शेळी पालन व्यवसायहा अगदी कमी खर्चात आणि कमी जागेत करता येणारे व्यवसाय आहे. असे असले तरी यापासून मिळणारा नफा हा चांगला मिळतो.
शेळीपालनाच्या तीन प्रमुख पद्धती आहेत. या तीन पद्धती मधील मुक्त व्यवस्थापन पद्धत ही सोपी आणि कमी खर्चिक आहे. या लेखात आपण मुक्त व्यवस्थापन शेळीपालन पद्धती विषयी माहिती जाणून घ्या.
शेळीपालनातील मुक्त व्यवस्थापन पद्धती
मुक्त व्यवस्थापन पद्धती मध्ये इतर पाळीव प्राण्यां सोबत नैसर्गिक पडीक, नापीक जमिनीवर उगवलेले गवत, झाडपाला तसेच खुल्या कुरणांवर व धान्य पिकांच्या अवशेषांवर जोपासल्या जातात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो जनावरांमधील प्रजननक्षमतेसाठी उपयोगी ठरतात 'या' वनौषधी, होईल फायदा..
यामध्येकुरणा मधील झाडांची सावली,नदी, नाले पाणी तळ्यातील पाण्याचा उपयोग करून घेतला जातो. या पद्धतीमध्ये निवारा, चारा वैरण, खुराक आणि पाण्याची वेगळी व्यवस्था केली जात नाही.
. या सगळ्या गोष्टींसाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. परंतु एखाद्या अडचणीच्या कालावधीत रात्रीच्या वेळी काटेरी फांद्यांचे कुंपण घालून उघड्यावर किंवा झाडाखाली निवाऱ्याची सोय केली जाते. ही पद्धत कमी पावसाच्या शिवाय उष्ण हवामानात त्यासोबतच डोंगराळ भागात सोयीचे आहे. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्व साधनांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर, आर्थिक दुर्बल घटकातील शेळी पालक पारंपारिक स्वतंत्र पशू व्यवस्थापन आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करतात. कारण शेतकऱ्याची आर्थिक दुर्बलता, अत्यल्प जमीनधारणा, वैरण तसेच पाण्याची कमतरता व न परवडणारी कोरडवाहू जमीन हे प्रमुख कारणे आहेत. या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या पन्नास ते दोनशे दरम्यान असते. परंतु भांडवली गुंतवणूक, मजूर त्यासोबत चारा व पाणी यावरील खर्च कमी लागतो. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्यांना व्यायाम मिळतो व खाण्याच्या त्यांच्या आवडीनिवडी खूप चांगल्या पद्धतीने जोपासल्या जातात. शेळ्या जोपासण्यासाठी मजुरांची आवश्यकता नसते.
नक्की वाचा:डाळिंब शेतीत फक्त या गोष्टी लक्षात ठेवा आणि कमवा बक्कळ पैसा
मुक्त व्यवस्थापन शेळीपालनाच्या मर्यादा
व्यापारी तत्त्वावर तर शेळी पालन करायचे असेल तर ही पद्धत फायदेशीर नाही. मुक्त कुरणावर शेळ्यांच्या चरण यावर बंधन राहत नाही त्यामुळे लेंडीखत वाया जाऊन खताचे उत्पन्न मिळत नाही. शेळ्यांचे प्रजनन, आहार आणि दूध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. करडांच्या शरीराची वाढ खुंटते. त्यामुळे करडांचे मृत्यूचे प्रमाण वाढते व आर्थिक नुकसान होतं. अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येत नाही. एकंदरीत आर्थिक दृष्टीने मुक्त व्यवस्थापन फायदेशीर होऊ शकत नाही. म्हणून व्यापारी तत्त्वावर शेळीपालन करायचे असेल तर ही पद्धत फायद्याचे नाही.
मुक्त व्यवस्थापन पद्धती चे फायदे
मुक्त व्यवस्थापन पद्धती मध्ये शेळ्यांच्या नि वाऱ्यावर व मजुरीवर खर्च होत नाही. त्यासोबतच मुक्त फिरल्यामुळे शेळ्यांना व्यायाम मिळतो व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच त्यांना त्यांच्या आवडीनुसार चारा खाता येतो.
Published on: 26 March 2022, 01:33 IST