आपल्याकडे शेतीला जोड धंदा म्हणून अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात.त्यामध्ये शेळीपालन, पशूपालन, कुकुट पालन, ससे पालन इत्यादी. परंतु या सगळ्या व्यवसायांच्या सोबतीला सध्या वराह पालन हा एक व्यवसाय नावारूपाला येत आहे. शेतकर्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून जर वराहपालन या व्यवसायाची सुरुवात केली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडेल. या लेखात आपण वराहपालन या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.
वराहपालन एक व्यवसायिक सुसंधी
बाजारपेठेची मागणी लक्षात घेता आपल्याकडे काही प्रमाणात वराहपालन व्यवसाय सुरू झाला आहे. वराह यांचा गर्भधारणा कालावधी जर पाहिला तर तो 114 दिवसांचा असतो. एका मादी वराह कडून 7 ते 15 पिल्ले मिळण्याची शक्यता असते. सहा महिन्याच्या कालावधीत मांस उत्पादनासाठी वराह तयार होतात. यांचे खाद्यामध्ये घरगुती टाकाऊ अन्न, हॉटेल, खानावळी तसेच इतर काही समारंभातील उरलेला अन्नाचा वापर खाद्य म्हणून करता येतो. वराह पालन व्यवसाय च्या दृष्टीने उपयुक्त बाजू असल्या तरी आपल्याकडील भांडवल, मनुष्यबळ तसेच व्यवस्थापन तंत्र आणि विक्रीचे नियोजन या गोष्टींना तितकेच महत्त्व आहे.
वराह पालना साठी योग्य जागेची निवड
- जर वराह पालन व्यवसाय करायचा असेल तर शेडची उभारणी ही शहराजवळ करावी. जेणेकरून जवळपासच्या बाजारपेठेत वराहमांसासाठी अधिक मागणी असेल. तसेच खानावळी,हॉटेल आणि धाबे इत्यादींमधील उरलेल्यांना आहे व राहा साठी खाद्य म्हणून उपलब्ध होऊ शकते.
- जागेची निवड करताना फार्म हा उंचआणि सपाट ठिकाणी असावा. पाण्याची निचरा होण्यासाठी योग्य सोयअसावी.
- वराह हे बहु प्रजनक आहेत. हे पशुधन वेगाने व मोठ्या संख्येने वाढणारी आहे. म्हणून भविष्यात वराहाच्या संख्येत वाढ करता येईल अशी जागा असावी.
- वराह फार्मर स्टोअर, ऑफिस, फार्मर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खोली आणि रस्ते इत्यादी साठी ही जागा असावी.
भांडवल आणि खर्च
- अगोदर वराह पालन विषयक तांत्रिक आणि आर्थिक क्षमता समजून घ्याव्यात. नंतरच लागणाऱ्या अंदाजित रकमेची व्यवस्था करावी.
- शासनाच्या विविध उपक्रमांद्वारे वराह संगोपनासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे.
- एकूण उत्पन्न- वराह फार मधील सर्व उत्पादनांची विक्री करून मिळणारी एकूण रक्कम पुरेशी आहे का?
- परतफेड करण्याची क्षमता- वराह फार्मच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी काही अंशीककर्ज परतफेड घेण्यासाठी काही रकमेचा भाग राखून ठेवावा.
- एखादी अचानक नैसर्गिक आपत्ती उद्भवली किंवा मरतुक, चोरी किंवा अशाच एखाद्या गोष्टीकडे नुकसान झाले तर अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी लागणारे भांडवल याची तपासणी केल्यावर योग्य निर्णय घ्यावा.
वराह पालन व्यवसाय चे नियोजन
- जवळच्या बाजारपेठेत मांसाची मागणी आणि व्यवसायासाठी योग्य ठिकाण आणि किमती बद्दल संपूर्ण माहिती आवश्यक आहे.
- वराह फार्मचा युनिट उभारण्यासाठी लागणारे साहित्य,करावी लागणारी गुंतवणूक, कर्ज व्यवस्था आणि शासकीय योजना इत्यादींविषयी सविस्तर माहिती असू द्यावी.
- वराह पालन आणि त्यांचे प्रजनन सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्यावे.
- व्यवसायाच्या ठिकाणी स्थानिक पशुधनाची स्थिती, या अहवालासाठी संबंधित सर्वेक्षण, पशुगणना अहवाल पहावा.
- आहार नियोजन,कुंपणाची व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धततसेच या व्यवसायातील नफा आणि तोटा यांचा अंदाज घ्यावा.(संदर्भ-ॲग्रोवन)
Published on: 05 December 2021, 12:46 IST