बऱ्याच वेळेस डोळ्यांना न दिसणारी बुरशी किंवा आफ्लाटॉक्सिं युक्त चारा चुकीने जनावरांना खायला दिला जातो. त्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येते. अशा गाईचे दूध आहारात वापरणाऱ्यांच्या आरोग्यावर देखील घातक परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या बुरशी युक्त आहारापासून जनावरांचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल व चांगल्या दर्जाच्या दुधाचे उत्पादन कसे घेता येईल याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
जनावरांच्या आहारातील बुरशी व त्याचे परिणाम
दुधाळ जनावरांच्या पासून जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळावे यासाठी जनावरांना चांगल्या गुणवत्तेचा चारा व पशु आहार दिला जातो. असा आहार देत असताना त्यामध्ये जनावरांना अपायकारक असा कोणताही घटक जात नाही ना याची आपण सातत्याने काळजी घेत असतो. परंतु बरेच घटक असे आहेत जे आहारातून जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. ज्याची आपल्याला माहिती नसते त्यामध्ये प्रामुख्याने बुरशी युक्त आहार हा महत्त्वाचा घटक आहे.
आफ्लाटॉक्सिन म्हणजे काय?
जनावरांचा चारा किंवा पशुखाद्याचा कच्चामाल किंवा पशुखाद्यामध्ये जास्त आद्रता असेल व जास्त तापमानामुळे खात्यामध्ये जास्त प्रमाणात बुरशी निर्माण होते. यामध्ये बऱ्याच प्रकारच्या बुरशीचा समावेश असतो. यामध्ये अस्परजिलसफ्लेवसवअस्परजिलसपेरासिटीकस या जातीच्या बुरशी जास्त प्रमाणात असतात. ज्या मायकोटॉक्सिन नावाचा विषारी पदार्थ तयार करतात. यामुळे मायकोटॉक्सिकॉसिस नावाचा आजार होतो. या मायक्रो टॉक्सिन एक प्रकार म्हणजे अफ्लाटॉक्सिन होय.मायकोटॉक्सिनचे बरेच प्रकार असून त्यात प्रामुख्याने फ्लूमोनिसीन, झियारेलेनोन, ट्रायकोथेनेक्सइत्यादी. वरील पैकी आपल्याकडे आढळणाऱ्या बुरशी मध्ये अफ्लाटॉक्सिन बुरशी जास्त प्रमाणात दिसून येते. यावर्षीचे बी वन, बी2, जी 1 आणि जी दोन असे चार प्रकार आहेत.
खाद्यामध्ये बुरशी कशी तयार होते?
- पेंड- जनावरांच्या आहारात शेंगदाणा पेंड, सरकी पेंड आणि सोयाबीन पेंड अशा विविध प्रकारच्या पेंडी वापरल्या जातात. कॅंडी मध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने पेंड तयार करत असताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालामध्ये बुरशी असेल तर पेंडी मध्ये ही बुरशी तयार होते. कच्च्या मालावर प्रक्रिया झाल्याने व टायची पेंडीतरुपांतर झाल्याने डोळ्यांना बुरशी दिसत नाही. परंतु प्रयोगशाळेत असे नमुने तपासले तर त्यात मोठ्या प्रमाणावर बुरशीपासून तयार होणारे अफ्लाटॉक्सिन हे जास्त प्रमाणात असू शकते.
- मका भरडा- पशुखाद्य बरोबर जनावरांना भुस्सा किंवा मक्याचा भरडा दिला जातो.मका चांगल्या प्रकारे वाळवलेला नसेल किंवा मक्यामध्ये तेरा ते चौदा टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याचे प्रमाण असल्यास अशा मक्याच्या देठाकडील भागाकडे बुरशीची वाढ होते. काही दिवसांनी हा भाग काळा पडतो. या काळ या भागांमध्ये अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारचा मका भरडून जनावरांना आहार दिला जातो.
- सुका चारा- वाळलेला चारा पावसाळ्यात पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून झाकून ठेवला जातो. परंतु चारा पूर्णपणे झाकून ठेवला जात नाही त्यामुळे बाजूने चारा भिजतो वर्ष भिजलेल्या चाऱ्यामध्ये नंतर गोष्टी तयार होते.
- ओला चारा- दोन ते चार दिवसाचा हिरवा चारा साठवून ठेवला असेल तर अशा चाऱ्याच्या आतील भाग हा उष्ण होऊन काही काळाने त्यात बुरशी तयार होते.
बुरशीचे जनावरांवर होणारे घातक परिणाम
- दूध उत्पादनात घट- जनावरांच्या आहाराचे प्रमाण कमी झाल्याने दूध उत्पादन कमी होते. दूध उत्पादन क्षमता असतानाही जनावरे फक्त अफलाटोक्सिनचे आहारातील प्रमाण वाढल्याने आवश्यक ते दूध उत्पादन देऊ शकत नाही.
- दुधाची गुणवत्ता खालावते- ज्याप्रमाणे दूध उत्पादन कमी होते त्याप्रमाणे दुधाची गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक खुराक उपलब्ध न झाल्याने दुधाची गुणवत्ता सुद्धा हळू खालावते.
जनावरा सर्व आवश्यक घटक नियमितपणे देऊन सुद्धा अपेक्षित दुधाची गुणवत्ता मिळत नाही. अफ्लाटॉक्सिनचे आहारातील प्रमाण वाढले तर आतड्याच्या आतील बाजूस सौम्य प्रमाणात रक्तस्राव होतो. त्यामुळे आहारातून आलेल्या महत्त्वाच्या अन्नघटकांचे शोषण होण्यास अडचण निर्माण होते.चांगले खाद्य जनावरास खायला घालून सुद्धा त्यांचेपोषण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. मज्जासंस्थेवर देखील वाईट परिणाम होतात. जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा ही व्यवस्थित कार्य करत नाही.काही जनावरांना फिटसुद्धा येऊ शकते. जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.त्यामुळे जनावरे वारंवार आजारी पडतात. वातावरणातील कमी-अधिक बदल सहन करण्याची त्यांची शक्ती कमी होते. त्यामुळे जनावर वारंवार इतर घातक जीवजंतूंना बळी पडतात.
Published on: 23 December 2021, 08:36 IST