ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आजकाल एका बकऱ्याची सर्वत्र चर्चा होत आहे या बकऱ्याचे नाव माराकेश असून तो २१ हजार डॉलर म्हणजेच १५.६ लाख रुपये ला विकला गेला आहे. यापूर्वी ज्या ज्या बकऱ्या विकल्या गेल्या त्या सर्व बकऱ्यांचे विक्रम या बकरीच्या किमतीने मोडले आहेत. द गार्डियन या वृत्तपत्रानुसार माराकेश नावाचा हा बकरा अँड्र्यू मोस्ले हा व्यक्तीने विकत घेतला आहे. अँड्र्यू मोस्ले सांगतो की माराकेश हा बकरा खूप स्टाईलीश आहे.
आतापर्यंतचा मोठा विक्रम केला:
पश्चिम न्यू साऊथ वेल्समध्ये कोबर नावाचे शहर आहे जे की या शहरामध्ये बकऱ्यांना लिलाव करण्यासाठी ठेवले होते. मागील महिन्यात ब्रॉक या नावाची शेळी विकलेली होती ज्याची किमंत १२ हजार डॉलर होती. या महागड्या शेळीने मागील महिन्यात मोठा विक्रम केला होता.माराकेश बकरी घेण्याआधी अँड्र्यू मोस्ले यांच्याकडे ऑस्ट्रेलिया मधील सर्वात महागडी शेळी होती. अँड्र्यू मोस्ले याना शेळीपालन करण्याची खूप आवड आहे. अँड्र्यू ने मागील वर्षी जी शेळी विकत घेतली होती त्या शेळी ची किमंत ९ हजार डॉलर होती.
अँड्र्यू मोस्ले शेळी व गुरे पाळतात तसेच जंगली जनावरांपासून आपल्या कळपातील गुंरांच व शेळ्यांचे सरंक्षण व्हावे म्हणून कुंपणाला गुंतवणूक करतात. अँड्र्यू मोस्ले सांगतात की माराकेश सारख्या शेळ्यांच्या किमती खूप आहेत कारण त्यांची संख्या खूप कमी आहे.माराकेश या बकऱ्याचे पालन क्वीन्सलँड सीमा येथील गुडुगा मधील रंगलँड रेड स्टड या ठिकाणी होते. कोबर या ठिकाणी जेव्हा शेळीचा लिलाव लावण्यात आला होता त्यावेळी माराकेश जातीच्या १७ शेळ्या होत्या.
या सर्वच शेळ्यांचे शरीर मोठे होते परंतु अँड्र्यू मोस्ले सांगतात की असे काही नाही की ज्या शेळ्यांचे शरीर मोठे आहे त्या उत्तम दर्जाच्या असतात. तर माराकेश जातीच्या शेळ्या खास तयार केल्या जातात. त्यामुळे शरीरावर न जाता ज्या शेळ्या चांगल्या प्रकारे तयार झालेल्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या असे अँड्र्यू मोस्ले यांचे मत आहे.
Published on: 29 November 2021, 08:49 IST