Animal Husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गाय किंवा म्हशी विकत घेणे गरजेचे असते. परंतु या जनावरांच्या किमतीचा विचार केला तर प्रत्येक शेतकर्याला ते शक्य होईल असे नाही. परंतु शेतकर्यांच्या विकासासाठी आणि पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकार कडून भरीव रक्कम कर्ज रूपाने दिली जाणार आहे.

Updated on 11 September, 2022 1:20 PM IST

शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला गाय किंवा म्हशी विकत घेणे गरजेचे असते. परंतु या जनावरांच्या किमतीचा विचार केला तर प्रत्येक शेतकर्‍याला ते शक्य होईल असे नाही. परंतु शेतकर्‍यांच्या विकासासाठी आणि पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकार कडून भरीव रक्कम कर्ज रूपाने दिली जाणार आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरे पाळण्यासाठी एक दीड लाख रुपयांपेक्षा जास्तीची मदत मिळणे शक्य आहे. या मदतीतून ते गाई किंवा म्हशी खरेदी करू शकतात.

नक्की वाचा:जनावरांच्या आहारात करा 'या' खाद्याचा वापर; दुग्ध उत्पादनात होईल वाढ

नेमके काय आहे पशु किसान क्रेडिट कार्ड?

 आपल्याला किसान क्रेडिट कार्ड माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे बरेच शेतीची कामे करण्यासाठी आर्थिक मदत होते. 2020 मध्ये केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर पशु किसान क्रेडिट कार्ड सादर केले. हे कार्ड तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून मिळवता येऊ शकते.

नक्की वाचा:Poultry: कडकनाथ कोंबड्यामध्ये आहे शेतकऱ्यांना लखपती बनवण्याची क्षमता,काय आहे यामागील कारणे?

यासाठीची प्रक्रिया

 हे कार्डसाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी बँकेशी संपर्क साधून बँकेकडून त्यासंबंधीचा अर्ज मिळतो.हा अर्ज तुम्ही व्यवस्थित आवश्यक माहितीसह भरल्यानंतर तो बँकेत जमा करायचा. त्याच्यानंतर बँकेची काही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून 1.80 हजार रुपयांपर्यंत कर्ज सुविधा मिळते.

किसान क्रेडिट कार्डला जितके व्याज द्यायला लागते तेवढेच व्याज पशु किसान क्रेडिट कार्डला देखील द्यावे लागते. जर तुम्ही घेतलेले कर्ज वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला व्याजात तीन टक्के सूट मिळते.

नक्की वाचा:Loan: 10 शेळ्यांच्या पालनासाठी मिळणाऱ्या कर्जाची सविस्तर माहिती,वाचा अर्ज करण्याची पद्धत

English Summary: pashu kisan credit card is so benificial in animal husbundry
Published on: 11 September 2022, 01:20 IST