Animal Husbandry

जनावरांमध्ये विविध प्रकारच्या परजीवी आढळतात. या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे. भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवींचा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे

Updated on 05 March, 2022 9:41 AM IST

जनावरांमध्ये विविध प्रकारच्या परजीवी आढळतात. या परजीवी पैकी गोचीड ही बाह्य परजीवी मुख्य आहे. भारतामधील बऱ्याच ठिकाणी या परजीवींचा प्रादुर्भाव आढळतो. पशु वैद्यकीय शास्त्रामध्ये या परजीवी ला विशेष महत्त्व आहे

त्याच्या अनेक कारणे आहेत. जनावरांमध्ये जे महत्त्वाचे जीवघेणे आजार होत असतात ते पसरवण्याचे काम गोचीड करत असते. एवढेच नाही तर जनावरांची उत्पादनक्षमता हे गोचीड च्या प्रादुर्भावामुळे कमी होत असते. गोचीड हे जनावरांच्या रक्त शोषण करतात. साधारण एक गोचीड एक ते दोन  मिली  रक्त पिते. त्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो व चाव्यामुळे टिक पॅरालिसीस हा आजार होतो. यावर्षी अनेक दुष्परिणाम जनावरांना गोचीड मुळे पाहायला मिळतात. या लेखात आपण गोचीड निर्मूलन विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

 गोचीड चा जीवनक्रम

 गोचीड हा रक्तावर आपली उपजीविका करणारा परजीवी कीटक आहे. जर आपण गोचीड या परजीवी चा जीवनचक्राचा विचार केला तर तो तीन वर्षाचा आहे. गोचिड चे सहा पायांची डीभ अवस्था फार लहान असते.गोचीडला तरुण अवस्था द्यायला तीन आठवडे लागतात व त्याची ही अवस्था फार काळ टिकते.

या अवस्थेमध्ये गोचीड ला आठ पाय असतात.  यामध्ये गोचीड जमिनीवर पडते व जवळील भिंती किंवा जमिनीत असलेल्या भेगांमध्ये शिरते आणि जवळपास तीन ते पाच हजार अंडी घालते. हेच अंड्यांमधून निघणारे सूक्ष्म गोचीड जनावरांच्या अंगावर  चिकटून  रक्त पितात व खाली पडतात. ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा होते व नंतर मादी गोचीड परत अंडी घालते.

 गोचीड निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक उपाय

  • जनावरांचा गोठा व गोठ्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ व टापटीप ठेवावा.
  • दर महिन्याला गोठ्यामध्ये चुना मारून घ्यावा.
  • गोठ्यामध्ये असलेल्या भेगा, गोठ्याच्या भिंतींना असलेल्या भेगामध्ये असलेले गोचिड चे अंडे टेंभ्याच्या साह्याने जाळून टाकाव्यात.
  • गोठा जर लाकडी असेल तर लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने खरडपट्टी करून अंडी  व गोचीड गोठ्याच्या बाहेर जाळून टाकावीत.
  • गोठ्यातील गोचीड आसरा घेऊ शकतील अशा जागा म्हणजेच फटी, भेगा, बिडे अशा जागांचा बुजवून नायनाट करावा.
  • गोठ्यामध्ये उंदीर आणि घुशी सारखे प्राणी असतील तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे.
  • नियमितपणे जनावरांचा खरारा करावा.
  • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांच्या गोचीड निर्मूलन करून घ्यावे.
English Summary: parasite is harmful for animal this tips useful for removel parasite
Published on: 05 March 2022, 09:41 IST