Animal Husbandry

अनेक शेतकरी आपल्या शेतीसोबत जोडव्यवसाय करण्यावर भर देतात. या व्यवसायांमधून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र वेगवेगळ्या ऋतूच्या साथीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते. भारतात मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय म्हणजे पशूपालन व्यवसाय.

Updated on 26 September, 2022 5:22 PM IST

अनेक शेतकरी (farmers) आपल्या शेतीसोबत जोडव्यवसाय करण्यावर भर देतात. या व्यावसायांमधून चांगले उत्पादन काढण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र वेगवेगळ्या ऋतूच्या साथीमुळे शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते. भारतात मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यवसाय म्हणजे पशूपालन व्यवसाय.

यामध्ये गायी पालन, शेळी-मेंढी पालन (Goat-sheep rearing) मोठ्या प्रमाणात केले जाते. शेळ्या-मेंढ्यांच्या पालनातूनही कित्येक शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. मात्र वेगवेगळ्या ऋतूमध्ये काळजी घेण्याची गरज असते. न्यूमोनिया (Pneumonia) किंवा फुफ्फुस दाह हा सर्व वयोगटातील मेंढ्या आणि शेळ्यांची एक गंभीर समस्या बनली आहे.

यातून कित्येक शेतकरी नुकसानिस बळी पडले आहेत. या आजाराने उत्पादनात घट मोठ्या प्रमाणात होते. यासह शेळ्या, मेंढया, बोकड यांची वाढ पाहिजे तशी वाढत नाही. बऱ्याचदा या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र न्यूमोनिया आजारावर उपाय कोणते? याविषयी शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल

न्यूमोनियाची लक्षणे

1) एकाच जागेवर बसून राहतात यासह डोळ्यातून नाकातून चिकट स्राव येतो.
2) डोळे लालसर दिसतात, अधिक प्रमाणात ताप, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होतो किंवा जलद गतीने श्‍वास घेतात.
3) चरायला निघालेल्या कळपामध्ये मागे पडतात.

LIC ची भन्नाट योजना; फक्त 2 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 48 लाख रुपयांचा परतावा

प्रतिबंधात्मक उपाय

न्यूमोनिया (Pneumonia) हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे अशा वेळी आजारी जनावर ओळखून वेगळे लगेच करा. आजारी जनावरांची पशुवैद्यकांच्या मदतीने प्रतिजैवके वापरून त्वरित उपचार करावेत. शेडमध्ये शेळ्या किंवा मेंढ्या योग्य प्रमाणात ठेवाव्यात. जेणेकरून अधिक प्रमाणात गर्दी होणार नाही. शेडमधील हवा खेळती राहील.

नेहमी शेड स्वच्छ ठेवावी, जेणेकरून जनावरांच्या मलमूत्रापासून अमोनियासारखा वायू तयार होणार नाही. प्रतिकारकशक्ती उत्तम राहण्यासाठी स्वच्छ पाणी व संतुलित आहार द्या. वेळोवेळी जंतनाशक औषध (Deworming medicine) द्या जेणेकरून जंतांचा प्रादुर्भाव होणार नाही. सोबतच विविध आजारांच्या विरुद्ध लसीकरण करून घ्या.

न्यूमोनियाने एखादे जनावर दगावला असल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावावी. यासाठी जाळणे किंवा खोल खड्ड्यात पुरावे. या पद्धतींचा अवलंब केल्यास बाधित जिवाणू किंवा विषाणू इतर जनावरांमध्ये पसरणार नाही. अशा प्रकारे तुमची शेळ्या-मेंढ्यांचा जीव वाचवू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान
घरसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 5 लाख रुपयांची कमाई

English Summary: Pneumonia rise sheep goats Take timely measures
Published on: 26 September 2022, 05:16 IST