Animal Husbandry

भारत देश कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील जवळपास 60 टक्के जनसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे देशाची जीडीपी (Indias GDP) देखील सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील शेतकरी बांधव (Farmer) शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन (Poultry farming) हा व्यवसाय करत आहेत.

Updated on 07 May, 2022 6:57 PM IST

भारत देश कृषिप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील जवळपास 60 टक्के जनसंख्या ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे देशाची जीडीपी (Indias GDP) देखील सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. भारतातील शेतकरी बांधव (Farmer) शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन (Poultry farming) हा व्यवसाय करत आहेत.

सध्या कुकूटपालन हा एक फायदेशीर व्यवसाय म्हणून देखील उदयास येत आहे.  या व्यवसायात योग्य नियोजन केल तर त्यातून भरपूर पैसे मिळू शकतात. ग्रामीण भागात (Rural India) अनेक शेतकरी उत्पन्न वाढीसाठी (Farmers Income) कुक्कुटपालन करत आहेत. यामुळे या व्यवसायाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) कणा म्हणून ओळखले जाते. कुक्कुटपालन व्यवसायाशी निगडित लोकांनी हंगामानुसार कोंबडीची काळजी घ्यावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक (Agricultural Scientist) देत असतात.

विशेषतः उन्हाळ्यात कोंबड्यांची अधिक काळजी घ्यावी लागते शिवाय या हंगामात त्यांच्या आहाराकडे देखील विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण उन्हाळ्यात कोंबड्यांना संसर्गजनीत रोग होण्याचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यात योग्य काळजी व आहार न मिळाल्याने अनेक कोंबड्यांचा अकाली मृत्यू होतो त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांना (Poultry growers) मोठे आर्थिक भुर्दंड सहन करावे लागते.

पोल्ट्री व्यवसाय केवळ अंड्यांच्या उत्पादनासाठीच केला जात नाही, तर त्याच्या चिकनलाही बाजारात मोठी मागणी असते. यामुळे आज आपण उन्हाळ्यात कोंबडीचे योग्य व्यवस्थापन (Proper management of chickens in summer) कसे करावे याविषयी जाणुन घेणार ​​आहोत.

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Orange: यावर्षी नागपूरची संत्री हाताला गावणार नाही; वाढत्या तापमानात अन ब्लॅक फंगसमुळे बागा क्षतीग्रस्त

Fenugreek Farming : मेथीच्या भाजीची लागवड करण्याचा आहे कां प्लॅन? मग जाणुन घ्या मेथीच्या काही सुधारित जाती

उष्माघात कोंबड्यांसाठी धोकादायक 

कुक्कुटपालन व्यवसायातील तज्ज्ञांच्या (Poultry business experts) मते, उन्हाळ्यात कोंबड्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यांची अंडी घालण्याची क्षमता कमी होऊ लागते. एवढेच नाही तर उन्हाळ्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढते. दुसरीकडे, कमी आहारामुळे, अंड्यांचे उत्पादन कमी होऊ लागते आणि त्यांचा आकार देखील लहान होतो. अंड्यांवरील आवरण देखील कमकुवत आणि पातळ होते, ज्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात नुकसान सहन करावे लागते.

मित्रांनो जेव्हा तापमान 39 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त असते तेव्हा कोंबड्यांना खूप त्रास होतो. या तापमानात कोंबड्याना उष्माघात येण्याचा धोका अधिक वाढतो. उष्माघातात कोंबडीची चोच फुगते, अशक्त होतात, चेंगराचेंगरी सुरू होते आणि अर्धांगवायू होऊन त्यांचा मृत्यू होतो.

उन्हाळ्यात कोंबड्यांना प्रोटीनयुक्त आहार आवश्यक  उन्हाळ्यात कोंबड्या कमी धान्य खातात. त्याची भूक कमी होते. त्यामुळे या ऋतूमध्ये कोंबड्यांना अन्न देताना विशेष काळजी घ्यावी लागते.

उन्हाळ्यात कोंबडीच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण जास्त असायला हवे जेणेकरून कमी खाल्ल्यानंतरही कोंबडीला आवश्यक ते सर्व घटक मिळू शकतील आणि कोंबड्या निरोगी राहतील. त्याच वेळी, अंड्याचे शेल पातळ होऊ नये म्हणून आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी ओस्टो कॅल्शियम लिक्विड पाण्यात देता येऊ शकते.

कोंबड्यांना खायला देण्याची योग्य वेळ कोणती बरं 

तज्ज्ञांच्या मते, कोंबड्यांना थंडीच्या काळात धान्य खायला आवडते. त्यामुळे दुपारी कोंबडीना लाईटचा प्रकाश देण्याव्यतिरिक्त, सकाळी थंड वातावरणात जास्त प्रकाश द्या जेणेकरून कोंबड्या अन्नाचा पुरेपूर वापर करू शकतील. 

साधारणपणे, कोंबड्या 60 अंश ते 80 अंश तापमानाला प्राधान्य देतात कारण या तापमानात कोंबडीचा आहार आणि अंडी उत्पादनाचा दर जास्त असतो. जास्त तापमानामुळे, कोंबडी कमी खातात आणि कमी अंडी घालतात, ज्यामुळे पोल्ट्री फार्मर्सचे नुकसान होते. त्यामुळे कोंबड्यांच्या आहाराच्या वेळेचीही काळजी घेतली पाहिजे.

कोंबड्यांना पाण्याची योग्य व्यवस्था करावी लागणार बरं 

उन्हाळ्यात कोंबड्यांना अधिक पाणी लागतं असते. कोंबडयांना उन्हाळ्यात दुपटीने पाणी लागते. यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये नेहमी स्वच्छ आणि थंड पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर प्लास्टिक किंवा झिंकपासून बनवलेले पाण्याचे भांडे ठेवू नका. त्याऐवजी, मातीचे भांडे वापरावे जेणेकरुन त्यात पाणी जास्त काळ थंड राहील. उन्हाळ्यात, कोंबडी फार्मच्या खालील पृष्ठभागाची जाडी 2 इंचांपेक्षा जास्त नसावी. जर लिटर जुने झाले असेल तर ते काढून टाका आणि नवीन लिटर वापरा. असे केल्याने कोंबड्यांमध्ये संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल.

उष्माघात आल्यास घ्यावयाची काळजी 

पोल्ट्री फार्मचे छत पांढऱ्या रंगाने रंगवावे, जेणेकरून सूर्याची किरणे छतावर पडून परत जातील.

एस्बेस्टोस शीट्स छतावर देखील स्थापित केल्या जाऊ शकतात, यामुळे छताला जास्त गरम होण्यापासून रोखता येते.

खिडक्यांपासून 3-5 फूट अंतरावर गोणपाटाचे पडदे लावून त्यावर पाणी शिंपडून कोंबड्यांचे फार्म थंड करता येते.

फॉगर्सची सुविधा उपलब्ध असल्यास पोल्ट्री हाऊसचे तापमानही कमी होऊ शकते.

याशिवाय पंखे आणि कुलरचा वापर करून पोल्ट्री हाउसचे तापमानही नियंत्रणात ठेवता येते.

English Summary: Poultry Farming: Raise chickens this way in summer; Will benefit to poultry growers
Published on: 07 May 2022, 06:57 IST