Animal Husbandry

पीपीआर म्हणजेच पेस्ट डेस पेटीट्स रुमी्नेंट्स या आजाराला बकऱ्यांची महामारी किवा बकऱ्याचा प्लेग असे देखील म्हणतात. या आजारात बकऱ्या मध्येतीव्र स्वरूपाचा ताप,तोंडात जखम,जुलाब,न्यूमोनिया आणिवेळीच उपचार नाही केले तरबकऱ्या दगावतात

Updated on 24 March, 2022 3:22 PM IST

पीपीआर म्हणजेच पेस्ट डेस पेटीट्स रुमी्नेंट्स या आजाराला बकऱ्यांची महामारी किवा बकऱ्याचा प्लेग असे देखील म्हणतात. या आजारात बकऱ्या मध्येतीव्र स्वरूपाचा ताप,तोंडात जखम,जुलाब,न्यूमोनिया आणिवेळीच उपचार नाही केले तरबकऱ्या दगावतात

एका रिपोर्टनुसार,बकऱ्या मध्ये पी पी आर च्या  आजाराने दरवर्षी 8895.12 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. या आजारामुळे बकऱ्यांच्या मृत्युदर हा 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. जास्त जर हा आजार फैलावला तर शंभर टक्क्यांपर्यंत देखील मृत्युदर जाऊ शकतो. या आजारांचे संक्रमण झाल्यानंतर दोन ते सात दिवसानंतर या आजाराचे लक्षण दिसायला सुरुवात होते. या आजाराच्या विषाणूचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला देखील एक तासापर्यंत हा जिवंत राहू शकतो. परंतु अल्कोहोल,  ईथर सारख्या साधारण डिटर्जंट च्या वापराने सुद्धा हा विषाणू अगदी सहजतेने नष्ट केला जाऊ शकतो.

नक्की वाचा:अनोखे फळ! पिकल्यानंतर चार रंग बदलते हे फळ अन विकले जाते 1000 रुपये प्रति किलो दराने, वाचा सविस्तर

 हा आजार पसरण्याचे कारण

 हा आजार प्रामुख्याने जेव्हा बकऱ्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आनले जाते म्हणजेच ने-आण केली जाते. तेव्हा एका संक्रमित बकरी कडून दुसरीकडे याचा प्रसार होतो. त्यासोबतच बकऱ्यांच्या कळपात नवीन खरेदी करून आणलेल्या बकऱ्यांनाएकत्र करणे,हवामानातील बदल हे काही प्रामुख्याने हा आजार पसरण्यासाठी महत्त्वाची कारणे आहेत.

 पीपीआर आजाराची लक्षणे

1- जेव्हा हा आजार घातक रूप धारण करतो तेव्हा बकऱ्या मध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत ताप असणे एक सामान्य आहे.

2- दोन ते तीन दिवसानंतर बकऱ्यांच्या तोंडामध्ये  छाले पडतात.

3- तसेच डोळ्यांमधून आणि नाकातून पाणी गळते, अतिसार होतो, पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात त्यासोबतश्वास घ्यायला त्रास देखील होतो.

4- तसेच नाकातून आणि तोंडातून येणाऱ्या चिकट स्त्रावा मधून पु देखील यायला लागतो. व त्यामधून दुर्गंधी यायला लागते.

5- त्यानंतर डोळ्यांमधून येणाऱ्या चिकट द्रव सुकल्याने डोळ्यांसमोर एक घट्ट पडदातयार होतो. त्यामुळे डोळे आणि तोंड उघडायला देखील त्रास होतो.

6- तोंडात सूज आणि अल्सर झाल्याने चारा खायला देखील त्रास होतो.

7- गाभण बकऱ्यांचा गर्भपात होऊन जातो.

8- ताप आल्यानक्की वाचा:वाद दोघांचा, मरण तिसऱ्याच! महसूल आणि कृषी विभागाच्या वादात नऊ लाख शेतकरी पीएम किसान योजनेपासून दूर

च्या तीन चार दिवसानंतर बकऱ्यांना चिकटआणि रक्तमिश्रित जुलाब होतात.

9- यामध्ये निमोनिया झाल्यानंतर बकऱ्यांना श्वास घेता येत नाही आणि श्वासघेताना धाप लागते.

10- संक्रमण झाल्यानंतर एका हप्त्यात उपचार केले नाही तर बकरी दगावते.

या रोगाचे निदान आणि उपाय

1- पीपीआर आजाराची लक्षणे हे अन्य आजारासारखे असतात. प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्यानंतर याचीपुष्टी केली जाते.

2- पीपीआर व्हायरस बकरीच्या शरिराच्या लिन्फोईड अवयवांनानुकसान पोहचवते. त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होते.

3- पीपीआर व्हायरस चे बकरीच्या तोंडातून आणि नाकातून येणाऱ्या स्त्रावाच्या माध्यमातून प्रयोगशाळेत व्यवस्थित तपासणी केली जाते. या माध्यमातूनया आजाराची लक्षणे यायच्या अगोदरनिदान केले जाऊ शकते.त्यामुळेबकऱ्यांच्या नाकातून आणि डोळ्यांमधून येणारे स्त्रावपटकन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवणे महत्वाचे असते.

4- बकऱ्यांच्या फुप्फुसांमध्ये या आजाराच्या जीवाणूंचा संक्रमण थांबवण्यासाठी oxytetracycline आणि क्लोरटेट्रासायक्लीन या औषधांची शिफारस करण्यात आली आहे.

5- या आजारामध्ये बकऱ्यांना पोषक, स्वच्छ, नरम आणि स्वादिष्ट चारा खायला द्यायला पाहिजे. पीपीआर महामारीपसरल्यानंतर पटकनजवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात सूचना द्यायला हवे.

6- दगावलेल्या बकऱ्यांना पूर्णपणेजाळून नष्ट करणे महत्त्वाचे आहे.तसेच अशा बकऱ्या साठी वापरण्यात येणारे भांडेस्वच्छ व निर्जंतुककरून घ्यावेत.

7- पीपीआर विषाणूच्या  विरोधात अजून कुठल्याही प्रकारचे परिणामकारक औषध उपलब्ध नाही. ऑंटी सेप्टीक मलम आणि अँटिबायोटिक औषधांच्या माध्यमातून होणारे बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.

लसीकरण हाच एक उत्तम उपाय

1-  लसीकरण हा एकमेव उपाय हा पीपीआर आजारावर आहे.

2- लस देताना चार महिन्याची वयाचे असताना एक मिली कातडीखाली दिले जाते. यामुळे तीन वर्षांपर्यंत बकरीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात.

3- नर बोकड आणि बकरी यांना तीन वर्षानंतर  दुसऱ्यांदा लसीकरण करणे महत्त्वाचे आहे.

4- लसीकरण झाल्यानंतर तीन आठवड्यांपर्यंत बकऱ्यांना तणावमुक्त ठेवणे गरजेचे आहे.

5-लसीकरण करण्याच्या अगोदर बकऱ्यांना जंतनाशक औषध देणे गरजेचे आहे.

English Summary: ppr disease is very harmful and dengerous disease in goat rearing
Published on: 24 March 2022, 03:22 IST