी सात वेळा पिल्लांना जन्म देते. यामध्ये रोग, मृत्यू अशा काही समस्या उद्भवल्या तर सरासरी वर्षातून पाच वेळा गर्भधारणा होते.त्यामुळे वर्षभरात सरासरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न होते.

त्यामधील खर्च म्हणून दोन ते तीन लाख रुपये ससेपालन आत गेले तर सात लाख रुपयांचा निव्वळ नफा होत असतो. त्यातूनही भांडवली खर्च चार लाख रुपये वजा केला तरी तीन लाख नफा पहिल्या वर्षात होतो.

 विशेष म्हणजे या व्यवसायाचे तुम्हाला जास्त माहिती नसेल किंवा या व्यवसायाची रिस्क घेण्याची तुमची तयारी नसेल तर तुम्ही या व्यवसायाचे फ्रेंचायसी  घेऊ शकता.यामध्ये तुम्हाला सुरुवातीला या व्यवसायाबद्दल चे सर्व माहिती व ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे हा पर्याय ही उत्तम आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारू शकतात.

English Summary: rabbit farming is most benificial for farmer get more profit
Published on: 20 November 2021, 01:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)