Animal Husbandry

धावपळीच्या जीवनात जो वाढणार तणाव आहे तो तणाव कमी करण्यासाठी लोकांमध्ये शोभिवंत मत्स्यपालनाचे एक आकर्षण वाढलेले आहे. विकसनशील देशामध्ये ग्रामीण भागातील लोकांना रोजगार म्हणून एक चांगली संधी उपलब्ध आहे.

Updated on 23 November, 2021 4:08 PM IST

धावपळीच्या जीवनात जो वाढणार तणाव आहे तो तणाव कमी करण्यासाठी लोकांमध्ये शोभिवंत मत्स्यपालनाचे एक आकर्षण वाढलेले आहे. विकसनशील देशामध्ये ग्रामीण भागातील लोकांना रोजगार म्हणून एक चांगली संधी उपलब्ध आहे.

शोभिवंत मत्स्यपालनाच्या पद्धती:-

इनडोअर युनिट:-

१. घरातील एका छोट्या खोलीमध्ये सुद्धा मत्स्यसंवर्धन करता येते.
२. विविध आकाराच्या काचेच्या टाक्यांमध्ये मत्स्यबीज उत्पादन करू शकता.
३. इनडोर युनिट मध्ये जास्त किमंत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातीचे बीजोत्पादन करणे योग्य आहे.
उदा. निऑनटेटा, डिस्क्स, फ्लॉवरहॉर्न, ब्लॅक घोस्ट.

यार्ड स्केल युनिट:-

१. यार्ड स्केल युनिट हे घरातील अंगणामध्ये करणे शक्य आहे. या युनिट साठी १ हजार ते २ हजार चौ. फूट जागा लागते.
२. मत्स्यबीजाचा विक्री योग्य आकार होईपर्यंत त्याचे संवर्धन करा तसेच जास्त संख्या देणारी पिल्ले चे संगोपन करा.
३. बाजारात मध्यम किमतीत मिळणारे मासे जसे की एंजल, गोल्डफिश, बार्ब, गुरामी, टेळा यांचे संवर्धन करण्यासाठी हे युनिट योग्य ठरते.

सिमेंट पॉन्ड युनिट:-

१. सिमेंटचे विविध आकाराचे तळे बांधून त्यामध्ये तुम्ही मत्स्यबीजचे संगोपन करू शकता.
२. यार्फ स्केल पेक्षा मोठी जागा असल्यास तुम्ही या प्रकारचे युनिट बांधून संगोपन करू शकता.
३. सिमेंट पॉन्ड युनिट तुम्ही ५ हजार चौ. किमी पर्यंत बांधू शकता.
४. हे युनिट बांधायला तुम्हाला थोडा खर्च लागेल मात्र यामध्ये संगोपन झाल्यास तुम्हाला यामधून चांगले उत्पन्न मिळेल.

प्लॅस्टिक अस्तरीकरण तलाव युनिट:-

१.पाच ते दहा गुंठे पडीक जमीन व पाण्याचा स्रोत असल्यास हे उंची सहज तयार होऊ शकते.
२. जागेचा आकार ५ ते १० मीटर लांब, १.५ ते २ मीटर रुंद आणि १.२ मीटर खोल असा तलाव तयार करून घ्यावा आणि त्यामध्ये २५० ते ३५० मायक्रॉन जाडीचे प्लॅस्टिक अस्तरीकरण करावे.
३. विरुद्ध दिशेने पाणी जावे म्हणून पाईपलाईन करावी.
४. तलाव्यातील मास्यांना सरंक्षण भेटावे म्हणून पूर्ण युनिट ला शेडणेट करावे.

शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायामधील पर्याय:-

१. शोभिवंत माशांची पिल्ले योग्य आकारात वाढवून त्याची विक्री करावी.
२. नर व मादी ची प्रजनन क्षमता तयार करून त्याची विक्री करावी.
३. प्रजनन करिता जिवंत खाद्य निर्मिती करून विक्री करावी.
४. कार्यालय व हॉटेल्स मध्ये छंद असणाऱ्या ग्राहकांना सेवा पुरवणे.

English Summary: Opportunity in ornamental fish business, get huge profits
Published on: 23 November 2021, 04:08 IST