Animal Husbandry

आता काही दिवसांनी उन्हाळा सुरू होईल त्यामुळे सहाजिकच संकरित गाईंच्या दूध उत्पादनावर आणि त्यांच्या प्रजनन क्रियेवर याचा विपरीत परिणाम होत असतो. उन्हाळ्यामध्ये गाई चारा कमी खातात तसेच पाणीदेखील कमी पितात.

Updated on 14 February, 2022 4:30 PM IST

आता काही दिवसांनी उन्हाळा सुरू होईल त्यामुळे सहाजिकच संकरित गाईंच्या दूध उत्पादनावर आणि त्यांच्या प्रजनन क्रियेवर याचा विपरीत परिणाम होत असतो. उन्हाळ्यामध्ये गाई चारा कमी खातात तसेच पाणीदेखील कमी पितात.

त्यामुळे प्रत्यक्ष त्याचा दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध उत्पादन कमी होते. तसेच गाईंची प्रजनन क्रिया म्हणजे माज व इतर क्रिया देखील मंदावतात. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये संकरित गाईंचे  काटेकोरपणे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. जेणेकरून होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या लेखामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये संकरित गाईंचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

 संकरित गाईंचे उन्हाळ्यातील व्यवस्थापन

  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये गाईंना 24 तास स्वच्छ, थंड व वास येणाऱ्या पाण्याची व्यवस्था करावी. आठवड्यातून एकदा पाणी साठवण्याच्या हौदाला आतून पांढरा चुना लावावा जेणेकरून यामुळे शेवाळाची वाढ थांबवता येते आणि पाणीही थंड राहण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यामध्ये ओल्या चाऱ्याची व्यवस्था करणे फार गरजेचे असते. गाईंना ओला चारा जास्त प्रमाणात द्यावा. संध्याकाळच्या वेळेस वातावरण जेव्हा थंड असते तेव्हा भरपूर प्रमाणामध्ये कोरडा चारा दिला तरी चालते.
  • गाईंना शक्य असल्यास झाडाखाली थंड सावली ठेवावे.
  • गाईंची गोठा ची रचना करताना छताची उंची जास्त असावी तसेच छतावर पाला पाचोळा पसरावा जेणेकरून गोठ्या मधील वातावरण थंड राहते किंवा छताला पांढरा चुना लावावा.
  • गोठ्यामध्ये शक्य असल्यास फोगर्स किंवा पंखे बसवावेत. जर ते शक्य नसेल तर किमान स्प्रे पंपाने दोन ते तीन वेळा पाणी मारावे. स्प्रे पंपाने पाणी मारण्या अगोदर पंप व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा.
  • जास्त तापमानामुळे गाई किंवा म्हशीमाजाची लक्षणे व्यवस्थित दाखवत नाही त्यामुळे गाईंवर व्यवस्थित लक्ष ठेवावे तसेच जास्तीत जास्त गाई उन्हाळाच्या अगोदर गाबन कशा राहतील याचा प्रयत्न करावा.
  • म्हशीचा रंग काळा असतो त्यामुळे उन्हाचा जास्त त्रास म्हशीना होतो, त्यामुळे म्हशीवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असते.
  • गाईंना खुराक देताना सकाळी लवकर व संध्याकाळी द्यावा. दुपारी किंवा सकाळी उशीरा खुराक दिल्यावर दोन ते चार तासांनी त्याचे पचन क्रिया चालू होते. त्या वेळी गाईच्या शरीरात ऊर्जा निर्माण होते व शरीराचे तापमान वाढते.
  • गोठ्याच्या बाजूला झाडे लावली तर उत्तमच असते जेणेकरून भविष्यात याचा खूप फायदा होऊ शकतो.
  • गुळाचे पाणी जर गाईंना पाजलेतर गाईच्या शरीरात यामुळे थंडावा निर्माण होतो व त्याचा फायदा मिळतो.
English Summary: proper management of cow in summer session for milk production
Published on: 14 February 2022, 04:30 IST