1. पशुसंवर्धन

'या' दोन प्रकारे होते शेळीपालन; जाणून घ्या! कोणता प्रकार आहे फायद्याचा

KJ Staff
KJ Staff


पावसाचा लहरीपणा आणि दुष्काळामुळे शेती व्यवसाय हा न परडवणारा ठरत आहे. शेतीतील होणाऱ्या कमी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची होत आहे. यामुळे जर आपले उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर शेतकऱ्यांनी शेतीसह काही जोडव्यवसाय केले पाहिजे. यात शेतीशी संबंधित असलेला व्यवसाय म्हणजे पशुपालन पण पशुपालन करणे सगळ्यांना शक्य नसते. यामुळे थोडा हटके विचार करत आपण शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला पाहिजे. शेळीपालन हा व्यवसाय कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. यासाठी मजूरही कमी लागतात, जागा कमी लागते.  एक म्हैस किंवा गाय याच्या पालनासाठी जितका पैसा लागतो, तितक्या पैशात ८ ते १० शेळ्यांचे पालन होऊ शकते.

जगातील एकूण शेळ्यांपैकी चौदा टक्के शेळ्या भारतात आहेत. दरवर्षी ३५-४० टक्के शेळ्या मांसासाठी वापरल्या जात असल्या तरी शेळ्यांची जुळे व तिळे करडे देण्याची क्षमता त्यांची संख्या टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, कोकण कन्याळ, बोएर, व संगमनेरी शेळ्या आढळतात. उस्मनाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागांत आढळतात. आज आपण बंदिस्त आणि अर्धबंदिस्त शेळीपालन अशा दोन प्रकारे केले जाते, याची माहिती घेणार आहोत. दोन्ही प्रकार आपल्याला कशाप्रकारे नफा मिळवून देतात याविषयीही जाणून घेणार आहोत.

 


अर्धबंदिस्त प्रकारात शेळ्यांना चरण्यासाठी मोकळे सोडावे लागते. त्यामुळे शेळ्यांना रानातील झाडे, झुडपे खाण्यास मिळतात. यामुळे शेळ्यांच्या खाद्यावरील आपला खर्च कमी होत असतो. त्यामुळे शेळीपालनाचा हा प्रकार खूप फायदेशीर आहे. मोकाट किंवा अर्धबंदिस्त  शेळीपालनासाठी  कुरणांची गरज असते. परंतु सध्या कुरणे कमी होत चालली आहेत. त्यामुळे पुढच्या काळात बंदगोठा शेळीपालन हाच प्रकार अधिक व्यवहार्य ठरणार आहे. 

बंदिस्त प्रकारात शेळ्यांना चारा हा गोठ्यात पुरवला जातो. बंदिस्त प्रकरात शेळ्यांची वाढ चांगली होते. या प्रकारे आपण शेळीपालन केले तर आपण शेळ्यांच्या प्रजननावर नियंत्रण ठेवू शकतो.  बंदिस्त शेळीपालनात मात्र खाद्यचा खर्च वाढतो. पण शेळ्यांच्या आहारावर आपण लक्ष ठेवू शकतो, त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते. शेळ्यांच्या आजारावर वेळीच काळजी घेता येते. नियोजन पद्धतीने शेळीपालन करायचे असेल तर बंदिस्त पद्धतीने शेळीपालन केलेले अधिक चांगले.

लेखक - 

रत्नाकर पाटील- देसले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters