Animal Husbandry

शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय ओळखला जातो, पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी अनेक गोष्टी करतात. यामुळे फायदा होतो. यामध्ये खालील गोष्टी प्रामुख्याने येतात. यामुळे शेतकऱ्यांच्या दूध वाढीत फरक पडणार आहे. यामध्ये ते दूध काढण्यापूर्वी गोठ्यात मधुर संगीत लावतात. दूध काढण्याआधी गाई धुवून त्या वाळण्यासाठी रेस्टिंग जागेमध्ये थांबवतात.

Updated on 04 June, 2022 5:42 PM IST

शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय ओळखला जातो, पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी अनेक गोष्टी करतात. यामुळे फायदा होतो. यामध्ये खालील गोष्टी प्रामुख्याने येतात. यामुळे शेतकऱ्यांच्या दूध वाढीत फरक पडणार आहे. यामध्ये ते दूध काढण्यापूर्वी गोठ्यात मधुर संगीत लावतात. दूध काढण्याआधी गाई धुवून त्या वाळण्यासाठी रेस्टिंग जागेमध्ये थांबवतात.

दूध काढण्यापूर्वी गाई-म्हशी पूर्णपणे पान्हवून घेतात.
जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या दिवसातून तीन वेळा धारा काढल्या जातात.
दूध काढण्याची क्रिया ७ ते ८ मिनिटांत पूर्ण करतात.
दूध काढण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर कासेतील दूध पूर्णपणे निघल्याची खात्री करतात.
सकाळी व संध्याकाळी दुध काढण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळतात.

धार काढण्याच्या वेळी मिल्कर शिवाय मिल्किंग पार्लर मध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
धार काढतांना दररोज मिल्किंग मशीन चे प्रेशर तपासले जाते.
जनावराला वाढीच्या स्थितीनुसार खनिज मिश्रणे व जीवनसत्वे पुरवली जातात.
छोट्या-छोट्या गोठ्यामध्ये धार काढण्यापूर्वी गाईची कास नेहमी कोमट पाण्याने धुवून त्यानंतर ती चांगली पुसली जाते.

शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटले, शेतकरी समाधानी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

छोट्या गोठ्यामध्ये दूधाचे कॅन धुण्यासाठी मोठे ब्रश वापरले जातात व ते कॅन ड्रायरखाली किंवा उन्हात वाळवले जातात.
मिल्किंग पार्लर मुळे एक व्यक्ती सात मिनिटात ३,६,९,१२ पेक्षा जास्त गाईंची धार एकावेळी काढतात.
दूध काढण्यासाठी खास करून मिल्किंग पार्लर बनवले जातात.
मिल्किंग पार्लर मध्ये धार काढताना गाई अजिबात हालत नाहीत.
जनावरांच्या पायाला भाला घालण्याची सवय अजिबात नसते.

धार काढताना गाईला चारा व पशू आहार दिला जात नाही तर तो धार काढून झाल्यावर जनावरांना टी.एम.आर दिला जातो.
धार काढताना दररोज दुधाची चव, रंग, वास तपासून पहावा शंका वाटल्यास दूध दुसऱ्या गाईच्या दुधात मिसळू नये.
स्तनदाह आजार झालेली गाई लगेच गोठ्यातून वेगळी केली जाते त्या गाईचे दुध मिल्किंग मशीन ने न काढता हाताने काढले जाते व काढलेले दूध फेकून दिले जाते. मशीन ने धार काढल्यामुळे सडांची लांबी व कासेचा आकार वाढत नाही तसेच सडाला इजा ही होत नाही.
दूधाची साठवणूक ते मिल्क बल्क कुलर मध्ये करतात तसेच स्पर्श विरहित दूध असल्याने दूध लवकर खराब होत नाही.

आधी अण्णा हजारेंकडे 6 हजाराने कामाला, पट्ठ्या आज शेतीतुन कमवतोय वार्षिक 6 कोटी रुपये, वाचा नेमकं काय केलं

धार काढून झाल्यावर गाई-म्हशींचे सड न चुकता दररोज जंतुनाशक द्रावणामध्ये बुडवले जाते.
गाई-म्हशींची खूरे वाढलेली असतील तर हुफ ट्रिमिंग किंवा हुफ बॅलन्सिंग केले जाते.
गाई व म्हशीच्या अंगावर केस जास्त प्रमाणात झाले असतील तर ते ट्रिमर ने काढून घेतले जातात.

पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com

महत्वाच्या बातम्या
'गडकरींचे भाषण ऐकून मला वाटले की साखर कारखाना काढावा, पण मी काढणार नाही कारण...'
शेतकऱ्यांना मोठा फायदा, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानद्वारे पाण्यावर चारा निर्मिती तयार करता येणार
'मला साखरेतील काही कळत नाही, पण प्रश्न आला की डाव्या आणि उजव्या बाजूला बघतो'

English Summary: Punjab cows give more milk and ours give less, farmers should read
Published on: 04 June 2022, 05:42 IST