Animal Husbandry

शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय असून यामध्ये शेतकरी शेतीसोबतच विविध प्रकारचे जोडधंदे करतो. या जोडधंद्यामध्ये कुकुट पालन, पशूपालन, वराह पालन, शेळीपालन इत्यादींचा यामध्ये समावेश करता येईल.

Updated on 16 April, 2022 11:17 AM IST

शेती हा भारताचा प्रमुख व्यवसाय असून यामध्ये शेतकरी शेतीसोबतच विविध प्रकारचे जोडधंदे करतो. या जोडधंद्यामध्ये कुकुट पालन, पशूपालन, वराह पालन, शेळीपालन इत्यादींचा यामध्ये समावेश करता येईल.

आता आपण कुक्कुटपालनामध्ये जर विचार केला तर आपल्याकडे जास्त करून पोल्ट्री फार्म चे स्वरूप हे एक व्यावसायिक दृष्ट्या झाले आहे. परंतु परसातील कोंबडी पालन  गावरान कोंबडी पालन असे आपण त्याला म्हणून ते बरेच शेतकरी करतात. कारण या मध्ये  कमीत कमी जागेत आणि अगदी कमी खर्चा मध्ये अशा प्रकारचे कुकूटपालन करता येते. आता कोंबड्यांमध्ये देखील विविध प्रकारचे प्रकार म्हणजे जाती असतात. जातीनुसार कोंबड्या पासून मिळणाऱ्या अंडी उत्पादनात देखील कमी अधिक प्रमाणात फरक पडतो. परंतु यामध्ये कोंबड्यांच्या उन्नत जातींचे जर  पालन केले तर निश्चितच हातात येणारे उत्पन्न हे जास्त असत. या लेखामध्ये आपणकोंबडीच्या प्रतापधन या जाती बद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:शेतकरी दादांनो! आपल्या शेतीची उत्पादकता घटत चालली आहे; काय कारण असावे बरे? म्हणून हे वाचा आणि खरंच विचार करा

 प्रतापधन कोंबडी एक फायदेशीर जात

 कुकूटपालन व्यवसाय मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अखिल भारतीय समन्वित कुकुट प्रजनन अनुसंधान परियोजना च्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन महाराणाप्रताप कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय उदयपूर यांनी कोंबडीची एक जात विकसित केली आहे तिचे नाव आहे प्रतापधन. कुक्कुटपालन हा व्यवसाय जास्त करून भूमिहीन मजूर किंवा ज्यांच्याजवळ कमीत कमी शेती असते असे शेतकरी करतात.

कमी जागा, कमी भांडवल तसेच अगदी सहजतेने हा व्यवसाय करून कमीत कमी वेळेत अधिक नफायामध्ये मिळू शकतो. आपल्याला माहित आहेच की देशी कोंबड्या एका वर्षात 83 अंडे देतात. परंतु कोंबड्यांची ही जात एका वर्षाला161 अंडे देते.एवढेच नाही तर ग्रामीण भागामध्ये अगदी सहजतेने या कोंबडीचे पालन करता येते.जर आपल्या भारताचा विचार केला तर गावरान जातीच्या कोंबड्या फक्त 38 दिवस अंडे देतात आणि त्यांची उत्पादनक्षमता खूपच कमी असते. एका वर्षाला 50 ते 60 अंडी एवढी त्यांची उत्पादन क्षमता आहे. हे प्रमाण एकूण उत्पादनाच्या फक्त 21 टक्के आहे. परंतु ही कमतरता  प्रतापधन ही कोंबडीची जात भरून काढू शकते. इतर जातींच्या तुलनेत ही जात तीन पट अधिक अंडे देते आणि 75 टक्क्यांपर्यंत जास्त वजन असते.

नक्की वाचा:थेंब पडे पावसाचा, मातीचा गंध दरवळे चोहीकडे माहिती करू काय बरे कारण असेल यामागे

कुठे मिळेल ही जात?

 कोंबडीच्या या जातीला अखिल भारतीय समन्वित कुक्कुट प्रजनन अनुसंधान परियोजना च्या अंतर्गत महाराणा प्रताप कृषी आणि प्रौद्योगिकी विश्व विद्यालय उदयपुर, यांनी विकसित केली. कोंबडीच्या या गौरंगी शंकर जातीचे नाव प्रतापधन ठेवले गेले आहे. अजून पर्यंत या जातीच्या कोंबड्या प्रौद्योगिक विश्व विद्यालय उदयपुर यांच्या जवळ आहेत. सध्यातरी या ठिकाणहुन मिळू शकतात.(स्रोत- चौपाल समाचार)

English Summary: pratapdhan this species of hen give more egg production
Published on: 16 April 2022, 11:17 IST