Animal Husbandry

पंढरपुरी एक म्हशीची जात असून या जातीच्या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव येथे आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळदार शिंगे हे या म्हशी चे वैशिष्ट्य असते.

Updated on 01 July, 2021 2:21 PM IST

 पंढरपुरी एक म्हशीची  जात असून या जातीच्या म्हशी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव येथे आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम, पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळदार शिंगे हे या म्हशी  चे वैशिष्ट्य  असते.

 लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन ही त्यांची वैशिष्ट्ये  आहेत. तशी जास्त उत्पादन क्षमतेमुळे म्हैस  इतर जनावरांपेक्षा फायदेशीर ठरते तिच्या दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. शेतातील उरलेले अवशेष जसे तूस, कुठार यावर प्रक्रिया करून चांगल्या प्रकारचे खाद्य बनवून त्याचा वापर म्हशीच्या आहारामध्ये करता येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडी, पंढरपुरी आणि नागपूरी या तीन जाती आढळतात यामध्ये पंढरपुरी जात ही  काटक आणि दुधासाठी चांगली समजली जाते. दूध व्यवसायासाठी सोलापूर मध्ये पाहिल्या जाणाऱ्या पंढरपुरी म्हशी  विषयी या लेखात माहिती घेऊ.

 या म्हशींच्या जाती विषयी अनेक वैशिष्ट्ये आपण आज जाणून घेणार आहोत. आकाराने मध्यम पण अतिशय काटक शरीर, लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळदार शिंगे ही त्यांची वैशिष्ट्ये. दुग्ध व्यवसायासाठी या या जातीच्या म्हशी उत्तम समजले जातात. या जातीच्या म्हशी ला धारवाडी ही म्हटले जाते. कमी पावसाच्या प्रदेशात या म्हशी  चे पालन चांगले होत असते. पंढरपूर वरून या म्हशी  चे नाव पंढरपुरी असे  पडल्याचे म्हटले जाते. यांची शिंगे हे खूप लांब असतात. 45 ते 50 सेंटीमीटर पर्यंत त्यांची लांबी असते. त्यांच्या शरीराच्या ठेवणीमुळे आणि शिंग यांमुळे या म्हशी देशभरात प्रसिद्ध आहेत.

 दुग्ध व्यवसाय साठी उपयुक्त – पंढरपुरी म्हैस ही हलक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक जात आहे. अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही जात चांगले दूध देते. दूध उत्पादन क्षमता आणि सातत्य या गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे. या म्हशींचे वजन साधारण साडेचारशे ते 470 किलो असतं.

या  सहा ते सात लिटर दूध देत असतात. पण आपण जर व्यवस्थित निगा राखली तर या जातीच्या म्हशी पंधरा लिटरपर्यंत सुद्धा दूध देतात. एका वेतात या म्हशी पंधराशे ते अठराशे लिटर दूध देतात.

 प्रजननक्षमते साठी प्रसिद्ध – या म्हशीच्या  पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यांत गाभण राहतात. 35 ते 40 महिन्यांत पहिल्यांदा वितात. दर 12 ते 13 महिन्यात या जातीच्या म्हशी एका पारड्या ला  जन्म देतात. त्यानंतर साधारण तीन ते पाच दिवसांपर्यंत दूध देण्याची क्षमता या म्हशी मध्ये आहे.

English Summary: pandharpuri buffelo
Published on: 01 July 2021, 02:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)