सामान्यतः कोंबड्या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात.त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतूमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्येयोग्य ते बदल करावा लागतो.कोंबड्यांमध्ये विषाणूजन्य,जिवाणूजन्य,प्रजीव जन्य,रोशन तपांचा कमतरतेमुळे होणारे आजार तसेच आफ्लाटॉक्सीकोसीसव इतर विषबाधा आढळते.
कुक्कुटपालन व्यवसायात आजाराच्या प्रादुर्भावामुळे कोंबड्यांमध्ये वजन घटणे,पक्ष्यांचा मृत्यू होणे अशा समस्यांमुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोगनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोंबड्यांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी शरीरात ऊर्जा तयार करण्यासाठी पक्षी पंखाखाली पाय घेऊन मान पंखामध्ये घेऊनबसतात.खाद्य जास्त प्रमाणात खातात व पाणी कमी प्रमाणात पितात. अति थंडी व शेडमधील ओलसरपणामुळे शेडमध्ये रोगकारक जिवाणू परजिविंची संख्या वाढते व या जिवाणू आणि परजीवीची संपर्क येऊन कोंबड्यांना रोग उद्भवतातव मोठ्या प्रमाणात नुकसान होते.हिवाळ्यामध्ये रोग होण्याचे प्रमाण,रोगी पक्ष्यांचे प्रमाण व मृत्युदर हा मुख्यतः व्यवस्थापनाच्या प्रकारावर व पक्ष्यांना केलेल्या लसीकरणावर अवलंबून असते.अति थंडी मध्ये हवेतील आद्र्रता वाढते.
त्यामुळे गादी साहित्य तसेच खाद्यामध्ये कवकांची,बुरशीची वाढ होते. त्यामुळे अस्परजिलेसिस रोगाची लागण होऊन हिरवे आणि पिवळ्या रंगाच्या गाठी फुफुसात निर्माण होऊन श्वसनामध्ये अडथळा येतो. हिवाळ्यामध्ये पक्षांच्या जास्त प्रमाणात आजारी पडण्याचे प्रमाणला शेडमधीलअनियंत्रित हवामान कारणीभूत ठरते.यामध्ये शेड व्यवस्थापन नीट नसणे, शेडमध्ये पुरेशी हवा खेळती न राहणे, एका ठिकाणी जास्त पक्षी ठेवणे,खाद्य कमी पुरवठा करणे हे घटक कोंबडी आजारी पडण्यासकारणीभूत ठरतात. कोंबड्यांपासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवण्यासाठी शेडमधील तापमान 21 ते 23 अंश सेंटिग्रेड पर्यंत राहणे आवश्यक आहे.परंतु थंडीमध्येकाही भागातील तापमान 21 अंश सेंटिग्रेड पेक्षा खूप कमी होते. अशावेळी पक्षांना शरीर तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जादा ऊर्जेची गरज असते..हिवाळ्यामध्ये जर तापमान खूपच कमी झाले तर पक्षी कॉल्ड स्ट्रोकनेमृत्युमुखी पडतात.त्यामुळे हिवाळ्यात पक्ष्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
हिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाय योजना
1-हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदार पणा साठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्त्वे वाया जातात. त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जा युक्त खाद्य पदार्थ जसे तेल,स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्य प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्वांची प्रमाण तितकेच ठेवावे.
2- शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळयांना पडते लावावेत. पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.
3- शेडमधील तापमान विजेचे बल्ब,शेगडी किंवा ब्रुडरच्या साह्याने वाढवावे.
4- लोडशेडिंग च्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीचे सोय करावी.
5- मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही.
6-पक्ष्यांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.
7-
बऱ्याच वेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओली झाल्यास व शेडमधील आद्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंतांची अंडी तयार प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते. तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
8-कोंबड्यांसाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतूमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल,असे नियोजन पूर्वक शेड तयार करावे.तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी.
9-ठरवून दिल्याप्रमाणे कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाच्या संपर्क करावा.
10- ज्या ज्या वेळी या हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येत,त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईट स व ब जीवनसत्वाचा वापर करावा. जेणेकरून पक्षावरील ताण कमीहोईल.
Published on: 17 November 2021, 04:54 IST