सर्वसामान्यपणे जनावरांमध्ये विषबाधा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला लवकर लक्षात येत नाही. एखादा पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीर प्रक्रियेमध्ये बिघाड निर्माण होतो.
त्यालाच आपण विषबाधा असे म्हणतो. हा बिघाड निर्माण झाल्यामुळे त्याची बाह्य लक्षणे व जनावरांचे सामान्य वागण्यात फरक दिसायला लागतो. त्यावरून जनावरांना विषबाधा झाली आहे हे लवकर ओळखता येते. या लेखामध्ये आपण जनावरांना होणारी विषबाधा व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊ.
जनावरांना होणारी विषबाधा
बरेचदा आपण जनावरांना आहारामध्ये कडबा, विविध प्रकारचा हिरवा चारा इत्यादींचा उपयोग करतो. बऱ्याचदा जनावरांना आपण चरण्यासाठी मोकळे सोडतो. अशावेळी जनावरे विविध प्रकारच्या वनस्पती खातात. परंतु यापैकी काही वनस्पती जनावरांना धोकादायक ठरतात.
नक्की वाचा:तांदूळ उप्तादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता होणार उच्च दर्जाची तांदूळ निर्मिती..
कारण काही वनस्पतींमध्ये असलेले विषारी घटक जसे की, रिसीन, टॅटिन, गॉसिपोल, हायड्रोजन सायनाइड ग्लायकोसाईड असतात. अशावेळी जनावरांनी अशा प्रकारचे विषबाधित वनस्पती खाल्ले तर त्यांना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढते. विषबाधेची तीव्रता हे कुठले वनस्पती खाल्ली आहे त्याच्या जातीवर, किती प्रमाणात खाल्ली आणि जनावरांच्या आरोग्य कसे आहे इत्यादी बाबींवर अवलंबून असते. वनस्पतींचा विचार केला तर 120 पेक्षा जास्त वनस्पती अशा आहेत की ज्यामध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाईडची मात्रा असते.
जनावरांना विषबाधा झाल्यानंतरची लक्षणे
1- बऱ्याचदा विषबाधा झालेली जनावरे कोणत्याही प्रकारची लक्षणे दाखवत नाहीत व चरल्यानंतर दहा मिनिटात देखील मूर्त पावतात.
2- विषबाधा झाल्यानंतर बऱ्याचदा जनावरांच्या पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो, त्यामुळे जनावरांना हगवण लागते. पोटदुखी देखील मोठ्या प्रमाणात सुरू होते.
3- जनावरे श्वास घेताना तो जलद गतीने घेतात किंवा अगदी मंद गतीने घेतात व जनावरांना धाप देखील लागते.
4- जनावरांना विषबाधा झाल्यानंतर जनावरांचा स्नायूंवरील कंट्रोल सुटतो व जनावरे चक्कर येऊन पडतात.
विषबाधा झाल्यानंतर करावयाचे उपचार
1- उपचारामध्ये सोडियम नायट्रेट किंवा सोडियम सल्फेट या औषधांची इंजेक्शन शिरेतून द्यावे.
2- कृत्रिम श्वासोच्छवास देऊन जनावरांना लवकरात लवकर बरे करता येते.
प्रतिबंधात्मक उपाय
1- ज्वारीचा उपयोग चाऱ्यासाठी करायचा असेल तर पीक फुलोऱ्यात आल्यानंतर चाऱ्यासाठी कापणी करावी.
2- धान्यासाठी घेतलेला ज्वारीचा खोडवा असेल तर अशा ठिकाणी शेतात जनावरे चरायला सोडू नयेत.
3- जनावरांना जर सुबाभूळ खायला देत असाल आणि त्यापासून होणारी विषबाधा जर टाळायचे असेल तर मोठ्या आकाराच्या जनावरांना दररोज खाऊ घातल्या जाणाऱ्या एकूण चार यापैकी सुबाभळीच्या चाऱ्याचे प्रमाण 1/3 पेक्षा असल्यास जनावरांना कोणतेही अपायकारक परिणाम होत नाही.
4- युरिया मिश्रित चारा जनावरांना खायला दिला तर जास्त प्रमाणात पाणी प्यायला द्यावे व ते वेळोवेळी द्यावे.
Published on: 10 April 2022, 12:45 IST