Animal Husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी दुधाचे वाढीव उत्पादन हे खूप गरजेचे असते. परंतु दुधाचे उत्पादन घेणे जनावरांच्या प्रजनन शक्तीवर अवलंबून असल्याने जनावरांची प्रजननशक्ती उत्तम ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत नियोजन आणि सूक्ष्म निरीक्षण या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

Updated on 12 September, 2022 3:30 PM IST

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी दुधाचे वाढीव उत्पादन हे खूप गरजेचे असते. परंतु दुधाचे उत्पादन घेणे जनावरांच्या प्रजनन शक्तीवर अवलंबून असल्याने जनावरांची प्रजननशक्ती उत्तम ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीत नियोजन आणि सूक्ष्म निरीक्षण या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनावरांच्या प्रजनन कार्यामध्ये सगळ्यात कळीचा आणि महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो जनावरांनी दाखवलेला माज हा होय. जनावरांचा माज ओळखता येणे हे खूप गरजेचे आहे. यासंबंधी या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Poultry:'गिरीराज'देईल पोल्ट्री व्यवसायात आर्थिक समृद्धी,चांगल्या उत्पादनासाठी अशा प्रकारे करा व्यवस्थापन

 गाई म्हशीनी दाखवलेला माज ओळखणे गरजेचे

 गायींनी किंवा म्हशीनी दाखवलेला माज ओळखणे खूप गरजेचे आहे.माज ओळखल्यानंतर जनावराचे रेतन केल्यास जनावर गाभण राहिल्यावर गाई मध्ये कमीत कमी दोनशे सत्तर ते 280 दिवस, म्हशींमध्ये 305 ते तीनशे दहा दिवसात विण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे.

तसेच जनावर व्यायल्यानंतर पुढील 50 ते 60 दिवसात गाई व म्हशीनी पुन्हा माज दाखवला पाहिजे. हे जे काही चक्र आहे हे अगदी व्यवस्थित चालले तर दूध व्यवसायात निश्चितपणे आर्थिक फायदा होतो.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा गाय आणि म्हशीला भरवले जाते त्यानंतर बाहेर टाकल्या जाणाऱ्या सोटाचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे असते.

सोट चिकट आणि पारदर्शक असेल तर जनावर गाभण असल्याचे समजले जाते. परंतु जर बाहेर आलेला सोटामध्ये इतर कोणतेही घटक किंवा काही बदल दृष्टीस येत असेल तर तात्काळ पशुवैद्यकाला दाखवणे गरजेचे आहे.

नक्की वाचा:राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव; खबरदारी घेण्याची गरज

यासंबंधी महत्त्वाचे

जनावरांमध्ये तीनदा रेतन केले परंतु तरीसुद्धा जनावर गाभण राहत नसेल तर त्याला वारंवार उलटणे असे म्हणतात. गाय आणि म्हशीमध्ये माजाची चक्र 21 दिवसांनी येते. रेतन केल्यानंतर फलनाची क्रिया जर व्यवस्थित झाली असेल तर 21 दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही.

जे दुधाळ जनावरे आहेत यामध्ये वारंवार उलटण्याची प्रमाण जास्त दिसून येते. जास्त दूध उत्पादन असते त्या ठिकाणी वारंवार उलटण्याचे प्रमाण जास्त दिसते. मागे भरपूर अशी कारणे आहेत परंतु योग्य फलनातील दोष आणि भ्रूणदोष ही मुख्य कारणे सांगता येतील.

नक्की वाचा:Animal Care: जनावरांच्या वार अडकण्याच्या समस्येवर ठरतील 'हे' घरगुती उपचार फायदेशीर, वाचा सविस्तर

English Summary: proper observation to animal in pregancy perioed is so important
Published on: 12 September 2022, 03:30 IST