Animal Husbandry

सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारकडून अनेक योजना राबवले जात आहेत. अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती करणे सोपे व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत

Updated on 19 December, 2021 9:51 AM IST

सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष केंद्र सरकारने ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारकडून अनेक योजना राबवले जात आहेत. अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान देऊन शेतकऱ्यांना  त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती  करणे सोपे व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत

याच योजनांचा आणि उद्दिष्टाचा भाग म्हणून केंद्र सरकारकडून मत्स्य पालन व्यवसायासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्यात येत आहे. या लेखात आपण मत्स्य संपदा योजना आणि उद्दिष्ट या बाबतीत माहिती घेऊ.

 प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना

मत्स्यपालन क्षेत्र एक प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे सरकारकडून देखील मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जर भारताचा विचार केला तर मासे उत्पादनामध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो निर्यातीत चौथा क्रमांक लागतो. तसेच बरेच लोक या व्यवसायात गुंतलेले असल्याने मच्छी व्यवसायाच्या विकासासाठी सरकारने मोठी योजना आखून मत्स्य संपदा योजना सुरु केली आहे. या योजनेची अंदाजित किंमत ही 20050 कोटी रुपये आहे. या योजनेचा लाभ हा मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरी, मासे विक्रेते आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित इतर लोकांना मिळणार आहे

निळ्या  क्रांतीच्या माध्यमातून भारतातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा शाश्वत आणि उत्तरदायी विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजना पूर्ण पाच वर्षापासून लागू करण्यात आली आहे.मत्स्यपालन यामध्ये दर्जेदार मत्स्यबीजाची खरेदी आणि मत्स्यशेतीसाठी उत्तम पाणी व्यवस्थापननालाया योजनेद्वारे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि मजबूत मूल्य साखळी विकसित करता येणार आहे.तसेच या क्षेत्राच्या माध्यमातून रोजगाराच्या आणि  उत्पन्नाच्या संधी देखील उपलब्ध करण्यात येणार आहेत.या योजनेअंतर्गत कडून तीन लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते.

 कुणाला मिळेल या योजनेचा फायदा?

 मत्स्य उत्पादक, मच्छी कामगार व मासळी विक्रेते, मत्स्य विकास महामंडळ,बचत गट, मत्स्य व्यवसाय क्षेत्र, मत्स्य सहकारी संस्था, मत्स्यपालन संघटना, उद्योग खाजगी कंपन्या तसेच मत्स्य उत्पादक संस्था यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मत्स्यपालन कार्ड
  • रहीवासी प्रमाणपत्र
  • संपर्क क्रमांक
  • बँक खात्याचा तपशील
  • अर्जदाराचे जात प्रमाणपत्र

यादी कागदपत्रांची आवश्यकता असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी pmssy.dof.gov.inया संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.(संदर्भ- लेटेस्ट ली)

English Summary: pradhaanmantri matsysanpada yojana is helpful for fishary
Published on: 19 December 2021, 09:51 IST