Animal Husbandry

लंपी रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of lumpy disease) जिल्ह्यांमध्ये जास्त पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेण्याबाबद सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. या आजारामुळे अनेक जनावरे मृत्यू पावले आहेत.

Updated on 12 September, 2022 10:29 AM IST

लंपी रोगाचा प्रादुर्भाव (Outbreak of lumpy disease) जिल्ह्यांमध्ये जास्त पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेण्याबाबद सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. या आजारामुळे अनेक जनावरे मृत्यू पावले आहेत.

त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने (Department of Animal Husbandry) दिल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, लातुर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नाशिक या १९ जिल्हयामध्ये लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.

शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

राज्यशासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राज्यामध्ये सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने, आंतरराज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिषवर्गीय पशुवाहतूक, बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत (Animal Husbandry) लंम्पी चर्मरोगाच्या प्रादूर्भाव झालेल्या गावापासून ५ कि.मी. परिघातील क्षेत्रामध्ये बाधीत व निगरानी क्षेत्रामध्ये सदर रोगाची साथ रोखण्याकरिता लसीकरण करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरबसल्या करा गुंतवणूक; पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दरमहा मिळतील 5000 रुपये

खबरदारी कशी घ्याल?

शेतकरी मित्रांनो बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवा. आजारसदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधा.

योग्य जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी, बाधित जनावरांवर तत्काळ व योग्य उपचार केले आणि अबाधित क्षेत्र शंभर टक्के लसीकरण केले तर या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या 
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत एकदाच गुंतवणूक करा; आयुष्यभर पेन्शन राहणार सुरू
आज बुधाची बदलणार चाल; पाहा तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 10 म्हशींची डेअरी खोलण्यासाठी सरकार करणार ७ लाख रुपयांपर्यंत मदत

English Summary: Outbreak lumpy disease 19 districts state
Published on: 12 September 2022, 10:29 IST